गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " यद भावं तद भवति."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  
 
           जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत् संघापासून मुक्त आहेत, जे सदैव आत्ममग्न असतात, जे भौतिक वासनांमधून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे ते जाणतात, त्यांना शाश्वत धामाची प्राप्ती होते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, केशीचा संहार करणाऱ्या केशवा, गरुड वाहना, या पाप्याला तुझ्या चरण कमली आसरा दे. तूच माझा आधार. शरणो शरणम्. माझ्या इच्छा, क्रोध आणि लोक समूळ नष्ट होऊ देत. त्यातून निर्माण होणारे हे भोग आता पुरे झाले. अच्युता, तू मला आश्रय दे. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २६ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " यद भावं तद भवति."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  ४  
 
           त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही. ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे, त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, तू आदीपुरुष आहेस. मी तुझ्या चरणी आसरा शोधतो आहे. तू परमध्येय आहेस. या ध्येयाप्रत गेले पाहिजे. तू मला आश्रय दे.
           हे प्रभू! माझ्यावर कृपा कर. या दासाला तू आपला समज. हे परमपुरुषा, अच्युता! हरितवर्णा ! भूमी मापणाऱ्या वामना! मुखात विश्व दाखवणाऱ्या! अनंतशयना! परमपद्वासा ! पापविमोचना! या पाप्याच्या सर्व पापांचा संहार कर आणि त्याला तुझ्या चरणी घे. कान्हा, तू मला आश्रय दे. मी तुला शरण आलो आहे. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  ३  
 
           या वृक्षाचे वास्तविक रूप या जगात अनुभवता येत नाही. याचा आदी अंत, आधार कोणीही जाणू शकत नाही. परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रुपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा, इथे आदी, अंत अथवा मध्यही नाही असं तू म्हणतोस. ह्या विषयी मला सुजाण कर. अनासक्ती दे. पांडुरंगा! पंढरीनाथा! परमदयाळा! परमपुरुषा! तूच आधार ! शरणो शरणम्. केशी संहारका! ! गरुड वाहना ! अब्धिनीरवर्वा ! या पाप्याचा तुझ्या पादपुष्पांवर स्वीकार करून उद्धार कर. या निराधाराच्या आधारा, शरणो शरणम्. काम व क्रोध याला सोडून जाऊ देत. यामुळे मी खूप सहन केले आता पुरे. हे राजा ! अच्युता ! माझा एकमेव सहारा. शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

श्री वसंतसाईंचा जन्मदिन संदेश

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

अति बोलणे टाळावे

 स्वामी म्हणतात, " कोणतेही काम करण्या अगोदर विचार करून मग ते काम करा. आवाज न करता, कमीत कमी संभाषण करून आपले कार्य पूर्ण करा.दूर उभे राहून कोणालाही मोठ्याने हाक मारू नका. त्या व्यक्तीच्या जवळ जा किंवा तिला खूण करून बोलवा. मोठा आवाज करणे हे आकाशाच्या शांतीचा भंग करणारे पापकर्म आहे.

जेव्हा आपण पाणी आणि पृथ्वीचा वापर करतो त्यावेळी अशा प्रकारची काही पाप कर्म घडतात.

आपण आपल्या भोवती झालेले जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण प्रत्यक्ष पाहू शकतो. उदा. एका तलावातील पाण्यात अनेक शेळ्या, मेंढया, गाई, गुरे उतरतात. लोकं स्नानासाठी तलावात उतरून तेथेच थुंकतात आणि तलावाचे पाणी प्रदूषित करतात. त्याचप्रमाणे आपण थुंकून आणि लघवी करून पृथ्वीला प्रदूषित करतो. ही सगळी घाण आहे. हे सर्व आपल्या डोळ्यासमोर घडते.

तथापि आपले डोळे आपली वाणी पाहू शकत नाही जी आकाशाला प्रदूषित करते.

जर आपण मोठ्याने बोललो किंवा हाक मारली तर आपला ध्वनी अवकाशात जातो आणि अवकाशात मिसळतो म्हणून स्वामी म्हणतात की हे सुद्धा पाप आहे. भावना फक्त भावना म्हणून राहिल्या, तर ठीक आहे, पण जेव्हा भावना विचारांमध्ये बदलतात आणि विचार शब्दांमध्ये रूपांतरित होतात, तेव्हा त्या शब्दांचा ध्वनी अवकाशाचे प्रदूषण करतो.


आपण त्याला शब्दब्रह्म म्हणतो. त्या शब्दब्रह्माची आपण शांतपणे उपासना केली पाहिजे. मोठ्या आवाजात आणि अनावश्यक बोलणे टाळूनच हे करणे शक्य आहे.

एकदा खूप मुसळधार पाऊस पडला. सर्व बेडुक मोठ्याने ओरडत होते. पाऊस थांबल्यानंतरही बेडकांचे ओरडणे सुरूच राहिले त्यामुळे पक्षी तेथे येऊन बेडकांना आपले भक्ष्य म्हणून घेऊन गेले. तमिळमध्ये एक म्हण आहे - “बेडकाचा त्याच्या तोंडामुळे नाश होतो.”

सूत्र
१)अति बोलणे = काळाचा अपव्यय
२)काळाचा अपव्यय = ऊर्जेचा अपव्यय
३)ऊर्जेचा अपव्यय = शारीरिक दमछाक
४)जेव्हा शरीर थकलेले असते तेव्हा आपल्याला अधिक खावे-प्यावेसे वाटते.
५) त्यामुळे आपली पचन संस्था बिघडते आणि आणि नको त्या भावना उद्दिपित करते.
 
तात्पर्य- अधिक बोलणे टाळा.

कमी बोला अधिक शांती मिळवा.

- श्री वसंत साई अम्मा

 

 


 

 

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  २ 
 
           त्रिगुणांनी पोषण केलेल्या या वृक्षाच्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षाची मुळे खालीही विस्तार पावून मनुष्याच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा, या  यःकश्चित जीवाला पुरुषोत्तम योग दर्शव व त्याचे आचरण करायला लाव. अश्वत्थ वृक्षाप्रमाणे अव्यक्त असलेल्या ज्ञानाचा बोध करून दे. आदिनारायण ! अनाथरक्षका ! आपद्बांधवा तूच माझा आधार. शरणो शरणम्. प्रभू कन्हा, कन्हा, मला तुझ्या चरणी स्वीकारून आशीर्वाद दे.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  १ 
 
           श्री भगवान म्हणाले," असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा खाली आहेत, ज्याची पाने वैदिक मंत्र आहेत. जो या वृक्षाला जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणतो." 

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा, अव्यक्त ज्ञात करून दे. तुझे वेद पठण करून घे. वेदांचा अर्थबोध करून दे. मला वेदान्ती कर, वेणुगोपला, वेंकटेशा, मी अगतिक आहे. मी तुझेच चरण धरून ठेवले आहेत. लवकरात लवकर या सेवकाला तुझ्या सुवर्णचरणी घे. तूच माझा आधार प्रभू ! शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १४ , श्लोक  १२ 
 
           हे अर्जुना ! रजोगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन काळाच्या इच्छेने कर्मांचा प्रारंभ अशान्ती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात. 

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा, रजोगुणाचे प्राबल्य वाढले की लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती व विषयभोगांची लालसा हे सर्व उत्पन्न होते. तुझी प्राप्ती व्हावी यासाठी मला प्रयत्न करण्यास प्रवृत्त कर. मला केवळ तुझे कार्य करण्याची बुद्धी दे. अशांतीपासून मला मुक्त कर. मला फक्त एकच इच्छा दे - तुझ्या प्राप्तीची इच्छा. हे वैकुंठीच्या राणा, कान्हा, तू माझा आश्रय आहेस. हे काळा, ये, ये, कृपा करून लवकर ये आणि या शनिला घेऊन जा. तू येशील तेव्हाच या जीवाचा अंत होऊ दे. तूच माझा आधार !  शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
अमूल्य धनसंपदा जरी दिली आनंद
अखिल विश्वासहीत दिले नभांगण 
अशी ही धनसंपदा होतसे क्षीण 
आम्हा तिची ना कदर ना आदर
असो एखादा जरी कुष्ठरोगी नर 
संसर्गजन्य देह त्याचा व्याधीने जर्जर
असा हा कुष्ठग्रासित नर
प्रेयस असेल आपुल्या महाप्रभू जर
प्रभुस्थानी मानुनी त्यासी
स्तुती, प्रार्थना करू त्याची जोडीने दोन्ही कर
 

             मी विलाफ करत होते, स्वामींची अर्ज करत होते." हे प्रभू मला कोणतीही धनसंपदा नकोय. मला अंतर देऊ नका." मी माझ्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी खूप संघर्ष केला आहे. धनसंपदा कशासाठी? ते माझी कसोटी पाहताहेत का?  माझे मन ह्या विचारांवर चिंतन करत होते.
 
अध्याय ३
६ फेब्रुवारी २००१.
             साई गीतालयम् ध्यान सभागृहाच्या उद्घाटन समारंभासाठी दोन-तीन दिवसापासून लोक येत होते. बरेचजण ६ता. ला संध्याकाळी आले. त्याच दिवशी स्वामींचे सिंहासन आले. ते देवघरात ठेवण्यात आले. आम्ही त्याची पूजा करून आरती केली. मी स्वामींना खुर्चीत बसलेले पाहून खुर्चीवर डोक टेकून आक्रोश करू लागले. माझ्या भावना अनावर झाल्या. बऱ्याच वर्षानंतर परमेश्वराने केलेल्या कृपेमुळे माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली व मी रडू लागले. रात्री उशिरा ध्यान सभागृहात लावण्यासाठी भगवंताचे नवीन फोटो आले. आम्ही पुन्हा भगवंताची आरती केली. फोटो खूप सुंदर होते. मी पुन्हा पुन्हा भगवंताच्या कृपाळूपणाचा विचार करत होते. त्यांचा महिमा आपण कसा वर्णन करू शकू.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १४ , श्लोक १० 
 
           हे भारता! कधी रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणाचे प्राबल्य वाढते. कधी सत्वगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून रजोगुणाचे प्राबल्य वाढते तर कधी सत्वगुण आणि रजोगुणाचा पाडाव करून तमोगुणाचे प्राबल्य वाढते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा, तू त्रीगुणातीत आहेस. तू मलाही गुणातीत कर. या त्रिगुणांच्या आसक्तीमुळे कधी तमोगुण वाढतो, तर कधी रजोगुण पण सत्वगुण क्वचितच असतो. ह्या दुबळ्या दासावर या तीन गुणांचा हल्ला झाल्यामुळे तो धडपडतो आहे. महासागरात निद्रिस्त ईश्वरा, अच्युत, मला गुणातीत कर. मला तुझे दिव्य चरण प्राप्त होऊ दे.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १४ , श्लोक ९ 
 
           हे अर्जुना! सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्मांना आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यास प्रवृत्त करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            कान्हा! मला सत्वगुण बहाल करून आनंदमग्न कर. रजगुण वाढला की, तुझे कार्य करायला लाव. तमोगुणांमुळे जीव संभ्रमित होतो. हे माधवा, तू स्वतः माझा भ्रम दूर कर. मला सत्वगुणी कर. हे गुणातीता, मला गुणातीत बनव. हे श्रीरामा, तू माझा आसरा आहेस. शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

          " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल. "

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १४ , श्लोक ८
 
           हे अर्जुना! सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे, असे समज. तो या जीवाला प्रमाद, आळस, आणि निद्रा यांनी बांधतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
            हे कान्हा! तमोगुण हा अज्ञानातून उत्पन्न होत असल्यामुळे या दुबळ्या दासाचे अज्ञान दूर कर. याला तमोगुणांची भुरळ पडू देऊ नकोस. यद्यापित तुझ्या सुंदर रूपाची मोहिनी पडू दे. हे मधुसूदना, मला मायेने संभ्रमित होऊ देऊ नकोस, परंतु तुझ्या दैवी लीलांनी संभ्रमित होऊ दे. माझ्यामधील आळस, सुस्ती आणि निद्रा दूर कर.
 
*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


  ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः  

 

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५