ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रत्येकाचा स्वतःचा व्यक्तिगत स्वभाव असतो व त्यानुसार भक्तिचे रूप आणि पद्धत बदलते. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १३, श्लोक ३०
जो पुरुष भौतिक प्रकृतीच्या संपर्कामुळेच जिवात्म्याला निरनिराळे देह प्राप्त होत असल्याचे आणि प्रकृतीतूनच सर्व भूतांचा विस्तार होत असल्याचे जाणतो तो ब्रम्हाला प्राप्त होतो.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा! तू माझा आधार, विविध प्रकारच्या जीवभूतांचा तूच एक आधार आहेस, त्याचा मला तू बोध करून दे. बुद्धिमंतांची बुद्धी तू आहेस. आनंदा! अच्युता! हरितवर्णा वेणुगान विश्वरूपा! विदुराच्या घरच्या कण्या तू जेवलास. तुला जेवण घालण्याइतका मला उत्तम बनव. कान्हा, शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा