गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

          " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १३, श्लोक  ३२  
 
           ज्याप्रमाणे सर्वव्याप्त आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा, गरुडवाहना, कौस्तुभाभरणा, या क्षुद्रातल्या क्षुद्र जीवावर तू तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ज्याप्रमाणे सर्वव्याप्त आकाश तरलतेमुळे लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहव्याप्त निर्गुण आत्मा देहगुणांनी लिप्त होत नाही. हे या मूढाच्या डोक्यात शिरू दे. रामानुजा, हे प्रभू, सप्तगिरीवासा, शरणो शरणम्.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा