ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
रत्न - ६
स्वामी म्हणाले, "मनामधून जेव्हा पशुभावांचा क्षय होतो तेव्हा त्याऐवजी दिव्य भाव ओसंडून वाहण्यास सुरुवात होते."
सर्वांची मनं काम, क्रोध, लालसा, अहंकार, द्वेष, आसक्ती आणि घृणा यासारख्या पशुवृत्तीने व्यापलेली आहेत. हे सर्व अमानवी भाव आहेत आणि ते मनातून काढून टाकले पाहिजेत. मनुष्याचा सच्चा गुण म्हणजे केवळ प्रेम, प्रेम आणि प्रेम. स्वामींनी आपल्याला जीवन जगण्याचा एक साधा सोपा मार्ग शिकवला आहे, ' सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा', ' सदैव मदत करा, कोणालाही दुखावू नका '. जर तुम्ही त्यांच्या कोणत्याही सोप्या साध्या शिकवणीचे अनुसरण केलेत तर तुमच्या मधील वाईट वृत्ती तुमच्या मनामधून पलायन करतील.
'विनयशीलता' हे खऱ्या शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे. खऱ्या शिक्षणाने मनुष्याला नम्र बनवले पाहिजे अन्यथा ते निरर्थक आहे. पदव्या आणि ६४ कलांमध्ये प्राविण्य मिळविण्याचा काय उपयोग? यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला मुक्ती प्रदान करणार नाही. काल मी नारदाविषयी लिहिले ज्यानी ६४ कलांमध्ये प्राविण्य मिळवले होते. रावणालाही हे ज्ञान होते आणि तो कैलास पर्वतही उचलण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे होते. तथापि त्याच्यामध्ये अनेक दुर्गुण असल्यामुळे त्याचे सर्व ज्ञान वाया गेले. त्याच्या दुर्गुणांमुळे त्याचा स्वतःचा आणि त्याच्या समस्त असूर वंशाचा नाश झाला आणि म्हणून सर्वांनी काळजी घ्या, अहंकार आणि दुराभिमान तुम्हाला पशु बनवेल. तुमच्या मधील दुर्गुणांना दूर करण्यासाठी आणि सर्वांप्रति विनम्रता बाळगण्यासाठी प्रयत्नशील राहा. सर्वांप्रति तुमचे प्रेम भरभरून वाहू दे. जर परमेश्वर सर्वांचा अंतर्यामी आहे तर तुम्ही एखाद्याविषयी क्रोध व घृणा कशी दर्शवू शकता? जर तुम्ही एखाद्यावर क्रोधित झाला तर तो क्रोध केवळ त्यांच्यामध्ये वास करणाऱ्या परमेश्वराप्रत पोहोचतो.
श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे,
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः । मनः षष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति ॥
येथे कृष्णाने घोषित केले आहे की तो सृष्टीच्या प्रत्येक कणामध्ये विद्यमान आहे. जर असे आहे तर तुम्ही इतरांना क्रोध कसा दर्शवू शकता? परमेश्वरावर कसे क्रोधित व्हायचे? सावधानता बाळगा, अत्यंत सावधानता बाळगा.
स्वामी भूतलावर आले आणि त्यांनी वेद, उपनिषद, गीता आणि धर्मग्रंथांमधे असलेले ज्ञान सोपे करून शिकवले. त्यांच्या या शिकवणीद्वारे सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अध्यात्माचे आचरण करू शकतात. या साधनेने पशुवृत्ती नष्ट होऊन दिव्य भाव प्रवाहित होतात.
आपण सत्य, धर्म, प्रेम आणि अहिंसा हे दिव्य भावं विकसित केले पाहिजेत त्यानंतर शांती आपोआपच आपल्याकडे येईल. सनातन धर्म हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. तथापि आता धर्म मार्ग सोडून सर्वजण अधर्मिक जीवन जगत आहेत. पूर्वीच्या काळातील लोक कसे सत्य आणि धर्म यांची कास धरून जीवन जगत होते! जर आपल्या मनात परमेश्वराप्रति भक्ती असेल तर आपण कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो. अशा तऱ्हेने साधना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

श्री वसंतसाई
संदर्भ - मार्च २०१८, प्रकरण - ४
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा