रविवार, ९ जुलै, २०२३

 

                       ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
        " आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यु कसा होतो हे महत्वाचे आहे. " 
कर्मयोग उपाय 

         एस.व्हीं. नी इथे शंका काढली. ते म्हणाले, " तुम्ही म्हणता की कुठलीही घटना, व्यक्ती किंवा वस्तू आपल्याला स्पर्श करू नये आणि नामात त्याविषयी इच्छा उत्पन्न होऊ नये. याचा अर्थ असा होतो का की आपण जडभरताप्रमाणे राहावं ?"
         भरत नावाचा राजा जंगलात एकाकी रहात होता. हरणाचं पाडस एकटं पाहून त्याला दया आली. कालांतराने ह्या करुणेचे बंधनात रूपांतर झाले. त्याच्या अंतसमयी भरत त्याच्या पाळलेल्या हरणाच्या विचारात मृत्यु पावला. परिणामतः त्याचा हरणाच्या योनीत पुनर्जन्म झाला. त्याच्या पूर्वजन्माच्या साधनेमुळे त्याला माहीत होते की मायेच्या पाशामुळे आपल्याला हा जन्म मिळाला आहे. पुढील जन्मात तो कोणातही मिसळला नाही. स्थितप्रज्ञ राहिला. परिणामतः तो जडभरत म्हणून ओळखला गेला. सर्वांचा समज झाला की तो मंदबुद्धी आहे, पण नंतर एका राजाच्या निदर्शनास आले की तो महान ज्ञानी आहे.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा