ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यु कसा होतो हे महत्वाचे आहे. "
२
कर्मयोग उपाय
बाळकृष्ण खूप खोडकर होता. तो त्याच्या सवंगड्यांबरोबर गोप[गोपींच्या घरी जाऊन लोणी चोरत असे आणि मटके फोडीत असे. गोपी कधी त्याच्यावर रागवत नसत, कारण त्यांना परमेश्वराच्या खोड्या आवडायच्या. प्रभूचा खेळ आहे हे मानले पाहिजे. संपूर्ण सृष्टी ही त्या एका परमेश्वराचा खेळ आहे, जो अनेक झाला आहे हे आपण जाणले पाहिजे. सगळ्यात प्रभूचे माधुर्य पाहणे हाच रासलीलेचा गर्भितार्थ आहे. जर कुटुंबात कोणी तुम्हाला त्रास देत असेल, तर ती कान्हाची लीला समजा. त्या व्यक्तीचा क्रोध म्हणजे प्रभूचा क्रोध समजा. एखाद्याच्या वर्तणुकीनी तुम्ही नाराज झालात तर कवी भारतियारांच्या खालील पंक्ती आठवा,
...'कान्हा, तू इतकं चविष्ट फळ खावयास दिलं
मी आनंद घेत होते, इतक्यात तू ते खेचलंस '
संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा