रविवार, २३ जुलै, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

        " आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यु कसा होतो हे महत्वाचे आहे. "


कर्मयोग उपाय 

           कृष्णच कर्ता करविता आहे याचा विसर पडू देऊ नका. ह्याचाच राधा आणि गोपिकांनी आकंठ आनंद अनुभवला. त्यांनी चराचरात, ठायी ठायी फक्त कृष्णच पाहिला. संपूर्ण जग हे कृष्णाचा अमृतमय खेळ आहे. फार वर्षांपूर्वी मी एक कविता केली होती.
हे जग आहे कृष्णलीलामृत
इथे किती हा आनंद
कूजन पक्ष्यांचे, नृत्य मोरांचे
तरंगणारी फुलपाखरे, पळणारी हरणे
शिखरे उत्तुंग, दऱ्या खोल
नानाविधरंगी वृक्ष फुलांचा बहर
हिरवे हिरवेगार गालिचे
नाही का हे देती तुजसी आनंद ?

मानवात दिसती महात्मे थोर
जणु उत्तुंग पर्वत
त्यासवे असती संकुचित स्वार्थ परायण,
जणू सपाट भूप्रदेश
अन् आहेत अस्वस्थ काही
जशा समुद्रलहरी

काही असती पाषाण हृदयी,
काही मृदुल, जशा लतावेली,  
डुलती मंद झुळुकेनी,
काही विहंगासम मुक्तात्मे,
घेत भरारी अध्यात्म गगनी
काही स्वार्थी माणसे,
स्वकवचात फसती खेकड्यासम

माणसांचे विभिन्न स्वभाव !
आनंदानुभव घ्या त्यातून
लक्ष असू द्या एकात्मतेवर
हेच आहे सत्य
ही भिन्नताच करी संस्कार
आणि बीज पेरी पुनजन्माचे

किती भिन्न निर्मिती ही !
किती भिन्न स्वभाव तरी !
हे साई ! दर्शन होते सर्वांमधून तुझ्या कृपेचे.
उणेदुणे काढणे आणि मन गुंतवणे
हे निव्वळ अज्ञान असे !


संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा