ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरावर केंद्रित असणारे भक्ताचे प्रेम विस्तार पावते आणि जीवात्मा परमात्मा बनतो. प्रेम ईश्वर आहे. ईश्वर प्रेम आहे. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक - २३
या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
कान्हा, या यःकश्चित जिवाला आत्मज्ञान दे. तद्नंतरच जो शस्त्रानी कापला जात नाही, पाण्याने भिजत नाही, अग्नीने जळत नाही अथवा वाऱ्याने सुकत नाही अशा आत्म्याचे ज्ञान मला होईल. हे विश्वव्यापक वामना, केवळ तुझ्यावरच माझा भरवसा आहे. या भक्षकभिंत देहाचा नाश कर. मला शाश्वत देह बहाल कर. मला तुझ्या चरणकमलांशी घे. हे आदितेजा, अनाथनाथा मृत्युसमयी मी तुझा विचार करेन असा वर तू मला दे.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा