ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुम्ही कुठेही असा आणि काहीही करीत असा, त्यावेळचं तुमच्या हातातील कार्य भक्तिभावानं करा."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक - २७
जो जन्मला त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयी तू शोक करणे योग्य नाही.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव-----
हे कान्हा मृत्यूची अनिवार्यता मला उमजु दे. या देहाचा त्याग करताना अंड्यातून बाहेर पडणाऱ्या कोंबडीच्या पिलासारखे मी अश्रू न सांडता तुझ्या चरणकमलांशी धाव घ्यायला हवी. आदिनारायणा, परब्रम्हा ह्या पाप्याला शुद्ध कर. तू सर्वगुणसंपन्न आहेस. मला तुझ्या चरणकमली घे. पुरे! पुरे! आता हा जन्म! या जन्मात काय प्राप्त झाले? पुरे! पुरे!
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा