ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय. "
३
तप
मी स्वामींच्या ' विद्या वाहिनी ' पुस्तकाचे पान नं. २० उघडले. त्यातील पुढील उतारा वाचला...
हिमालयकन्या पार्वती ही सुंदरतेत रूपाची खाण होती. असे असूनही स्वतःच्या सौंदर्याचा तसेच माहेरच्या ऐश्वर्याचा अहंकार जाळून टाकण्यासाठी आणि सत्वगुण आचरणात आणण्यासाठी तिला कठोर तप करावे लागले. तिला आत्मिक सौंदर्यानी उजळावं लागलं ! मन्मथ, कामदेवाने शिवाचे पार्वतीच्या सौंदर्याकडे लक्ष वेधण्याची योजना आखल्यामुळे तो जाळून [खाक झाला अशी पौराणिक कथा आहे. ह्या घटनेतून असं निदर्शनास येतं की जोपर्यंत माणूस अहंकाराच्या वेटोळ्यात फसलेला असेल तोपर्यंत तो दिव्य ज्ञान, विद्या मिळवू शकत नाही. तो विद्येने परिपूर्ण होतो, तेव्हा अहंकार नष्ट होतो ...
संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा