बुधवार, ९ एप्रिल, २०२५


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            भगवान शिवाशी विवाह करण्यासाठी देवी कन्याकुमारीने कठोर तप केले. अखेरीस परमेश्वराने तिचा स्वीकार केला व तिच्याशी विवाह करण्यासाठी ते सूर्योदय समयी येतील असे त्यांनी तिला सांगितले. कन्याकुमारीने विवाहाची सर्व व्यवस्था केली. दरम्यान काही असूरांचा वध करण्यासाठी नारद मुनींना तिची मदत हवी होती परंतु ती अविवाहित राहिली तरच हे घडणे शक्य होते. म्हणून नारदांनी तो विवाह रोखण्यासाठी एक अभिनव योजना आखली. त्यांनी कोंबड्याला सूर्योदयाच्या अगोदर बांग द्यायला लावली. कन्याकुमारीशी विवाह करण्यासाठी निघालेले भगवान शिव कोंबड्याची बांग ऐकून सुसीनथरम्  नावाच्या गावीच थांबले. त्यांनी सांगितल्या वेळी ते तेथे पोहोचू न शकल्यामुळे रागाच्या भरात कन्याकुमारीने सर्व अन्न व विवाहाची सर्व आभूषणे समुद्रात फेकून दिली आणि संन्यासी बनून पुन्हा तप सुरु केले.
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा