ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १५ , श्लोक २
त्रिगुणांनी पोषण केलेल्या या वृक्षाच्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत. डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत. या वृक्षाची मुळे खालीही विस्तार पावून मनुष्याच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा, या यःकश्चित जीवाला पुरुषोत्तम योग दर्शव व त्याचे आचरण करायला लाव. अश्वत्थ वृक्षाप्रमाणे अव्यक्त असलेल्या ज्ञानाचा बोध करून दे. आदिनारायण ! अनाथरक्षका ! आपद्बांधवा तूच माझा आधार. शरणो शरणम्. प्रभू कन्हा, कन्हा, मला तुझ्या चरणी स्वीकारून आशीर्वाद दे.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा