ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
प्रकरण - २
कुमारी पासून कुबेरापर्यंत
मी देवीचे दर्शन घेण्यासाठी कन्याकुमारीला गेले. (भारताच्या दक्षिणेकडील टोकावर या देवीचे मंदिर आहे.) मंदिरामधील ध्यान.
वसंता: स्वामी! तुम्ही मला कन्याकुमारीला येण्यास का सांगितले?
स्वामी: ये, मी तुला दाखवतो.
त्यावेळी बारा वर्षाची एक लहान मुलगी माझ्याकडे आली. तिने लाल रंगाचा, व निळ्या रंगाची लेस लावलेला परकर व पिवळी अर्धी साडी नेसली होती. ती साक्षात कन्याकुमारी असल्याचे मी जाणले. ती म्हणाली," मी माझी शक्ती तुला प्रदान करेन." असे म्हणून ती मला समुद्रामध्ये घेऊन गेली. मी मनाशी विचार करत होते ती मला समुद्रामध्ये घेऊन जात आहे... ती मला शक्ती कशी देईल? ती एका पाषाणावर बसली, मी ही तिच्याबरोबर बसले. तिने मला दूध भाताचे तीन घास (उंडे /गोळे) दिले. ते मी खाल्ले. त्यानंतर ती अदृश्य झाली.
मी मोठ्याने म्हणत होते केवढी ही करुणा दृश्यमधील देवाचे ते बाल रूप अत्यंत विलोभनीय होते तिच्या या कृपेची मी कशी उतराई होऊ?
त्यानंतर आम्ही समुद्रकिनाऱ्यावर गेलो. सूर्यास्त दर्शन केले. आकाशामध्ये सूर्य सुंदर सोन्याच्या गोळ्यासारखा दिसत होता. थोड्याच वेळात रंगछटा बदलून भगवी झाली. त्या भगव्या गोळ्याच्या वरती मला भगवान बाबा दिसले. हळूहळू तो नारंगी सूर्य क्षितिजापर्यंत आला आणि दृष्टीआड झाला.
स्वामींनी आपल्याला अगोदरच सांगितले आहे की काही वर्षांनी आपल्याला ते भगव्या ठिपक्यासारखे दिसतील. मी इतरांना म्हणाले," हा सूर्यास्त मला त्यांच्या त्या विधानाची आठवण करून देतो."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा