ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १४ , श्लोक १२
हे अर्जुना ! रजोगुण वाढल्यावर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन काळाच्या इच्छेने कर्मांचा प्रारंभ अशान्ती आणि विषयभोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
हे कान्हा, रजोगुणाचे प्राबल्य वाढले की लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती व विषयभोगांची लालसा हे सर्व उत्पन्न होते. तुझी प्राप्ती व्हावी यासाठी मला प्रयत्न करण्यास प्रवृत्त कर. मला केवळ तुझे कार्य करण्याची बुद्धी दे. अशांतीपासून मला मुक्त कर. मला फक्त एकच इच्छा दे - तुझ्या प्राप्तीची इच्छा. हे वैकुंठीच्या राणा, कान्हा, तू माझा आश्रय आहेस. हे काळा, ये, ये, कृपा करून लवकर ये आणि या शनिला घेऊन जा. तू येशील तेव्हाच या जीवाचा अंत होऊ दे. तूच माझा आधार ! शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा