गुरुवार, ६ जुलै, २०२३

                       ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
        " आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यु कसा होतो हे महत्वाचे आहे. " 
कर्मयोग उपाय 

          एखाद्याला स्वामींच्या देहरूपाच्या सान्निध्यात असल्यावर अनेक भावभावनांच्या अनुभव येईल. आपण सद्गदित होऊन रडतो; अधीर होतो, चोडखोर, अस्वस्थ, निराश होतो. त्याचप्रमाणे, ज्यांना 'मी', अहंकार आहे, ते कर्म करताना अनेक भिन्न भावना अनुभवतात. ते म्हणतात, " हे मी केलं. हे माझं कार्य आहे, माझी पत्नी, माझी मुलं, माझं कुटुंब. " 'मी आणि माझं ' ही भावना जागृत होते. या भावनांचे मनावर संस्कार उमटतात. आपल्याला ह्या अहंकाराचा 'मी' काढून टाकून विस्तृत विश्वात्मक 'मी' बनायचे आहे. 
          उदा. जेव्हा मी म्हणते, 'मी वसंता आहे ', तेव्हा मी ह्या एका नावारूपाशीच संबंधित राहते; भेवभाव उत्पन्न होतो. मला वाटते की जे माझ्या ह्या रूपाशी निगडीत आहेत तेच माझे आणि इतर माझ्यापासून वेगळे आहेत. हे अलग करणेच कर्माचे कारण आहे. मी सर्वांमध्ये आहे आणि हा एक आत्माच अनेक बनला आहे, हे एकदा उमजले की आपण स्वच्छंद पक्षी होऊ.

संदर्भ - कर्मकायद्यावर उपाय 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा