रविवार, ६ एप्रिल, २०२५


 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
    सुविचार  

         "मृत्युसमयी तुमच्या मनात असणारे विचार, तुमच्या पुढील जन्मासाठी बीज निर्मिती करतात. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 

अध्याय - २, श्लोक -२२

 
          ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो. त्याप्रमाणे आत्माही जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
 
           भगवान! हा दास मारतेवेळी जुनी वस्त्रे काढून टाकल्यासारखे हा आत्मा हे शरीर सोडून देऊन नवीन परिधान करेल असे कर. माझ्या भगवंता! या निराधाराला कुणाचा आधार! सदोदित तुझं चिंतन करायला लाव. कान्हा! कान्हा! या अगतिकाची तूच गती.

*   *   *

संदर्भ - जिती जागती गीता


उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा