ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
मी कधीही माझ्या वडिलांच्या डायऱ्या वाचल्या नाहीत. स्वामींनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिल्यानंतर आणि मला त्यावर लिहिण्यास सांगितल्यानंतरच मी त्यांच्या डायऱ्या वाचल्या. अजूनही वडक्कमपट्टीमध्ये तिजोरी त्यांच्या सर्व डायऱ्या जतन करून ठेवलेल्या आहेत. मणिवन्नननी त्या डायऱ्या आश्रमात आल्यानंतरच आम्हाला त्यांच्या मनातील भावभावनांच्या गहनतेची जाणीव झाली. हे काही एखाद्या सर्वसामान्य मनुष्याचे भाव विश्व नाही. याद्वारे स्वामी मला आणि जगाला, ते कोण आहेत हे ज्ञात करून देत आहेत.
* * *
माझे वडील कट्टर वैष्णवभक्त, गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक व भगवद्गीतेचे महाअनुयायी होते. त्यांच्या परमेश्वरावरील अतिव प्रेमातून अत्यंत उत्कट भक्ती निर्माण झाली. अशी भक्ती क्वचितच पाहायला मिळते. त्यांनी न चुकता गीतेतील मार्गाचे काटेकोरपणे पालन केले. त्यांच्या डायऱ्यांमधून त्यांची परमेश्वर प्राप्त तिकडे जाणारी जीवन यात्रा प्रतीत होते. भगवान श्री सत्य साईबाबांनी जर हे निदर्शनास आणून दिले नसते तर ते सर्व अप्रकाशित राहिले असते. हे पुस्तक त्यांच्या मार्गदर्शनाची परिणती आहे. सर्वधर्माच्या लोकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी होवो.
वसंत साई
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा