ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मेणबत्ती जशी प्रकाश देण्यासाठी स्वतः जळते, तसे तुम्ही जगातील सर्वांना प्रेम द्या."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक - २४
हा आत्मा कापता न येणारा, जळता न येणारा, भिजवता न येणारा, सुकवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर, राहणारा आणि सनातन आहे.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
तू सर्वव्यापी आहेस. सनातन आहेस. तू अचल आहेस. अनंत आहेस, सर्वसाक्षी आहेस. या दिनाला तू या वास्तवाची जाणीव करून दे. प्रलयकाळी तुझी अस्तित्व असते. तू या देहाचा नाश कर या देहाचे तुकडे तुकडे कर आणि आत्म्याचे अविनाशित्व सिद्ध कर.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा