रविवार, १३ मे, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " देह, मन, बुद्धी, इंद्रिये आणि अहंकार रहित प्रेम शुद्ध आणि सत् चितआनंद स्वरूप आहे. त्याचे सार मनुष्याच्या आकलनापलीकडचे आहे. " 

प्रकरण एकोणीस 

दिव्य व्याधी 

               माझ्या त्वचेला अॅलर्जीमुळे कंड सुटते. गेली १५ वर्षे मला हा त्रास होत आहे. यासाठी मी कोणत्याही डॉक्टरकडे गेले नाही. जेव्हा स्वामींसाठी व्याकुळ होऊन मी रडत असते, तेव्हा मला अधिकच त्रास होतो. स्वामींच्या विरहामुळे मी करुण विलाप करत असते. आणि माझा देह माझ्या प्रेमाचा आवेग सहन करू शकत नाही. माझ्या देहावर त्यामुळे परिणाम होतो. त्यासाठी भक्त मला तऱ्हेतऱ्हेची क्रीम, तेलं वगैरे आणून देतात. तरीसुद्धा कशाचाच उपयोग होत नाही. 
              २७ मे २००३ ला मी मुक्ती निलयमला येईन, असे स्वामी म्हणाले परंतु ते आले नाहीत. २७ मे २००३ ते २७ मे २००४ या कालखंडामध्ये स्वामी आणि मी सतत शारीरिक व्याधींनी ग्रासलो होतो. स्वामी म्हणाले की ते सर्व वैश्विक मुक्तीसाठी होते. वैश्विक मुक्ती म्हणजे लोकांच्या कर्मांचा (यामध्ये पाप आणि पुण्य दोन्ही आले ) संहार. सर्व कर्मांची ओझे दूर हटवण्यासाठी स्वामींनी आणि मी ती कर्म आमच्या देहावर घेऊन भोगली. जून २००३ मध्ये स्वामी पडले व त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना चालताही येत नव्हते. त्यानंतर त्यांनी सांगितले, की त्यांच्या एका डोळ्यात रेटिनाच नाहीये. ऑगस्ट महिन्यात पुट्टपर्तीत ते पुन्हा पडले. ४ मे रोजी त्यांच्या हातावर एक विट पडून हाताचे हाड मोडले. डॉक्टरांनी स्वामींचा हात स्लींगमध्ये घातला. त्याचे विद्यार्थी त्यांना व्हीलचेअरवर बसवून दर्शनासाठी घेऊन येत. हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते ते !

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, १० मे, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."

प्रकरण एकोणीस

दिव्य व्याधी 

              माझी दुष्टी अधू आहे आणि दिवसेंदिवस ती अधिकच अधू होत चालली आहे. १० वर्षांपूर्वी मला उजव्या डोळ्याने पूर्ण दिसेनासे झाले. आम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी माझा डोळा तपासला आणि म्हणाले, " तुमच्या डोळ्यात रेटिना नाहीय. एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल.  मी शस्त्रक्रियेस नकार देऊन स्वामींना एक पत्र लिहिले की मी कोणत्याही डॉक्टरांकडे जाणार नाही. काही महिन्यांनी मला त्या डोळ्याने दिसायला लागले." दिव्यत्वाने माझ्या डोळ्यात प्रवेश करून नवीन रेटिना दिला. 
             " हे कसं शक्य आहे ?" असे उपहासाने म्हणू नका कारण खरंच हे घडले आहे. भगवद्गीतेतील   ' अनन्यश्चिन्तयन्तो... ' या श्लोकात असे नमूद केले आहे की, जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराचे निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात, त्यांचा योगक्षेम मीच पाहतो. माझी हीच अवस्था आहे. मी केवळ परमेश्वराचेच चिंतन करते. म्हणून माझ्या सर्व व्याधी दिव्य बनल्या. माझे जीवन म्हणजे गीतेचे प्रात्यक्षिक आहे. वसंतमयम, रिक्त, संस्कार शस्त्रक्रिया, विश्वगर्भ आणि युद्धासाठी सुसज्ज हे सर्व ' उपनिषदांपलीकडचे सत्य ' आहे आणि सत्ययुगाचा पाय आहे. जसा मी जगासाठी विलाप केला तसा कोणी करेल का ? कोणीही करणार नाही आणि म्हणूनच जग मला समजूशकणार नाही. 
*    *    *

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, ६ मे, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " आपला जन्म कसा झाला हे महत्वाचे नसून आपला मृत्यू कसा होतो हे महत्वाचे आहे."

प्रकरण एकोणीस 

दिव्य व्याधी

           माझे प्रियतम भगवान यांच्या दिव्य चरणी,
कोटी कोटी प्रणाम !
              स्वामी, गेल्या चार दिवसांपासून माझी पाठ दुखतेय. घरातील सर्व कामे मला एकटीलाच करावी लागतात. पायलाही खूप कंड सुटते आहे. दृष्टी अधू असल्यामुळे काम करताना मला अगतिक वाटत आहे, चिंता आणि ताण जाणवत आहे. मी काल रात्री तुमच्या पाशीरडले. " कितीही मोठा आजार असला तरी मी कुठल्याही डॉक्टरांकडे जाणार नाही." स्वामी, माझ्या या निर्धाराशी ठाम राहण्यासाठी माझ्यावर कृपा करा. स्वामी, माझ्या छातीत दुखतंय, हे तुमच्याशिवाय मी कोणाला सांगू ? स्वामी ! तुम्ही माझ्यावर ब्रम्हास्त्र सोडले आहे. मी अगतिक आहे. त्याला औषधरुपी शस्त्राने प्रतिकार करण्याची शक्ती माझ्याकडे नाही. मी स्वसंरक्षण करण्यास असमर्थ असल्यामुळे मी ब्रम्हास्त्रापुढे मन तुकवते. ही जर तुमचीच इच्छा असेल तर मी तिचे स्वागत करते. हे कृपादान माझ्यासाठी शाप ठरेल का वरदान ? हे मला माहित नाही. तरीपण स्वामी, प्लिज माझ्यासाठी एक गोष्ट करा, इतरांनी माझी रुग्ण म्हणून सेवा करण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. लोकांना माझ्याविषयी अनुकंपा वाटावी, असे जीवन मला जगायचे नाही. मला कोणाकडूनही सेवा वा मदत घ्यायची नाही. तर मीच इतरांची सेवा करायला हवी. दुसऱ्यांच्या मदतीची प्रतीक्षा करणारा असहाय्य रुग्ण बनण्यापेक्षा मृत्यू आलेला चांगला. 
            स्वामी, भगवान तुमच्याशिवाय मला अन्य कोणतेही आश्रय स्थान नाही. 
            तुमचे दिव्य नामच माझ्यासाठी औषध बनू दे.

तुमची लाडकी लेक 
वसंता 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, ३ मे, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

             " परमेश्वरमध्ये समरस झालेला मनुष्य केवळ एकच गोष्ट जाणवतो - परमेश्वर, परमेश्वर आणि परमेश्वर !"
प्रकरण ऐकोणीस 
दिव्य व्याधी

               " सर्वकाही सत्यप्रसाद आहे "
               व्याधी कशा काय दिव्य होतात ? याच्या पाठीमागे एक इतिहास आहे. गेल्या अनेक वर्षात अनेकानेक व्याधींची पीडा व दुःख याद्वारे स्वामींनी माझी कसोटी घेतली आहे. कधी दातदुखी, पोटदुखी, कानदुखी तर कधी नेत्रविकार. अशा प्रकारे स्वामींनी माझ्या प्रत्येक अवयवाला यातना भोगायला लावल्या. तथापि माझी प्रत्येक व्याधी, पीडा दिव्य बनली. एक  दिवस मला तीव्र दातदुखीचा त्रास होत होता. माझा चेहराही सुजला होता. मी स्वामींना म्हणाले," स्वामी, आज मी ऊस खाणार आहे पण मला दुखणार नाही ! " आणि ऊस खाताना मला खरंच अजिबात दुखलं नाही. हिरड्यांना सूज असूनही मला वेदना झाल्या नाहीत. अशातऱ्हेने माझ्या प्रत्येक व्याधीमध्ये दिव्यत्वाने प्रवेश केला. माझी स्थिती वर्णन करणारी अनेक पत्रे मी स्वामींनी लिहिली. ११ जून १९८८ रोजी लिहिलेले एक पत्र मी खाली देत आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २९ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " परमेश्वराप्रती असणारे प्रेम, हृदयाच्या गाभ्यामधून महापुराच्या लोट्यासारखे दुथडी भरून वाहायला हवे."

प्रकरण अठरा 

अन्नविद्या 

               मी जन्मापासूनच सातत्याने श्री कृष्णाच्या विचारांमध्येच होते. भक्तीरसामध्ये विरघळून मी भगवंताला माझ्या प्रेमाचा नैवेद्य दाखवला. स्वामींनी माझे प्रेम ग्रहण करून बदल्यात मला सत्य प्रसाद दिला. मी फक्त हाच प्रसाद ग्रहण करते. सर्वसाधारणपणे आपण देवाला अन्नाचा नैवेद्य दाखवून तेच अन्न प्रसाद म्हणून खातो. मी बाह्योपचारांना कधीच महत्व दिले नाही. सर्व काही मनातल्या मनात, अंतरंगात केले. बाह्योपचारांना ' यज्ञ ' म्हटले जाते, तर अंतर्मनातील भक्तीला ' विद्या ' म्हणतात. अशा तऱ्हेने मी रात्रंदिवस माझ्या प्रेमाचा नैवेद्य त्यांना अर्पण करत होते. त्याच्या बदल्यात मला सत्यप्रसादाचा लाभ झाला. याला ' अन्न विद्या ' म्हणतात. कोणत्याही उपनिषदांमध्ये उल्लेख नसलेली ही नूतन विद्या आहे. 
               परमेश्वर आपल्यामध्ये स्फुल्लींगरूपाने वास करत असतो. माझ्या प्रेमरूपी अन्नाने मी त्याचे पोषण केले. तो स्फुल्लींग १५ वॅटच्या दिव्याप्रमाणे प्रकाशु लागला. त्याच्यासाठी मी अविरत अश्रू ढाळल्यामुळे काही काळाने हा दिवा जास्त प्रखर होऊन १०० वॅटच्या दिव्याप्रमाणे प्रकाश देऊ लागला. मी घेतलेल्या परमेश्वराच्या अखंड ध्यासामुळे माझे चिदाकाश उजळून निघाले. जणूकाही हृदयगुंफेतील सूर्यच ! साई सूर्याने माझे अंधकारमय आध्यात्मिक हृदय तेजोमय बनवले. माझे परमेश्वराचे वेड अधिकच वाढले. माझ्या प्रेमाने सर्व मर्यादा ओलांडल्या. ह्या प्रेमाचे अधिकाधिक भक्षण करून तो माधव लक्षावधी सूर्यांच्या तेजाने तळपू लागला. त्याने त्याचे सत्य माझे अन्न केले. आता ' कोटीसूर्य समप्रभ ' अशा त्याला मी पाहू शकते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " मनामध्ये सदैव सत् प्रवृत्ति  आणि दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो. मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे."

प्रकरण अठरा 

अन्नविद्या 

             हृदयगुंफेत निवास करणाऱ्या भगवंताला आपण आपले विशुद्ध प्रेम साधनेद्वारा अर्पण केले पाहिजे. जेव्हा आपण आपली इंद्रियं, मन, बुद्धि, अहंकार ईश्वराभिमुख करतो तेव्हा आपल्या अंतर्यामी वसणाऱ्या भगवंताचे भक्तीरुपी अन्नावर पोषण होते व तो जोमाने वाढतो, विस्तारही पावतो. तो त्याचे सत्य प्रकट करू लागतो आणि ते सत्य आपले अन्न बनते. आपण ज्ञानाने परिपूर्ण होतो. ज्ञानाद्वारे हे नाते जाणून घेणे, हा सत्यप्रसाद होय. 
               मी नेहमीच साई अन्न ग्रहण करते. त्यामुळे माझा स्वभावच सत्य झाला. मी दोन युगांपासून केवळ सत्यच ग्रहण करते आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

सोमवार, २३ एप्रिल, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

मोती चौथा

              १७ एप्रिल २००० रोजी सकाळच्या ध्यानामध्ये स्वामींनी मला मायेविषयी लिहिण्यास सांगितले. 
               माया म्हणजे काय ? जे तेथे नाही ते तेथे असल्याचा आभास निर्माण करणे ह्याला माया म्हणतात. ती कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात दृश्यमान होऊ शकते . हे विश्व विश्वविधात्यालाच झाकून टाकते. जर आपण त्याला विश्व म्हणून पाहिले तर आपल्याला त्याचे विस्मरण होते. परंतु जर आपण केवळ त्याला आणि त्यालाच पाहिले तर आपणास विश्व दृष्टीस पडेल का ?
               हीच माया आहे. निर्मात्याला विसरायला लावून, निर्मितीमध्ये अडकवून ठेवणारी ! 
             अज्ञानाच्या अंधःकारात बुडाल्यामुळे मनुष्य, जे वास्तवात नाही अशा असत्याला सत्य मानून त्यावर विश्वास ठेवतो. नंतर गुरु वा आध्यात्मिक विभूती ज्ञान दीप त्याच्या ठायी ज्ञान ज्योत प्रज्वलित करतात आणि त्या ज्योतीच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधःकार नाहीसा होऊन मनुष्याला बोध होतो. 
              ही माया आहे. आपल्या अज्ञानामुळे आपण भौतिक जीवनाच्या जाळ्यात अडकतो आणि दुःखी होतो. कोणाचे कोणाशी नाते आहे ? भौतिक नात्यागोत्यांना काय अर्थ आहे ? आसक्ती आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या ममत्वामुळे मनुष्य हेलकावे खातो. तो आनंद आणि मनःशांती गमावून बसतो. हा एक मोठा संभ्रम आहे परंतु तो संभ्रम आहे हे समजण्यासाठी आपल्याला गुरुंच्या कृपाशिर्वादांची आवश्यकता आहे. 
             माया मनुष्याला सहज फसवते. तुमची बौधिक पातळी कशीही असली तरी माया मनुष्याला हातोहात फसवू शकते म्हणून आपण सदैव दक्ष राहिले पाहिजे. 
             एकदा स्वामी मला म्हणाले, " तू स्वतःला मायेने झाकून घेतले आहेस मायेमुळे  अनेकजण वाहवत जातात. लोकांची मायेमधून मुक्तता करणारी एकमेव अद्वितीय महामाया तू आहेस. " 
             जर मायेला आपल्यापासून दूर ठेवायचे असेल तर आपण सदैव परमेश्वराच्या चिंतनात व त्याच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. 
             मायेपासून आपण कसे मुक्त होऊ ? ह्यावर स्वामींनी दिलेले स्पष्टीकरण 
            " मनुष्याचा स्वभाव कसाही असो, माया त्याच्यावर कब्जा करून त्याला गिळंकृत करते. एवढेच नव्हे तर महाज्ञानी, भक्त हेही त्याला अपवाद नाहीत. एखादा धागा आत जाईल एवढे छिद्रही मायेस प्रवेश करण्यासाठी पुरेसे आहे.  चंचुप्रवेश करून माया लोकांवर कब्जा करते. माया विविध रूपांमध्ये प्रकट होते." 
             मी स्वामींनी विचारले," मग ह्यावर उपाय काय ?" 
             स्वामी म्हणाले," प्रत्येक क्षणी आपण दक्ष राहिले पाहिजे. जर तुम्ही २४ तास परमेश्वराच्या चिंतनात मग्न असाल तर माया तुमच्या जवळपास येणार नाही, येऊच शकणार नाही.
             मी विचारले " हे कसे शक्य आहे ? आम्हाला आमची कर्तव्ये आणि कर्म करायची असतात. " 
स्वामी म्हणाले," मग काय झाले ? तुम्ही ते सर्व करू शकता. स्थळकाळाचा विचार न करता जर तुम्ही परमेश्वराचे चिंतन केलेत तर सर्व गोष्टी आपोआप होतील." जेव्हा तेथे परमेश्वराशिवाय दुसरे अन्य काहीही नसते तेव्हा माया तेथे कशी येऊ शकेल ? जे परमेश्वराशी संपूर्ण शरणागत झाले आहे ते मायेपासून मुक्त आहे. परमेश्वराला दृढतेने धरून ठेवणे हा मायेला टाळण्याचा एकमात्र उपाय आहे. " 

*      *     *
संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' प्रेम निवारण साई ' ह्या पुस्तकातून 


जय साईराम