ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १३, श्लोक २८
जो पुरुष सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समरूपाने स्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
हे कान्हा, तू सर्वत्र सारखा भरून राहिला आहेस. हे पाहण्यासाठी मला ज्ञानचक्षू दे. हे नारायणा, या जीवाला आत्मघात करू देऊ नकोस. हे करुणाघ,ना मोक्ष प्राप्तीसाठी मला धर्मोपदेश कर. पद्मनाभा, परमेशा, पुरुषोत्तम, पुंडलिकाक्षा, अन्यथा शरणम नास्ति, त्वमेव शरणम् मम.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा