ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वर सत्यस्वरूप आहे. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायात २४ श्लोक आहेत. २४ व्या श्लोकात पुरुष आणि प्रकृती यांचे गुणवर्णन केले आहे आणि जो हे जाणतो त्याला पुनर्जन्म नाही. माझे वडील त्यांच्या डायरीमध्ये ते ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात. स्वामींनी हा श्लोक का सुचित केला ? माझ्या वडिलांच्या डायरीमध्ये गीतेतील प्रत्येक श्लोक असताना हाच का सुचित केला. स्वामी आणि मी पुरुष आणि प्रकृती म्हणून अवतरलो आहोत आणि ती प्रकृती माझ्या वडिलांच्या पोटी जन्माला येऊन सर्वांना मुक्ती प्रदान करणार आहे. माझ्या वडिलांनी वयाच्या ३९ व्या वर्षीच हे डायरीमध्ये लिहिले. आम्ही त्यांची अगोदरची कोणतीही डायरी पाहिली नाही. तसेच आमच्या कुटुंबातील कोणीही त्यांच्या व माझ्या डायऱ्या वाचल्या नाहीत. आता प्रथमच मला स्वामींनी त्यांच्या डायऱ्या वाचून त्यांच्या लिखाणावर सविस्तर लिहिण्यास सांगितले. मी आधी काही मजकूर लिहिला व त्यानंतर मणिवन्ननने अजून काही डायऱ्या आणून दिल्या. इथे मी जे लिखाण केले आहे ते स्वामींनी सुचित केलेल्या १९५३ च्या डायरीत आहे. माझ्या डायरीतील नोंदी हाच माझ्या पुस्तकातील मजकूर असतो. आतापर्यंत सुमारे ६० पुस्तके लिहून झाली आहेत. स्वामींनी मला आता वडिलांच्या डायरी विषयी लिहिण्यास सांगितले आहे.
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा