रविवार, २८ डिसेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १७
       
            या दोघांव्यतिरिक्त एक परमपुरुष आहे त्याला परमात्मा म्हटले जाते. तो अविनाशी पुरुष तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, तू अविनाशी आहेस.  या नाशवंताच्या देहामध्ये प्रवेश कर आणि त्याची पोषण कर. तुझ्या दयेला अंत ना पार. हे करुणामूर्ती कमलनयना तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्. या पाप्याला पावन बनव आणि तुझ्या दिव्य चरणांशी घेऊन जा. हे जगद् रक्षका, त्रिलोकनाथा, त्रिमूर्तींच्या प्रमुखा, श्रीमन् नारायणा, तू मला आश्रय दे. मी तुला शरण आलो आहे.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २१ डिसेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १६
       
            या विश्वात नाशवंत आणि अविनाशी असे दोन प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे ही नाशवंत आणि जीवात्मा अविनाशी असे म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, यः कश्चित जिवाला अक्षर पुरुष होऊ दे. तुझा भक्त कर. गुणातीत बनव. स्थितप्रज्ञ कर. मुमुक्षू बनव, भगवत् कार्य करणारा बनव. श्रीमन् नारायणा! तूच आसरा! प्रभू, शरणो शरणम्. भगवंता, तुझ्या पादपुष्पांवर स्वीकारून आशीर्वादित कर. कान्हा तूच माझा आश्रय, कान्हा !

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

 

 

 

 

 

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १५
       
            मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती (अपोहन) होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. वेदान्ताचा कर्ता आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! तूच माझा आधार, सर्वांच्या अंतरात प्रवेश करून राहतोस. या चाकराच्या अंतरात मात्र का नाही? माझ्या भगवंता! अवमानांनी क्षीण झालेला या शरीरात या क्षणी येऊन राहा! सर्व गुणसंपन्ना! तुझ्यामुळे ह्याचे अंतर शुद्ध होऊ दे. चांगल्याचे स्मरण राहू देत आणि वाईटाचे विस्मरण होऊ देत. ज्ञान देऊन आशीर्वादित कर. जाणिवेच्या पलीकडे असलेल्या तुला जाणून घेऊ दे. माझ्या नाथा, प्रभू!

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १४
       
            मीच सर्व प्राण्यांच्या देहात प्राण आणि अपान वायूंशी संयुक्त वैश्वानर अग्नीरूप होऊन चार प्रकारचे अन्नपचवतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! करुणासागर! गौरमणा! वेणुगोपाला! या निरुपयोगी देहात येऊन वास कर. वैश्वानर होऊन चार प्रकारच्या अन्नाचे पचन कर. जिभेच्या चवीवर माझा ताबा राहू दे. नारायणनाम उच्चारण करायला लाव. प्राणायाम करण्यास प्रवृत्त कर. प्रल्हादास सहाय्य करणाऱ्या, याला तुझ्या चरणी घेऊन आशीर्वाद दे. तूच माझा निवारा! 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ७ डिसेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १३
       
            मीच पृथ्वीत (ग्रहलोकात) शिरून आपल्या शक्तिने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           वण्णमुडीया* ! वरगुण* मंगौ नेसा! वानवरकरसे कण्णा (स्वर्गधिपती कृष्णा )  या अगतिकाची तूच गती. शरणो शरणम्.  वीरराघवा, या वाईटातील वाईट निरुपयोगी जिवाचे रक्षण करून आशीर्वाद दे. सोमसुंदरा! सोमरस होऊन तू वनस्पतींचे रक्षण करतोस. या आळशाला तुझा चाकर बनवून तुझी सेवा करायला लाव. श्रीमन् नारायणा! तूच माझी गती ! शरणो शरणम्. 

*टीप :  वण्णमुडीया आणि वरगुण तमिळनाडूतील तीर्थे  

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम




रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १२
       
            अखिल जगताला प्रकाशमान करणारे सूर्याचे तेज तसेच चंद्राचे तेज, अग्नीचे तेज, हेच माझे तेज आहे. हे तू जाण.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, तू सर्व दीपांना प्रकाशमान करणारा दीप आहेस. हे प्रभू दीनाचा देह आणि आत्मा प्रकाशमान बनव आणि त्याला आपला बनव. संपूर्ण जग तुझ्या तेजाने उजळून निघाले असताना, या भंगलेला हृदयामध्येच घोर अंधकार का? हे गिरिधारी, हे मनमोहना, मला तुझा दास बनव. मला स्वयंप्रकाशित बनव. हे परमेश्वरा, मला आश्रय दे.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक ११
       
            योगीजनही आपल्या हृदयात  असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वतः जाणतात, परंतु ज्यांनी आपले अंत:करण शुद्ध केलेले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, या दीन जीवाला तुझ्या प्राप्तीसाठी श्रमणारा योगी बनव. तू माझ्या अंतःकरणात वास करतो आहेस, हे मला दर्शव. हे प्रभू! सप्तगिरीवासा, माझा माझ्यावर ताबा राहू दे. माझे अज्ञान दूर कर. अच्युता! हे हरितवर्णा, शेषशयना, तूच माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


भगवान बाबांचा जन्मदिन संदेश

श्री सत्य साईबाबांनी लिहिलेली वैश्विक प्रार्थना


हे प्रभो! माझ्या प्रेमाचा स्वीकार करा आणि ते तुमच्या समर्पित भक्तीच्या परिपूर्णतेत वाहत राहू द्या.

हे प्रभो! माझ्या हातांचा स्वीकारा करा आणि त्याना अखंडपणे तुमच्यासाठीच काम करू द्या.

हे प्रभो! माझ्या आत्म्याचा स्वीकार करा आणि तो तुमच्यामध्ये एकरूप होऊ द्या.

हे प्रभो! माझ्या मनाचा आणि विचारांचा स्वीकार करा आणि ते तुमच्याशी सुसंगत असू द्या.

हे प्रभो! माझ्या सर्वस्वाचा स्वीकार करा आणि मला तुमचे कार्य करणारे एक साधन बनू द्या.

प्रेम आणि कृपेसहित
— बाबा

जय साईराम 


गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १०
       
            देह सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा उपभोग घेत असता किंवा त्रिगुणांनी युक्त असतानाही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखू शकत नाहीत. केवळ ज्ञानदृष्टी असलेले ज्ञानीच हे सर्व पाहू शकतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, या शुद्राला ज्ञानचक्षू दे. मी हा देह सोडताना, या देहात असताना, विषयोपभोग घेत असता किंवा त्रिगुणयुक्त असता मला आत्मदर्शन होऊ दे. मला मूर्ख बनवू नकोस. जरी बनवलेस तरी तुझा महिमा गाणारा मूर्ख बनव. तुझ्यासाठी वेडा बनव. तुझा भक्त कर. वामना! उत्तमा! सत्या! तूच माझा आधार. लवकरात लवकर मला तुझ्या चरणी घे, कान्हा.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक ९
       
            याप्रकारे जीवात्मा कान, डोळे  त्वचा, जीभ, नाक आणि  मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो. 

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, प्रभू, तू आश्रयदाता आहेस. हा यःकश्चित जीव नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ यांच्याद्वारे विषयवस्तूंचा उपभोग घेतो. हे आदीपुरुषा, माझे मन त्यांच्यामागे न जाता तुझ्याकडे धाव घेऊ दे. हे नीलवर्ण मेघश्यामला! नित्यानंदा! जानकीरामा! श्रीमन् नारायणा, तू आश्रयदाता आहेस. शरणो शरणम्. कान्हा, या जिवाला ताबडतोब तुझ्या चरणांशी घे. मी तुला शरण आलो आहे. मला आश्रय दे.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            एस. व्ही. म्हणाले," श्री मनोहरनना (अम्मांचे पती) संन्यास घेण्याविषयी सांगायला हवे. आपण दोघं त्यांना सांगूया." एस. व्ही. त्यांना देवघरात घेऊन आले आणि मी म्हणाले," भगवान आणि केवळ मलाच नव्हे तर उद्या तुम्हालाही संन्यास घेण्यास सांगितले आहे. तुम्ही माझ्या गळ्यातून मंगळसूत्र काढून दुर्गेला समर्पित करावे. इथून पुढे आपल्यामध्ये कोणत्याही संसारिक बंधन असतील. हे घर आता आपले नसेल आपण आता विश्वाचे झालो. तुम्ही शेवटपर्यंत माझ्या कार्यात मला मदत केली पाहिजे."
 
            एस. व्ही. मनोहरनना विचारले," ही गोष्ट फक्त कुटुंबापूर्तीच मर्यादित ठेवायची का सर्वांना सांगायची?" तत्काळ ते उतरले," सर्वांना सांगा." मला आश्चर्य वाटले त्यांनी ती बातमी अत्यंत संयमाने व शांततेने घेतली. भगवान मला म्हणाले," त्यांचा त्याग अत्यंत महत्त्व महान आहे. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी तुझा त्याग केला. आजवर कोणीही हे केलेले नाही. वा कोणी करू शकणार नाही. त्यांना उच्च आध्यात्मिक पातळी प्राप्त होईल. ते अत्यंत सचोटीने व सत्यतेने हे कार्य पुढे नेतील. आतापर्यंत तू घरामध्ये संन्यासिनी सारखी वावरत होतीस, तू शास्त्रानुसार पूर्ण संन्यास घेणार आहेस हे आता सर्वांना ज्ञात होईल." एक महिन्यापूर्वी भगवानांनी मला ही बातमी सांगितल्यानंतर त्यांनी मनोहरनना मानसिक परिपक्वता (प्रगल्भता) द्यावी यासाठी मी त्यांच्याकडे प्रार्थना केली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक ८
 
           ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर वास्तूतील गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे देवादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीराचा त्याग करतो, त्या शरीरातून मनसहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन शरीरात जातो. 

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा ! या दीन जिवाने देह सोडताना, ज्याप्रमाणे गंध बरोबर घेऊन वारा वाहतो तसे इंद्रिये बरोबर घेऊन जाऊ नये, तर तुला घट्ट पकडून ठेवावे. तू हे कर. मरतेक्षणी तुझा विचार येईल असे विचार दे. तुझा विचार करतच मृत्यू येऊ दे. वासुदेवा! वैकुंठवासा ! या अतिमूर्खाला तुझ्या सुवर्णचरणांवर घेऊन आशीर्वादित कर. हा भूमीदेवाला भार होऊन अजून का जगतो आहे ? परमधामा ! दुवा दे. या अगतिकाची गती तूच. शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक ७
 
           या देहात हा जीवात्मा म्हणजे  माझाच सनातन अंश आहे आणि तोच भौतिक प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           हे कान्हा! तुझा अंश असलेल्या या जीवाला तुझे चरण प्राप्त होऊ दे. तू माझा आधार ! हे प्रभू! या दासाच्या मनात तू स्त्री आणि भूतल यांचा मोह का निर्माण करतोस? या जीवाला तू चाचपडायला का लावतो आहेस? गोपाला, क्रोध म्हणजे पापच नाही का? क्रोध नष्ट कर, गोविंदा तू माझा आश्रय आहेस. माझी इंद्रिय आणि मन तुझ्याजवळ ठेव. हे प्रभू! या दीनाला तुझ्याखेरीज दुसऱ्या कोणाचाही आसरा नाही. तूच त्याचा एकमेव आसरा आहेस. शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, २ नोव्हेंबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  ६
 
           त्या माझ्या परमधामाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करत नाही. जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, या पाप्याला तुझ्या परमपदी घेऊन जा. तिथे सूर्य, चंद्र आणि अग्नी अथवा प्रकाश नाही. या सर्व तेजांना प्रकाश देणारी ज्योती तू आहेस. या ह्या नीचाला तुझ्या सुवर्णकमलांवर स्वीकारून मुक्त कर. तुझ्या प्राप्तीसाठी झालेला जन्म, ह्या जन्ममृत्यूच्या रोगातून मला मुक्त कर. हे अजन्मा! या कुकरम्याचा तुझ्याशी योग होवो. याला तुझ्यापाठोपाठ यायला लाव. अजन्मा होण्याचा वर दे. परब्रम्हा! तूच माझा आश्रय. शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

   " यद भावं तद भवति."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक  
 
           जे खोटी प्रतिष्ठा, मोह आणि असत् संघापासून मुक्त आहेत, जे सदैव आत्ममग्न असतात, जे भौतिक वासनांमधून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखाच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत, मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे ते जाणतात, त्यांना शाश्वत धामाची प्राप्ती होते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, केशीचा संहार करणाऱ्या केशवा, गरुड वाहना, या पाप्याला तुझ्या चरण कमली आसरा दे. तूच माझा आधार. शरणो शरणम्. माझ्या इच्छा, क्रोध आणि लोक समूळ नष्ट होऊ देत. त्यातून निर्माण होणारे हे भोग आता पुरे झाले. अच्युता, तू मला आश्रय दे. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम