ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
प्रकरण - २
कुमारी पासून कुबेरापर्यंत
अखिल विश्वासहीत दिले नभांगण
अशी ही धनसंपदा होतसे क्षीण
आम्हा तिची ना कदर ना आदर
असो एखादा जरी कुष्ठरोगी नर
संसर्गजन्य देह त्याचा व्याधीने जर्जर
असा हा कुष्ठग्रासित नर
प्रेयस असेल आपुल्या महाप्रभू जर
प्रभुस्थानी मानुनी त्यासी
स्तुती, प्रार्थना करू त्याची जोडीने दोन्ही कर
मी विलाफ करत होते, स्वामींची अर्ज करत होते." हे प्रभू मला कोणतीही धनसंपदा नकोय. मला अंतर देऊ नका." मी माझ्या जीवनामध्ये त्यांच्यासाठी खूप संघर्ष केला आहे. धनसंपदा कशासाठी? ते माझी कसोटी पाहताहेत का? माझे मन ह्या विचारांवर चिंतन करत होते.
अध्याय ३
६ फेब्रुवारी २००१.
साई गीतालयम् ध्यान सभागृहाच्या उद्घाटन समारंभासाठी दोन-तीन दिवसापासून लोक येत होते. बरेचजण ६ता. ला संध्याकाळी आले. त्याच दिवशी स्वामींचे सिंहासन आले. ते देवघरात ठेवण्यात आले. आम्ही त्याची पूजा करून आरती केली. मी स्वामींना खुर्चीत बसलेले पाहून खुर्चीवर डोक टेकून आक्रोश करू लागले. माझ्या भावना अनावर झाल्या. बऱ्याच वर्षानंतर परमेश्वराने केलेल्या कृपेमुळे माझ्या मनात कृतज्ञता दाटून आली व मी रडू लागले. रात्री उशिरा ध्यान सभागृहात लावण्यासाठी भगवंताचे नवीन फोटो आले. आम्ही पुन्हा भगवंताची आरती केली. फोटो खूप सुंदर होते. मी पुन्हा पुन्हा भगवंताच्या कृपाळूपणाचा विचार करत होते. त्यांचा महिमा आपण कसा वर्णन करू शकू.

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा