गुरुवार, २७ जुलै, २०२३

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार

         " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय. " 


कर्मयोग उपाय 

            निर्मितीतील सर्व काही परमेश्वराचेच आहे. जर आपण वडील, आई, बहीण, भाऊ इ. नात्यात आपलं मन अडकवलं, तर ती बंधने दूर करणे ही मुक्ती. तो खरा आनंद.
            'योगसूत्र ' पुस्तकात मी लिहिले आहे की प्राणायाम म्हणजे सगळ्यातून प्राणिक शक्ती ग्रहण करणे. हे कसं शक्य आहे ? सर्वांना तसेच सर्वकाही परमेश्वराशी जोडा. सर्वांमध्ये फक्त चांगले पहा, मग त्यांचे चैतन्य तुमच्यात वाहू लागेल. कोणाचेही दोष काढू नका. त्यापेक्षा इतरांनी तुमचे दोष दाखवले तर त्यावर ,विचार करा, परीक्षण करा व स्वतःला सुधारा, म्हणजे तुम्ही जन्ममृत्युच्या चक्रात अडकणार नाही.

*     *    *


संदर्भ- कर्मकायद्यावर उपाय

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा