रविवार, ७ सप्टेंबर, २०२५


   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

 " अळीपासून ब्रह्मपर्यंत सर्वांमध्ये परमेश्वराचे प्रतिबिंब पाहा."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  २९  
 
          जो पुरुष सर्व कर्म प्रकृतीकडूनच केली जातात असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो, तोच यथार्थ रूपाने पाहतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा ! या जगाचे रहाटगाडगे निसर्गतः चालू असते, हे या मूढाला दाखवून देऊन हा कर्ता नाही याची जाणीव करून दे. सत्यदर्शी बनव. तीन पावलात विश्व व्यापणाऱ्या वामना, लोणी खाऊन यशोदेस मुखामध्ये विश्व दर्शवणाऱ्या! गोवर्धन गिरीचे छत्र धरणाऱ्या ! तुझ्याशिवाय  निराधार आहे. प्रभू ! शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा