ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १४ , श्लोक ५
हे महाबाहो, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृती पासून उत्पन्न झालेली तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा, या नीच, बावळ्या, देहीला सज्ञान कर. सत्व, रजो आणि तमो गुणांच्या सापळ्यात त्याला अडकू देऊ नकोस. हे प्रकृती मधून जन्माला आले आहेत, याची मला जाण करून दे. हे प्रभू, पुरुष प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या परब्रम्हा, परमधामा, भक्तरक्षका, या पाप्याला तुझ्या चरण कमलांशी घे. मृत्युसमयी तुझे विचार येतील असे विचार दे. तू माझा आश्रय.
शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा