रविवार, ३१ डिसेंबर, २०२३


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " तुमच्या सर्व कर्तव्यांचा त्याग करा. परमेश्वर प्राप्ती हेच तुमचे कर्तव्य आहे."


कर्माचा हिशोब मिटला  

     
२२ जुलै २००७ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, माझं मोहिनीवरील लिखाण कसं आहे ?
स्वामी - तू म्हणालीस की विष्णू, मोहिनी म्हणून आले. मी मला वसंतमोहिनी म्हणून अलग केले.
वसंता - अगदी बरोबर, स्वामी.
स्वामी - या मोहिनीने मला भुरळ पाडून माझ्या हातातून कर्माचा हिशोब खेचून घेतला.
ध्यानाची समाप्ती.

           महाविष्णुंनी मोहिनीचे रूप घेतले. विष्णुंनी स्वतःला स्वतःपासून अलग करून मोहिनीचे रूप घेतले. दोघेही एकच आहेत. स्वामींनी स्वतःपासून मला निर्माण केले. कसे ते पाहू या. ज्याप्रमाणे विष्णू, मोहिनी बनून आले, त्याचप्रमाणे स्वामींनी स्वतः ' आधुनिक पार्वती' चे रूप घेतले.
*हे रूप, मी १२ वर्षांची असताना जशी होते तसेच आहे. १९५० साली, स्वामींनी स्वतःचे चष्मा घातलेल्या ' आधुनिक पार्वती ' चे रूप दाखवून नंतर पुन्हा बाबांचे रूप धारण केले.

* लिबरेशन हिअर इटसेल्फ राइट नाऊ, भाग ३ पहा.  

   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २८ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. सुरवातीला जरी ते यांत्रिकपणे होत असेल तरी नाम घेत राहा. भाव आपोआप येतील. "


कर्माचा हिशोब मिटला  

 

          क्षीरसागराप्रमाणे मी माझं हृदय घुसळून काढलं. जसजशी मी घुसळत राहिले, तसतशा अनेक गोष्टी प्रकट झाल्या. राधा, दुर्गा, महालक्ष्मी, रुक्मिणी, सीता आणि सत्यभामा सगळ्या आल्या. अंतर्यामी तांदळाच्या अग्राच्या आकाराचा असलेला लहानसा निळा प्रकाश मोठा होत गेला. आज्ञाचक्राशी राधाकृष्णाचे, शिवशक्तीचे  मिलन झाले. तरीसुद्धा मी घुसळतच राहिले. सहस्रदलाच्या कमळातून अमृतकलश प्रकट झाला. आता त्या इवल्याशा निळ्या प्रकाशाला कोटी सूर्यांचे तेज आले व तो अमृतकलशाला जाऊन भिडला. त्याचा स्पर्श झाल्याबरोबर अमृतकलश फुटला आणि सहस्रारातून अमृत भरभरून वाहू लागले. त्याचा आवेग दुथडी भरून वाहणाऱ्या एखाद्या नदीप्रमाणे होता. हे अमृतमयी भाव स्तूप शोषून घेतो आणि त्याचा जगभर फैलाव करतो.
           स्वामी म्हणाले ' माझ्या हृदयाचे घुसळणे ', ' अमृतकलश फुटणे ' ते हेच होय. या अमृतकलशाच्या ओथंबून वाहण्याने कलियुगाच्या मातीचे परिवर्तन होईल, त्यामुळे त्याचे अमृतयुग येईल. मातीचं सुवर्ण होईल. माझे स्वामी! माझे प्राण ! माझे लाडके प्रभू संपूर्ण जग एका छत्राखाली आणतील. सर्वत्र फक्त प्रेमाचंच राज्य असेल.     

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २४ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

       भौतिक वस्तूंमधून मिळणारी शांती ही खरी शांती नव्हे, याचे जेव्हा मनुष्याला ज्ञान होते आणि तो शांतीचा मूलस्त्रोत्र शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या आध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ होतो. "


कर्माचा हिशोब मिटला  

 

          लोकांच्या सांगण्यावर माझा विश्वास बसतो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमधील गर्भितार्थ मला कळत नाही. जग हे असं आहे. मग मी विचार करते, "माझे प्रभू, स्वामीपण असंच बोलतात का ?त्यांनी मला सांगितले की ते मला नाविन्यपूर्ण रितीने हिरवी साडी देतील. प्रथम ते म्हणाले की ती देवलोकातून येईल, मग म्हणाले की एका अधिकाऱ्यामार्फत येईल. मी वाट पहात राहिले. शेवटी, ती खरोखरच विलक्षणरित्या आली. माझं साधंभोळं, खेडवळ मन, फक्त सरळ अर्थच समजू शकत. मुक्ति स्तूपाच्या उद्घाटन सोहळ्याच्यावेळी स्वामी म्हणाले की ते निळी साडी घेण्यासाठी पैसे देतील. त्यांच्याकडून रु. ३०००/- आले पण अप्रत्यक्षरितीने. माझ्यासाठी परमेश्वर प्रत्यक्षपणे काही करू शकत नाही का ? हा गुप्ततेचा बुरखा का ? मला काही समजत नाही. या जगात मला कळतं ते फक्त प्रामाणिक मनमोकळं प्रेम.   

   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





 

शनिवार, २३ डिसेंबर, २०२३

 ॐ श्री साई वसंतसाई साय नमः 

सूक्ष्म साई वा स्थूल साई 

              श्रीकृष्णाने त्याच्या वयाच्या ७५ व्या वर्षी, अर्जुनाला गीतेची शिकवण दिली जी कृष्ण लहान असताना गोपगोपिंनी आचरणात आणली होती. गीतेचा जन्म होण्याअगोदरच,त्यातील शिकवण साध्यासुध्या आणि निरक्षर गोपींनी त्यांच्या जीवनामध्ये आचरणात आणली होती. गीतेविषयी त्या अनभिज्ञ होत्या परंतु त्यांनी त्या मार्गावर वाटचाल केली आणि कृष्णभावामध्ये जीवन कसे जगावे हे दाखवून दिले. त्यांना कुटुंब होते मुलेबाळे होती,त्या सर्व घरकामही करत होत्या,दूध आणि लोणी विकण्यासाठी मथुरेला जात होत्या.
             ही सर्व कामे करताना त्या सदैव कृष्णाच्या चिंतनात गढलेल्या असत. त्यांचे जीवन म्हणजे कृष्णाने शिकवलेल्या कर्मयोगाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
 गोपगोपींचे जीवन म्हणजे एक जीती जागती गीता होती आणि त्यांची जीवन पद्धती म्हणजे योग होता कारण परमेश्वराच्या प्रेमामध्ये ते स्वतःला पूर्णपणे विसरून गेले होते त्यामुळे कर्मयोग, संन्यास योग, परित्याग मार्ग बनला. पूर्वीच्या काळी कृष्णाच्या सवंगड्यांनी वनात अथवा गुहेमध्ये जाऊन तप केले नाही परंतु ते सदैव कृष्णभावात जीवन जगले वृक्षवल्लीमध्येही त्यांनी कृष्णाला पाहिले.परमेश्वराला सर्वत्र पाहण्याचे त्यांना उपजत ज्ञान होते.
            ते त्रिगुणातीत असल्यामुळे त्यांना त्यांच्या उच्च अवस्थेची जाणीव नव्हती. ही त्रिगुणातीत अवस्था त्यांना जन्मजात प्राप्त होती.एवढेच नव्हे तर महाज्ञानी अक्रूरालाही या साध्याभोळ्या गोपींकडून ज्ञानाचा लाभ झाला. उद्धवाने जेव्हा राधेला आणि गोपींना मोक्षाची शिकवण दिली तेव्हा त्यांनी त्याला अत्यंत सोप्या शब्दात गीतेमधील तत्त्वज्ञान सांगितले. त्या म्हणाल्या," आम्हाला मोक्ष किंवा स्वर्ग नको, कृष्णचिंतनातील दिव्य आनंद आम्हाला पुरेसा आहे." अशा तऱ्हेने गोपींनी त्यांच्या प्रेमाखातर मोक्षाचाही त्याग केला. त्यांचे जीवन म्हणजे गीतेमध्ये शिकवलेल्या त्यागाचे आणि " सर्वधर्मान्परित्यज्य " या श्लोकाचेही उदाहरण आहे. श्री रामकृष्ण परमहंस यांनी म्हटले आहे की गोपी मुमुक्षु होत्या. मुमुक्षु सर्व तपस्वी योगी आणि जीवनमुक्तांहून श्रेष्ठ आहेत.
अशा गोपींच्या जीवनातून दर्शवली जाणारी गीता भगवानांनी अर्जुनाला शिकवली. अर्जुनामुळे अखिल जगताला गीता प्राप्त झाली. लोकांनी कृष्ण आणि गोपींच्या नात्याविषयी, चुकीच्या कल्पना केल्या आहेत. गोपी महाज्ञानी होत्या आणि देहभाव विसरून त्या दिव्य चैतन्यामध्ये समरसून गेल्या होत्या. लोकं त्यांची विशुद्ध भक्ती समजू शकत नाहीत. गोपींचे शुद्ध भाव जाणून घ्यायला हवेत. अज्ञानी लोकं रासलीलेचा गैरअर्थ लावतात. त्यांना परमेश्वरामध्येही दोष दिसतात. त्याचप्रमाणे, जे लोक देह भावामध्ये अडकलेले असतात त्यांना, प्रेम,भक्ति आणि मधुरभाव हे देहभाव आहेत असे वाटते.
             स्त्री साधकांनी अत्यंत सावध आणि दक्ष राहिले पाहिजे. निरंतर साधना करून त्यांनी देहभावाच्या पलीकडे जायला हवे.साधनेविना कोणतीही गोष्ट घडणे शक्य नाही. देहभावाला जिंकल्याशिवाय मधुरभाव अशक्य आहे. ते केवळ भगवानांचे नाव कलंकित करेल. जे लोक कृष्णा विषयी वाईट बोलतात तेच आज भगवान साईकृष्णाविषयीही वाईट बोलतात.
            गोपींसारखेच आपणही आपल्या भक्तीने आपल्या हृदयात राहणाऱ्या आत्मनिवासीला आपल्यासमोर साकार केले पाहिजे. हे केवळ पूर्णज्ञानाचा उदय झाल्यानंतरच शक्य होते. पूर्ण ज्ञान प्राप्त होईपर्यंत सर्व अनुभव, भ्रम म्हणजेच मनाचे खेळ असतात. आपण मनाच्या पलीकडे जायला हवे. ज्ञानाने चित्तशुद्धी होते आणि म्हणून आपले सर्व अनुभव सत्य असतात. या अवस्थेला पोहोचण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.
 प्रल्हादाच्या भक्तीने भगवान विष्णूंच्या नरसिंह अवतारास
खांबामधून प्रकट होण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे गोपींच्या भक्तीने, कृष्णाला प्रत्येक गोपीसाठी प्रकट होण्यास भाग पाडले. जर त्यांनी हे केले तर आपण का करू शकत नाही? जर आपण गीतेमध्ये आखून दिलेल्या मार्गावर वाटचाल केली तर आपण हे घडवून आणू शकतो. कृष्णाने त्याचा वयाच्या ७५ व्या वर्षी गीतोपदेश केला. गोपींच्या जीवनाचे उदाहरण असलेली गीता त्याने शिकवली. गोपींचे जीवन हीच गीता बनली. कृष्ण परमात्म्याने भगवान श्री सत्यसाई बाबा म्हणून जन्म घेतला आणि आपले जीवन गीता बनून जावे यासाठी ते आपल्याला गीतेची शिकवण देत आहेत. त्यांच्या वयाच्या ७५ व्या वर्षी, भगवानांनी मला माझे जीवन म्हणून नवीन गीतेचे लेखन करण्यास सांगितले.

श्री वसंतसाई

संदर्भ - श्री वसंत साईंच्या इथेच! या क्षणी!! मुक्ती!!! भाग - ३ या पुस्तकातून


जय साईराम

गुरुवार, २१ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      मन नेहमीच नाकारात्मकतेवर केंद्रित असते. त्याला सकारात्मक बनवा आणि म्हणा, " मी सर्वांवर प्रेम करतो." "


अमृतकलश फोडला 

 

          मी हे लिहित असताना मला आठवले, फ्रेड नेहमी म्हणतात की यज्ञ करताना मी यज्ञात आहुती दिलेल्या प्रत्येक समिधेवर तूप टाकते, एकही सुटू देत नाही. मी प्रत्येक काडीला तुपाने न्हाऊ घालते, तिला पवित्र आणि शाश्वत बनवते. समिधांची आहुती देताना मी म्हणते की मी प्रत्येक समिधेला मुक्ती प्रदान करीत आहे. या दिव्य दृश्यासाठी हे उदाहरण अगदी योग्य आहे.

 
२१ जुलै २००७ दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी, जर सर्व अवयव नीट झाले, तर मला हे शरीराच नको. तुम्ही घेऊन टाका. मी डॉक्टरकडे अजिबात जाणार नाही. मला या जीवनाची आवश्यकता नाही. मी पुन्हा जन्म घेईन आणि हा देह तुम्हाला पुर्णम् स्थितीत अर्पण करण्यासाठी साधना करीन. मी तुमच्याशी धडपणे बोलूही शकत नाही.
स्वामी - रडू नकोस. मी इथे कोणासाठी आलो आहे ? फक्त तुझ्यासाठी. जगातील दुःख पाहून त्यांना मुक्ती देण्यासाठी तू आलीस. मी तुझ्यामागे आलो. ह्याच कार्यासाठी आपण पुन्हा यायचं का ? बस ! आता पुरे झाले. धरतीचं परिवर्तन करून जाऊ या.
वसंता - अजून किती दिवस आपल्याला सोसावं लागणार ? जसा तुम्ही मला तुमचा डोळा दिलात, तसेच मला तुमचे दातही द्या.
स्वामी - तू जगात सर्वांना निर्दोष बनवणार आहेस. सर्व काही अमृतमय बनव. तू तो परीस आहेस, ज्याच्या स्पर्शाने लोहाचे सुवर्णात रूपांतर होते. तू सर्वांमध्ये प्रवेश करून त्यांचे भाव सुवर्णमय करतेस. तू कलिचे लोहयुग सत्याच्या सुवर्णयुगात बदलत आहेस.
वसंता - खरंच असं ]होईल का ? मी या प्रकरणाला ' अमृतकलश फोडला' असे नाव देईन.
स्वामी - लिही. अमृतकलश म्हणजे काय ? तुझ्या हृदयाच्या घुसळण्यातून अमृत आलं. तुझ्या हृदयातील प्रेमामृत उसळून वर आलं आणि सहस्राराला जाऊन भिडलं. सहस्त्रार उघडून ते वेगाने बाहेर पडत संपूर्ण जग व्याप्त करीत आहे. स्तूप हेच दर्शवतो.
ध्यानाची समाप्ती.

*     *     *

   

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




रविवार, १७ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      तुमच्या सर्व कर्तव्यांचा त्याग करा. परमेश्वर प्राप्ती हेच तुमचे कर्तव्य आहे. "


अमृतकलश फोडला 

 

           ही मोहिनी आकाशात उडते आणि सर्वत्र अमृताचा वर्षाव करते. कसा काय ? स्तूपाद्वारे ! माझे अमृतमयी भाव स्तूपाद्वारे संपूर्ण अवकाश व्यापून ढगात शिरतील आणि अमृतवर्षाव होईल. अमृतमयी हवा आल्हादक शांती देते. वाऱ्याच्या झुळुकीने अग्नी उद्दीपीत होतो. अमृतमय ज्योतीचा अग्नी बनून पावित्र्य विस्तार पावते. या अमृतविश्वात शारीरिक, मानसिक आणि आत्मिक व्याधी राहतीलच कशा ? वृद्धत्वच नाही तर मृत्यु कसा ?  कुठे मन ? कुठे माया ? हे एक आनंददायी वैश्विक नृत्य आहे. हे मोहिनीचं आनंदी विश्वनृत्य, अमृतनृत्य आहे.
            या मोहिनीला तिच्या नृत्याच्या आवेगात कलश फोडून इकडेतिकडे धावत अमृत शिंपडताना मी पाहिले. तिची इच्छा तृप्त होत नाही. तिने मातीचा कण न कण अमृताने ओथंबून टाकला. सगळीकडे अमृताचा शिडकाव केला. काहीही किंवा कुठलीही जागा बाकी राहू नये याची ती कटाक्षाने काळजी घेत होती.        

 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही. "


अमृतकलश फोडला 

 

            मोहिनी नृत्याच्या सौंदर्याची भुरळ पडून असुरांना अमृताचा विसर पडला. ह्या वसंतमोहिनीच्या नृत्याने संपूर्ण जग भारावून जाईल, परंतु ती अमरत्वाच्या अमृतात सर्वांना समान भागिदार करून घेईल. ह्या विष्णूमोहिनीने हातात न्यायाचा- तराजू घेतला आहे. मुंगीपासून ब्रह्मापर्यंत सर्वांना ती सारखेच अमृत देईल. तिचे नृत्य असुरांना भुलवण्यासाठी नाही तर साईविष्णुंना प्रसन्न करून त्यांच्या हातात असलेले कर्माचे हिशोब नाहीसे करण्यासाठी आहे. हे नृत्य मायावी नाही. हे सर्वांनी अज्ञानातून बाहेर येऊन जागृत होण्यासाठी केलेलं प्रेमनृत्य आहे. ती स्वतःच्या डोक्यावरचा अमृतकलश फोडून पृथ्वी, आकाश, पाणी, हवा आणि अग्नी या पंचमहाभूतांमध्ये अमृत शिंपडते आहे. ती सर्वत्र अमृताचा वर्षाव करीत आहे. धरती अमृताने चिंब भिजत आहे. यापुढे बियाणे अमृतमयी मातीत रुजतील. या बियाणांपासून अमृतमय रोपे उगवतील. या रोपांपासून मिळणारे धान्य, फळे ही अमृतमयी असतील. जे ही फळे खातील त्यांना अमरत्व प्राप्त होईल. इथे दानवी धन्य उगवणारच नाही. बियाणे, मुले, रोपे, झाडे, फळे सर्व काही अमृतमयी असतील.     
 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, १० डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " तोंडातून येणार प्रत्येक शब्द, आपण आपले जीवन कसे जगू हे निर्धारित करतो. "


अमृतकलश फोडला 

 

मोहिनीचे नृत्य
            क्षीरसागर मंथनातून महालक्ष्मी प्रकट झाली. त्यानंतर धन्वंतरी  अमृतकलश प्रकट झाले. देव आणि असूर दोघांनीही अमरत्व हवे असल्याने क्षीरसागरमंथन केले. जेव्हा धन्वंतरी हातात अमृतकलश घेऊन प्रकट झाले, तेव्हा असुरांनी तो हिसकावून घेतला आणि पळून गेले. त्यावेळी महाविष्णूंनी मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचे रूप घेतले. सर्वजण तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाले. तिने स्वतःच्या हातानी सर्वांना अमृत वाटण्याची व्यक्त केली आणि सर्वांना ओळीत बसण्यास सांगितले. देव आणि दानव दोन वेगवेगळ्या रांगांमध्ये बसले. मोहिनीने दानवांना फसवून फक्त देवांनाच अमृत दिले.
           धन्वंतरी हा विष्णूचा अंश आहे. तो देवांचा डॉक्टर आहे. महालक्ष्मी ही क्षीरसागरातून प्रकट झाली आहे. महालक्ष्मी, धन्वंतरी आणि अमृतकलश एकाचवेळी जन्माला आले आहेत. महाविष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले आणि असुरांना फसवून फक्त देवांनाच अमृत दिले. मी सर्वांची जननी म्हणून आले आहे. वडील कदाचित मुलांमध्ये चांगला, वाईट असा भेदभाव करू शकतील परंतु मातेच्या नजरेत सर्व सामान असतात. मी धन्वंतरी होईन आणि सर्वांना अमृत देईन. कोणामध्येही असुरी वृत्ती राहू नये. मी प्रत्येकाला अमृतमय आणि शाश्वत करिन. मी सर्वांचे देवांमध्ये परिवर्तन करीन.  

 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

     रत्न - ११
 विराट पुरुष

          परमेश्वराने निर्मितीचा संकल्प केला आणि त्या संकल्पानंतर तात्काळ ओम हा ध्वनी उत्पन्न झाला आणि त्यानंतर विराट पुरुषाचे आगमन झाले.

विराट पुरुष म्हणजे काय?

           विराट पुरुष म्हणजे आलिंगन अवस्थेतील नर आणि नारी ही परमेश्वराची दोन अंग होय. त्या विराटपुरुषाने स्वतःला पुरुष आणि स्त्री असे दोघात विभागले आणि निर्मितीचा जन्म झाला.
           बृहदारण्यक उपनिषदामध्ये विराट पुरुषाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी शेंगदाण्याचा प्रतीक म्हणून वापर केला आहे. दाण्याचे दोन भाग विराट पुरुषाचे प्रतीक आहे.
           मी अगोदर लिहिलेल्या पुस्तकांमध्ये असे म्हटले आहे की जरी स्वामींचे आणि माझे रूप वेगवेगळे असले तरी आमचे भाव एकच आहेत. श्रीकृष्ण, सत्यसाई आणि प्रेमसाई यांचे भाव आणि राधा, वसंता आणि प्रेमा यांचे भाव एकच आहेत. माझ्या बाबतीत, केवळ भावच एक आहेत असे नाही.
           स्वामी आणि मी विराट पुरुषाचे स्वरूप आहोत. निर्मितीसाठी आम्ही विराट पुरुषाचे भाव विभागतो. राधा आणि प्रेमा यांच्यामध्ये हे भाव नाहीत. म्हणून मी त्यांच्याहून वेगळी आहे.

९ मे २००८ सकाळचे ध्यान
 
वसंता : स्वामी, प्लीज मला विराट पुरुषाविषयी काहीतरी सांगा.
 
स्वामी : विराट पुरुष दाण्याच्या दोन भागांप्रमाणे आहे. डाळ, वनस्पती आणि वृक्षांची बीजे यांना दोन भाग असतात. जर ते बीज दोन भागात विलग झाले तर त्याला अंकुर फुटत नाही. जेथे दोन भाग
संयुक्त होतात तेथे प्राणशक्ती असते. बिजाला अंकुर फुटण्यास ही शक्ती कारणीभूत होते. त्याचप्रमाणे विराट पुरुषालाही स्त्री आणि पुरुष अशी दोन अंग, दोन भाग असतात. त्यांच्यातून निर्मिती उत्पन्न होते.
           स्त्री आणि पुरुष यांच्यापासून सर्व निर्मितीस सुरुवात होते. मी नेहमी म्हणते 'मला स्वामी हवेत, मी तुमच्यावर प्रेम करते,' हे बीज आहे. माझे पावित्र्य ही त्या बीजाची साल आहे. ह्या बीजामधून प्रेमाची
प्राणशक्ती अंकुरित होते. 'ओम श्री साई वसंत साईसाय नमः' या मंत्रातून वृक्षाचे खोड, फांद्या आणि पाने साकार होतात. याचा अर्थ ओम श्री साई वसंत साई नमः हा वृक्ष आहे, ओम श्री साई वसंत साई नमः ही फांदी आहे, ओम श्री साई वसंत साई नमः पान आहे. स्वामींचे आणि माझे भाव ही प्राणशक्ती आहे जी वृक्ष फांद्या आणि पानांची निर्मिती करते.
           हा मंत्र विराट पुरुष मंत्र आहे म्हणून म्हणून सर्वत्र सत्यसाई आणि वसंताचा जन्म होतो.

 श्री वसंतसाई अम्मा

 

संदर्भ - श्री वसंत साई अम्मांनी लिहिलेल्या शिवसूत्र या पुस्तकातील १७ व्या प्रकरणांमधून हा उतारा घेतला आहे.
 


जय साईराम

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार आपण कसे जगणार हे ठरवतो. "


अमृतकलश फोडला 

 

दिव्य दृश्य

... मी धन्वंतरी आहे. मीच धन्वंतरी, वैश्विक डॉक्टर आहे. मी माणसाचे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक रोग नष्ट करीन. मी क्षीरसागरातून प्रकट झाले, तेव्हा अमृतकलशही प्रकट झाला. मी धन्वंतरी आहे. मी, अमृतकलश आणि धन्वंतरी आम्ही तिन्ही क्षीरसागरातून प्रकट झालो. तिन्ही एकच आहोत. मी माझ्या हातात अमृतकलश घेऊन सर्वांना अमृत देईन. मोहिनी आली आणि तिनी ते फक्त देवांना दिले. असुरांना नाही दिले गेले. फक्त देवांनाच का बरे ? असुरही माझीच मुले आहेत. मी अमृत सर्वांनाच देईन. मी अमृतकलश फोडीन आणि धरती, आकाश,पाणी,हवा,अग्नी सर्वांमध्ये अमृताचा शिडकाव करीन. मी प्रत्येकाला अमृत देईन. असुरी वृत्ती अमृतमय होऊ देत. हे सर्व मी करिन. मी धन्वंतरी आहे. मी संपूर्ण जग अमृतमय करीन.
          हे दिव्य दृश्य मी दोनदा ध्यानात पाहिले.
         ध्यानाची समाप्ती  

 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम








रविवार, ३ डिसेंबर, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      परमेश्वराला आपण काय समर्पित करतो हे महत्वाचे नसून कसे समर्पित करतो हे महत्वाचे आहे. "


अमृतकलश फोडला 

 

संध्याकाळचे ध्यान
वसंता - स्वामी ! माझे प्रभू ! मला दात, डोळे...सर्व काही नवीन द्या.
स्वामी - सगळं काही ठीक होईल. मी म्हटलं नाही का, की सर्व काही तूच करणार आहेस म्हणून !
वसंता - नाही. तुम्हीच द्यायला हवं. मी काही करणार नाही.
स्वामी - ठीक आहे, मीच सगळं काही करिन. आता रडू नकोस.
वसंता - दात, डोळे, शरीर सगळं काही पुर्णम् होऊनच तुम्हाला अर्पण व्हायला हवे. मी डॉक्टरकडे अजिबात जाणार नाही. जगात इतके रोग का बरे आहेत ?
स्वामी - तू स्वतःला बरं कर. तू स्वतःच सर्व काही करू शकतेस?
वसंता - स्वामी, प्रभू धन्वंतरींनी शारीरिक, मानसिक आणि आत्मिक रोग बरे करायला हवेत.
 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम







गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " जसे लोखंड वितळवून साच्यात ओतले जाते तसेच आपण पुन्हा पुन्हा आपले जीवन भक्तीमध्ये वितळवून आध्यात्मिक शिस्त अंगी बनवली पाहिजे. "


अमृतकलश फोडला 

           स्वामींनी जे सांगितले त्यावर मी चिंतन केले.
           ...' मी डेंटिस्टकडे जाणार नाही. स्वामींनाच मला बरं करू देत. ते कित्येक लोकांसाठी काय काय करत असतात. मग ते माझ्यासाठी का नाही करत ? काय, स्वामी मला क्षणात नाही बरं करू शकत ! पण ते माझ्यासाठी काहीच करत नाहीत. एकच चमत्कार !आणि माझे दात ठीक होतील.
मी बैचेन होते.
२० जुलै २००७ सकाळचे ध्यान
वसंता - स्वामी !माझे प्रभू ! माझा देह तुम्हाला अर्पण करण्यायोग्य होईल का?
स्वामी - सर्व काही तूच करशील.
वसंता - खरंच स्वामी ? माझे दात सशक्त होतील का ?
स्वामी - यात काय शंका आहे ? जर तुझे भाव जगपरिवर्तन करू शकतात, तर ते तुला नाही बदलू शकणार ?
 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम






रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " परमेश्वर केवळ एकच आहे, आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत. हे सत्य आहे. "


अमृतकलश फोडला 

         त्वचारोगतज्ञ म्हणाले की दातांमुळे मला त्वचेची अ‍ॅलर्जी झाली आहे. मी ताबडतोब डेंटिस्टकडे जाऊन दात तपासून घ्यावे. मी, जावे का न जावे या संभ्रमात होते. मी स्वामींना प्रार्थना करून म्हटले की मी नाही जाणार.
संध्याकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, मी डेंटिस्टकडे जायला हवे का ?
स्वामी - नको
वसंता - स्वामी, माझा देह पूर्णम्व्हायला हवा.
स्वामी - तसेच होईल. डॉक्टरकडे जायची अजिबात गरज नाही. तू स्वतःच सगळं करशील.   

१६ जुलै २००७ ध्यान
वसंता - स्वामी माझ्या लिखाणाविषयी सांगा.
स्वामी - तू म्हणजे सर्वांचे सुवर्णात परिवर्तन करणारा किमयागारांचा परीस आहेस. तू मूळ धातूचेच सुवर्णात रूपांतर करतेस. लोहयुगाचे सुवर्णयुगात होत आहे.
वसंता - मी डॉक्टरकडे जाणार नाही. तुम्हीच मला बरं करा.
स्वामी - तू स्वतःच सर्व काही करशील. तू धन्वंतरी आहेस.
ध्यानाची समाप्ती 

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

वसंतसाई अम्मांचा जन्मदिन संदेश

सत्ययुग कसे उदयास येईल!



 वसंता : स्वामी, तुम्ही मला हवे आहात, तुम्ही मला हवे आहात.

स्वामी : प्रेम साई अवतारातील आपल्या मुलाप्रमाणे, मला धरून ठेवून तू म्हणतेस, 'तुम्ही मला हवे
आहात, तुम्ही मला हवे आहात.'
 
वसंता : स्वामी, मला फक्त तुम्ही हवे आहात.
स्वामी : तुझी तळमळ, तुझी आर्तता मला हलवून सोडते आहे. ही आर्तताच सर्वांमध्ये प्रवेश करून त्यांच्यामधील अंतर्यामीला हलवून सोडते आहे. प्रेमाच्या या अखंड माऱ्यामुळे, आत्मनिवासी जागृत होतो. साधू संतांची शक्ती त्यांच्या अंतरंगातच स्थित असल्यामुळे ते स्वतःला उन्नत करतात तथापि तू माझ्यासाठी अश्रू ढाळत असल्याने ती शक्ती बाहेर पडुन सर्वव्यापी परमेश्वरास हलवून सोडते.
वसंता : स्वामी, आपण लवकर भेटण्यासाठी माझ्यावर कृपावृष्टी करा. मला तुम्हाला भेटायचे आहे, लवकरात लवकर भेटायचे आहे! तुम्ही मला कधी बोलावणार?
स्वामी : आपल्या भेटीसाठी तू नेहमी अश्रु ढाळतेस. तू परमेश्वराला प्राप्त केले आहेस, त्याच्याशी एकत्व पावली आहेस तरीही असे म्हणून तू अश्रु ढाळतेस. तुझ्या सहस्रारातून उत्पन्न झालेली शक्ती बाहेर पडून सर्वांमध्ये असणाऱ्या शक्तीस धडक देते. सर्वांमध्ये असणारी ही कुंडलिनी शक्ती जागृत होऊन आज्ञा चक्रातील शिवास जाऊन मिळते. याच कारणासाठी तू आर्ततेने म्हणतेस, 'आपण भेटूया, आपण भेटूया.' जशी तुझी आर्तता आणि विलाप अधिकाधिक वाढत जातो तेव्हा शक्ती सर्वांमध्ये प्रवेश करते.

ध्यान समाप्ती

 जन्मापासून ते आता या क्षणापर्यंत स्वामींचा ध्यास, स्वामींची तृष्णा आणि 'मला स्वामी स्वामी हवेत' हा विचार, निरंतर माझ्यासोबत आहे. त्यांचा ध्यास माझ्या रक्तात भिनला आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणते, 'मला स्वामी हवेत, मला स्वामी हवेत.' ध्यानामध्ये मी स्वामींजवळ बसते, त्यांच्याशी बोलते तरीही माझ्या तृष्णा शमत नाही. श्वासाइतकीच स्वाभाविकपणे ही तृष्णा उत्पन्न होते. म्हणून स्वामींनी मला प्रेम साई अवतारातील दिव्यदृश्य दाखवले ज्यामध्ये त्यांनी म्हटले आमचा पुत्रही माझ्यासारखाच असेल.

 माझा अखंड विलाप केवळ स्वामीना नव्हे तर प्रत्येकामध्ये विद्यमान असणाऱ्या आत्मनिवासीलाही हलवून सोडतो. परमेश्वराचे हे अखंड चिंतन प्रत्येकामध्ये प्रवेश करून त्यांच्यातील अंतर्यामीला हलवून सोडते.

 सर्वसाधारणपणे आत्मसाक्षात्कारी व्यक्तींची शक्ती त्यांच्यामध्येच राहून ती त्यांना उन्नत पदाला नेते. माझ्या तपोबलाद्वारे मी अंतरंगातील परमेश्वराला पाहिले, त्याच्याशी संभाषण केले आणि ज्ञान प्राप्त केले तरीही माझे समाधान झाले नाही. त्याच्याविषयीची अखंड तळमळ आणि त्याला प्राप्त करण्याची दुर्दम्य इच्छा यामुळे ती शक्ती बाहेर पडून तिने सर्वांमधील अंतर्यामीला हलवले.

माझ्या मधील एका अंतर्यामीशी ऐक्य साधण्याने माझे समाधान झाले नाही म्हणून माझ्या मधील शक्तीने अखिल विश्वामध्ये जाऊन सर्वांमधील अंतर्यामीला जागृत केले. तिने सर्व व्यापी परमेश्वराला जागृत केले.

एखाद्याने साधना केल्यानंतर त्याच्या मधील आत्मनिवासी जागृत होतो आणि साधकाला मुक्ती प्राप्त होते तथापि माझी अवस्था वेगळी आहे. मी त्यावर संतुष्ट नव्हते मी परमेश्वरासाठी अधिकाधिक विलाप केला. या अतृप्त प्रेमाने सर्वव्यापी परमेश्वराला हलवले. त्याने सर्वांमधील ईशतत्त्व जागृत केले

"मला स्वामीना भेटायचे आहे, मला स्वामींना भेटायचे आहे." मी अक्रोश करत होते. पुण्याहून आल्यानंतर माझी तृष्णा अधिकच वाढली.

 जर एखाद्यास त्याची इच्छित वस्तू प्राप्त करण्यात अडथळा आणला तर ती इच्छा अधिकच तीव्र होते. जर आपण कोणाला म्हटले, "तेथे जाऊ नकोस." तर तो असा विचार करतो,'मी का बरं तेथे जाऊ नये? मी जाणारच.' हा विचार प्रबळतेने  त्याच्या अंतरंगातून उद्भवतो.

 दुसरे उदाहरण
 वर्तमानपत्राच्या जाहिरातीत म्हटले,' चौकटीमधील मजकूर वाचू नका.' वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा जाहिराती बनवल्या जातात. यामधून मानवी मनाची वृत्ती दर्शवली जाते. जर एखाद्याला एखादी गोष्ट करू नको असे सांगितले तर तो निश्चितपणे ती करतो.

त्याच प्रमाणे ज्या अडचणींना मी तोंड दिले त्या अडचणीनी🙌 माझी स्वामींच्या दर्शनाची इच्छा अधिकच तीव्र केली. स्वामींनी माझा स्वीकार करावा यासाठी मी ७० वर्षांपासून प्रतीक्षा करत आहे.

 आता मी स्वामींना एक अट घातली, " जर तुम्ही स्वतः मला बोलावले नाही तर मी तुमच्या दर्शनाला येणार नाही. जर तुम्ही मला बोलावले नाही तर मी पुट्टपर्ती, वृंदावन वा कोडाईकॅनालला येणार नाही." मी स्वतः माझ्याभोवती ह्या मर्यादा घालून घेतल्या, अशा प्रकारे त्यांना भेटण्याची माझी इच्छा अधिकाधिक वाढत आहे. मी त्यांची प्रार्थना करत होते, आक्रोश करत होते, "तुम्ही मला बोलवा."
मी साधना केली, मला आत्मज्ञान झाले, आणि मोक्षप्राप्ती झाली.
२००२साली वशिष्ठ गुहेमध्ये शुद्ध चैतन्य स्वरूपात माझा स्वामींशी योग झाला तरीही मी नेहमी म्हणत असते, " स्वामी मला तुम्हाला भेटायचे आहे, तुम्हाला भेटायचे आहे." ऋषीमुनींना साधना करून आत्मज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर देह त्याग करून परमेश्वरामध्ये विलीन होतात. मी देह त्याग केला नाही. मी स्वामींना भेटण्यासाठी येथे विलाप करत आहे. या आर्त तळमळीतून निर्माण होणारी शक्ती बाह्य जगतात जाऊन सर्वांमधील कुंडलिनी शक्तीला धडक देते. सर्पाप्रमाणे वेटोळे घातलेली ही शक्ती मूलाधारामध्ये सुप्तावस्थेत स्थित असते. ती जागृत झाल्यावर एकेक चक्र भेदून आज्ञा चक्रातील शिवाला भेटते. येथे शिव आणि शक्तीचे मिलन होते. हे मिलन म्हणजे परम आनंदाची अवस्था होय. ही अवस्था मी प्राप्त केली
तथापि माझ्या सहस्रारामधून स्वामींना भेटण्याची तृष्णा उत्पन्न होत आहे , सतत वृद्धिंगत होत आहे. सर्वांमधील कुंडलिनी शक्तीला ती जागृत करते आणि शिव आणि शक्तीचे मिलन होते. या दोन्ही अवस्था, सत्ययुग कसे निर्माण होईल हे दर्शवतात.
 "मला स्वामी हवेत, मला स्वामी हवेत" ही तृष्णा बाह्य जगतात जाऊन सर्वांमध्ये वास करणाऱ्या विश्वव्यापी, आत्मनिवासीला हलवते. 'मला स्वामी हवेत, मला स्वामींना भेटायचे आहे  ही तृष्णा बाहेर पडून सर्वांमधील कुंडलिनी शक्तीला जागृत करेल. हललेला शिव आणि जागृत झालेली शक्ती यांचे मिलन होते, आज्ञा चक्रात त्यांचे ऐक्य होते.

 हे ऐक्य प्रत्येक वस्तूमध्ये आणि प्रत्येकामध्ये घडेल. विश्वव्यापी परमेश्वर आणि विश्वव्यापी शक्ती यांचे मिलन म्हणजेच सत्ययुग होय!
ही व्यक्तिगत जागृती आणि वैश्विक जागृती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतात.

 जेव्हा व्यक्तिगत जागृती होते तेव्हा विश्वाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होतो. आतापर्यंत हे कलियुग विश्व आहे. *जागृती नंतर ते सत्ययुगानुसार कार्यरत होईल.*

 श्री वसंतसाई अम्मा

संदर्भ - श्री वसंतसाई अम्मांच्या 'शिवसूत्र' (प्रकरण सहा- दिव्य मिलन) या पुस्तकातून हा उतारा घेण्यात आला आहे.
 

 

जय साईराम




 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

अम्मांच्या सत्संगातून....

आज मी स्वामींचा तमिळमधील सनातन सारथीचा या महिन्याचा अंक वाचला. त्यातील स्वामींच्या दिव्य संदेशात त्यांनी असे म्हटले आहे,  हा कलियुगातील काळ अत्यंत वाईट आहे. सर्वांनी परमेश्वराचे नामस्मरण करुन आपल्या उच्चार, विचार आणि आचार केवळ स्वामींनी व्यापलेले  असायला हवेत. माझे जीवन मी अशाप्रकारे व्यतीत केले आहे.

सर्वसाधारणपणे मनुष्य, मी, माझे आणि आसक्ती या भावांमुळे अतोनात दुःख, क्लेश सोसतो आहे. परमेश्वर आणि त्याची निर्मिती हे वेगवेगळे नाही  याचा बोध झाल्यावर त्याच्या दुःखाचा अंत होईल.

मनुष्य जन्मतः दिव्य आहे म्हणून त्याने आपले विचार, उच्चार आणि आचार यामधून प्रेम, सहनशीलता, करुणा आणि विनयशीलता हे दैवी गुण दर्शवले पाहिजेत.

 प्रेम ईश्वर आहे आणि ईश्वर प्रेम आहे. तो सृष्टीच्या कणाकणामध्ये आणि प्रत्येकामध्ये विद्यमान आहे. सर्वांप्रति समान प्रेम दर्शवणे हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे तथापि या मार्गावर वाटचाल करताना मनुष्याने या मार्गावर येणाऱ्या अनेक अडथळ्यांना तोंड दिले पाहिजे.

 हे अडथळे कोणते आणि त्यावर कशी मात करायची हे सर्व
धर्मग्रंथांमध्ये दर्शवले आहे. क्रोध, इच्छा आणि आसक्ती हे मनुष्याचे तीन प्रमुख शत्रू आहेत.

जर हे दुर्गुण दूर केले नाही तर ते आपला विध्वंस करू शकतात. त्याची काही उदाहरणे आपण पाहूया
रावण काम वा इच्छांनी व्याप्त होता. त्याच्या या दुर्गुणामुळे केवळ त्याचाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला. दुर्योधनाच्या क्रोधामुळे हे महायुद्ध झाले आणि त्याची संपूर्ण वंशावळ नष्ट झाली. रणांगणावर, आसक्तीमधून निर्माण झालेली अर्जुनाची भ्रांती दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने गीतेची शिकवण दिली. भ्रांती आणि आसक्ती दूर करा, हा गीतेतील संदेश आहे.

स्वामींच्या एका कॅलेंडरवरील एक सुवचन आपण पाहूया

 "तुमच्या सर्व गोष्टींचे मूळ तुमचे विचार आहेत म्हणून तुमचे विचार केवळ उदात्त, पवित्र आणि शुद्ध असायला हवेत."
आता आपण जे जीवन जगतो आहे ते आपल्या गतविचारांनी निश्चित केलेले आहे. आपण स्वतःच आपले विधीलिखित लिहितो. शुद्ध आणि उदात्त विचार असणे अत्यंत आवश्यक आहे तरच आपण भविष्यामध्ये पवित्र जीवन जगू शकू.

- श्री वसंतसाई अम्मा


संदर्भ - हा उतारा अम्मांच्या नोव्हेंबर २०२३ च्या सत्संगातून....

जय साईराम


रविवार, १९ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " सर्व गोष्टींची अनुभूती घेण्याची इच्छा ठेवू नका तर सर्वांतर्यामी परमेश्वराची भक्ती करा. "


उतारा ( रामबाण औषध )

 

          ....माझं विश्वरूप आनंदमयी आहे. त्याचा कर्माच्या हिशोबांशी काहीही संबंध नाही. लोकांचा कर्म ऋणानुसार- जन्म होत नाही. मी त्यांचे कर्मांचे सर्व हिशोब नाहीसे केले. मी स्वयंभू आहे. सर्व माझीच प्रतिकृती आहे. मीच सर्व आहे. सर्वजण या वसंताची प्रतिकृती आहेत. मी स्वयंप्रकाशित सत्-चित्-आनंदरूप आहे. मी वैश्विक सत्यम-शिवं-सुदरं आहे. मी सदारहित प्रेमस्वरूप आहे. प्रेम हे सर्वांमध्ये दुथडी भरून वाहणारे मधुर अमृत आहे. हीच 'सर्वांवर प्रेम करा' ची स्थिती आहे.

*     *     *

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      जर तुम्ही सर्वांवर भरभरून प्रेम केलेत तर तेच प्रेम तुमच्याकडे येईल."


उतारा ( रामबाण औषध )

 

          प्रभू श्रीकृष्णाने अर्जुनाला त्यांचे विश्वरूप दाखवले. ते काळाचं विश्वरूप होतं, सर्वांचा संहार करणारे रौद्ररूप होते. अर्जुनाने प्रभूच्या जबड्यात सर्व जीव चिरडले जाताना पाहिले. सर्वांचा भयावह मृत्यु पाहून त्याचा भीतीने थरकाप झाला. मी माझे विश्वरूप पाहिले. ते नवनिर्मितीचं आंनंददायी नृत्य होत. हे रूप प्रलयाविना सर्वांचं परिवर्तन करते. हे रूप पाहताना जराही भीती वाटत नाही, किंबहुना ते सर्वत्र आनंद देते. त्याची व्याप्ती काळ अथवा स्थानापुरती मर्यादित नाही. ही अमरत्वाची स्थिती आहे.
          २८ जून २००७, दुपारचे ध्यान
वसंता - स्वामी, प्लिज मला कृष्णाच्या विश्वरूपाविषयी आणि शक्तीच्या विश्वरूपाविषयी थोडं अजून सांगा नं !
स्वामी - कृष्णाने परमेश्वराचे कालरूप प्रकट केले. ते संहार दाखवते. शक्ती परिवर्तनाचे  कार्य करते. अर्जुन बंधमुक्त व्हावा म्हणून श्रीकृष्णाने त्याला गीता  शिकवली. तू तुझ्या आनंददायी रूपात सर्वांचे परिवर्तन करते आहेस. कृष्णाचे कालरूप हे कर्मकायद्यानुसार होते. त्याने सर्व सजीवांना गिळंकृत केले. तुझे रूप हे आनंदमयी आहे. त्याचा कर्माच्या हिशोबाशी काही संबंध नाही. हे स्वयंभू रूप आहे; तू तुझी निर्मिती सगळीकडे पाहत आहेस.
ध्यानाची समाप्ती

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, १२ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."


उतारा ( रामबाण औषध )


           दुसरी अतिशय महत्वाची शक्ती स्वामींनी मला देण्यास सांगितली ती म्हणजे आत्मसंन्यास. गृहस्थजीवन जगणाऱ्या साधकांना ती उपयुक्त आहे. ती विश्वरूप घेते तेव्हा सर्वजण बंधमुक्त होतात. सर्वजण संन्यासी जीवन जगातील. *' मी विना मी ' चं **'मी आहे मी ' मध्ये परिवर्तन होईल. सर्वजण कर्मयोगी म्हणून जीवन जगातील. स्वामी म्हणाले की त्यांच नाव प्रेम आहे, त्यांच स्वरूप प्रेम आहे. माझ्या उग्र तपश्चर्येमुळे पुढील अवतारात मी 'प्रेमा' नाव मिळवले आहे. माझा प्रेममय स्वभाव हाच वसंतमयम् सृष्टीचा पाय आहे. हे संपूर्ण जग प्रेममय होईल. सर्वजण कर्मयोग्यांप्रमाणे बंधनमुक्त जीवन जगातील.
            हे संपूर्ण जग वसंतमयम्, प्रेममयमच आहे. हे जग विस्तृत प्रेमाने परिपूर्ण असेल. तिथे बंधनांचा लवलेशही नसेल. बंधने नसल्याने या जगातून अहंकार नाहीसा होईल.   


*'मी विना मी' - अहंकारी 'मी' च अहंकाररहित 'मी' होणं
** '
मी आहे मी' - 'मी' च ' विश्वात्मक 'मी', सर्वव्यापी चैतन्य होणं

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

      " जर तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तर सर्व विरोध आणि तिरस्कार नाहीसा झाल्याचे आढळून येईल."


उतारा ( रामबाण औषध )


           कलीचं विष जे दुष्ट कंपनांद्वारे अवकाशात व्यापले आहे त्याच्यावर हाच एक उतारा आहे. मुक्ती स्तूपाद्वारे, जगभर ह्या उताऱ्याचे विश्वस्तरावर इंजेक्शन दिलं जात आहे. झाडांवर जंतुनाशक औषधांची फवारा करीत आहे. ते संपूर्ण विश्वात भरून राहते. कोणाचाही अथवा कशाचाही गरज नाही. हा उतारा शुद्ध चैतन्य म्हणून अवकाश व्यापत आहे. आता धर्माचा ऱ्हास होणार नाही. स्वामींनी आणि मी भावपरिवर्तन केले आहे, हेच बियाणे आहे. सर्वजण नवीन निर्मिती म्हणून जन्माला येतील. व्यक्तीगत वसंताचे भाव, वसंतमयम् होण्यासाठी विश्वव्याप्त झाले आहेत.  


संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम