रविवार, १६ जुलै, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

        " आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यु कसा होतो हे महत्वाचे आहे. "


कर्मयोग उपाय 


           तुम्ही दुर्मुख रहाल तर इतरही उदासच दिसतील. हे जग एक आरसा आहे. तुमच्या स्वभावाचे प्रतिबिंब त्यात दिसते. आपण आनंदी असलो तर आपल्याला बदल्यात आनंद मिळतो. आपण निराश असू तर सगळं वातावरण दुःखद होतं. कशासही स्पर्श न करणे याचा अर्थ हाच आहे. या जगात कमलपर्णावर पाण्याचा थेंब पडण्यासारखं राहण्यास शिकणे म्हणजेच आपल्याला काही स्पर्श होऊ न देणे.
           कसे ते आपण उदाहरणासह पाहू या. बटाट्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. तळलेले बटाटे, सांबार, वेफर्स इ. एक भाजी निरनिराळ्या प्रकारे वापरता येते. त्याचप्रमाणे परमेश्वर हा संपूर्ण निर्मितीचं मूळ आहे. एखादी व्यक्ती चांगली, वाईट असू शकते, परंतु सर्वांच्या अंतर्यामी वास करणारा परमेश्वर एकाच आहे. एकदा हे सत्य आपणास उमजलं की मग आपल्याला काहीही स्पर्श करणार नाही. ही सगळी त्याची लीला आहे, त्याचा खेळ आहे, हे कळले की आपल्याला परमेश्वराच्या मधुर रसाची चिरंतन, ठायी ठायी, अनुभूती मिळेल.


संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा