रविवार, ३० डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" त्याग ही सत्याची गुरुकिल्ली आहे."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

स्वामी म्हणले, 
              " तुझ्या सतीत्वाबद्दल लिही " आधी तू म्हणालीस, " विवाहासंदर्भात माझे नाव जर सामान्य मानवाशी जोडले गेले तर मी जगू शकणार नाही." आता तू म्हणतेस की, जर तुझे नाव माझ्याशिवाय इतर कोणत्याही अवताराच्या नावाशी जोडले गेले तरीसुद्धा तू जगू शकणार नाहीस. या सर्वश्रेष्ठ सतीत्वाविषयी लिही. 
               २००१ मध्ये स्वामींनी मला वसिष्ठ गुहेमध्ये येण्यास सांगितले. ते म्हणाले की ते स्थूलरूपात तिथे येऊन ते माझ्याशी विवाह करतील. वसिष्ठ गुहेमध्ये जाण्याअगोदर एका मनुष्याने आम्हाला सांगितले की माझ्यासाठी सीतेचे मंगळसूत्र चमत्कारी रितेने साक्षात होईल. मी म्हणाले," मी सीतेचे मंगळसूत्र घालणार नाही. ते श्रीरामाने बांधलेले मंगळसूत्र आहे. मला ते नको." मी विलाप करू लागले. " मंगळसूत्र म्हणजे इतकी हलकी सलकी गोष्ट आहे का ? बाजारातील भाजीपाला आहे काय, की कोणीही त्याची देवघेव करायला ? कोणीतरी अंगावर ल्यालेलं मंगळसूत्र मी स्वीकारणार नाही. त्याने माझे पातिव्रत्य डागाळेल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केलेल्या निरंतर प्रयत्नांद्वारेच सत्याचा बोध होतो. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

                स्वामींकडे पाहत असताना दिव्यानंदाची अनुभूती होते. असे का होते ? कारण माझ्या देहातील अणुरेणूंच्या निदिध्यासातून त्यांचे रूप निर्माण झाले. परमेश्वराच्या मनमोहक हालचालींनी आपले हृदय न हरवून बसणारा कोणीतरी आहे का ? माझी सच्ची भक्ती त्यांच्या पदन्यासाचे सौंदर्य आहे. हा सौंदर्याचा पुतळा परमेश्वर भूतलावर कसा अवतरला ? माझ्या अश्रूपूर्ण नेत्रांनी घातलेल्या सादेनी, माझ्या मनात सतत असणाऱ्या त्यांच्या विचारांनी त्यांचे मोहक स्मित निर्माण केले. मी अखंड उच्चारण करत असलेल्या त्यांच्या नामामुळे त्यांचे नेत्र आकर्षक झाले. जो कोणी त्यांच्याकडे पाहतो त्याला ते आकर्षित करतात. त्यांचे नाम माझ्या रक्तातून वाहते. माझे भाव व्यक्त करणाऱ्या, मी लिहिलेल्या अगणित पद्मरचनांमधून त्यांचे दिव्य चरण कोरले गेले. माझ्या आत्म्याच्या तृष्णेने त्यांचे रूप मनमोहक झाले. 
                माझ्या भावविश्वाने स्वामींचे हे रूप निर्माण केले. माझ्या भावांमधून निर्माण झालेले हे रूप माझ्या भावांशी तद्रूप झाले आणि माझ्याहून वेगळी अशी त्यांच्या रूपाची कल्पना मी करू शकत नाही. जरी मी त्यांना पाहिले तरी माझ्या मनात त्यांच्या रूपाची नोंद होत नाही. मी नेहमी माझ्या भावविश्वातील रूपच पाहते. म्हणून भौतिक देह माझ्या मनात टिकतच नाही.

*    *    * 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

मोती बारावा
 भगवत् प्रिती  

        सर्वजण परमेश्वरावर प्रेम करू शकतात. तसेच ' हे परमेश्वरा, माझे तुझ्यावर प्रेम आहे ' असे खुलेपणाने सांगून आपला भक्तीभाव व्यक्त करू शकतात. तथापि मी परमेश्वराला खुश केले असे किती जण सांगू शकतात ? परमेश्वराला खुश करणे तेवढे सोपे नाही ' निष्ठा ब्रोकन ' ह्या प्रकरणात मी ह्याविषयी लिहिले आहे. मी म्हटले आहे," लोक परमेश्वराचे ऐकत नाहीत त्याच्या शब्दांचे पालन करत नाहीत अवताराची अवज्ञा करण्यातच धन्यता मानतात. १२ वर्षांपूर्वी स्वामींनी हेच सांगितले. आपण परमेश्वरावर प्रेम करत असू, त्याची भक्तीही करत असू परंतु आपण त्याची शिकवण आचरणात आणून, त्याला खुश केले पाहिजे. त्यांनी दिलेल्या आज्ञा शिरसावंद्य मानल्या पाहिजेत. मनुष्याने जीवन कसे जगावे, हे दर्शवण्यासाठी भगवंताने गीतेतून शिकवण दिली. स्वामींनी गेली ८० वर्षे, त्यांच्या जीवनातून हीच शिकवण दिली किती जण त्यांचे अनुसरण करत आहेत ? एखादी व्यक्ती त्यातील काही शिकवणींचे अनुसरण करत असेल परंतु परमेश्वराला खुश करण्यासाठी सर्व शिकवणींचे अनुसरण कोण करू शकते. आपण सर्व कर्म त्याला खुश करण्यासाठी केली पाहिजेत सर्व भौतिक सुखांचा त्याग करून केवळ त्याच्यासाठी जीवन जगले पाहिजे हा झाला बाह्यस्वरूपाचा त्याग. भगवे वस्त्र धारण करून एखाद्या आश्रमात वा गुहेत राहणे पुरेसे नाही मनातून, अंतरातूनही वैराग्यभाव असायला हवा. काहीजण हे ही करतील तथापि ते अंतरातील महत्वाच्या व्यक्तीचा अहम् त्याग करणार नाहीत. 
                आपण सदैव अहंकारास दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे अणुमात्र अहंकार जरी उरला तर आपण परमेश्वरास खुश करू शकणार नाही. आपण जग आपल्याविषयी काय विचार करेल, ह्याची चिंता आपण सोडली पाहिजे. स्तुती वा निंदा दोन्ही बाबत आपण अलिप्त राहिले पाहिजे तसेच निर्भय आणि आत्ममग्न राहिले पाहिजे. 
                मी नेहमी स्वामींचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषण ह्यासाठी अश्रू ढाळत असे आता मी माझे मन बदलले आहे आता मला ह्या फळाचीही अपेक्षा नाही. परमेश्वराला खुश करणे व त्याच्यावर प्रेम करणे हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे. 
वसंतासाई 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या आनंद सूत्र ह्या पुस्तकातून 

जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ सर्वसंगपरित्याग केल्याने मोक्षप्राप्ती होते. " 

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

               रुपाला एवढे महत्व का ? तो परमेश्वर आहे. एवढे पुरेसे आहे. जर एखाद्याला बाह्यरूपामध्ये रुची असेल तर ते दश आणि शिव यांच्या गोष्टीसारखे होईल. मला फक्त परमेश्वर हवा, मग तो ८० वर्षांचा असला काय किंवा अगदी १०० वर्षांचा असला काय ?
                मी लिहिले आहे की मी प्रेम साई अवतारास घेऊन येणार आहे. या विषयावर मी ' इथेच, याक्षणी, मुक्ती ' भाग -३ या पुस्तकामध्ये एक अध्याय लिहिला आहे. माझ्यामध्ये राधाचे जे संस्कार आहेत त्या संस्कारांमुळे पृथ्वीतलावर आणल्या जाणाऱ्या अवताराची स्वभाववैशिष्ट्ये कोणती असतील ? या पुस्तकातील ७ व्या प्रकरणात मी एक कविता लिहिली आहे. त्यामध्ये मी त्याचे वर्णन केले आहे. स्वामी, म्हणाले, की कृष्णाची अनुभूती घेण्याच्या राधेच्या अतृप्त तृष्णेनेच त्यांना भूतलावर येण्यास भाग पाडले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " आपण केलेले सत्कर्मसुद्धा परमेश्वराच्या साक्षात्कारामध्ये अडथळा बनू शकते. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

                 परमेश्वराची अवस्था किंवा दिव्य तत्वही युगानुयुगे उत्क्रांत होत जाते. ' प्रेम साई ' हा परिपूर्ण अवतार असेल. त्यांचे प्रेम निर्दोष आणि परिपूर्ण असेल. 
                 लहानपणापासूनच मला कृष्णाशी लग्न करायचे होते. म्हणून मला त्याच्या रूपाचे वर्णन करता आले पाहिजे. मी फक्त एवढेच म्हणू शकते, की कृष्ण नीलवर्णी आहे. त्याने मुकुटावर मोरपीस धारण केले आहे. हातामध्ये बासरी आहे. तुम्ही जर मला स्वामींबद्दल विचारलेत तर मी म्हणेन, की स्वामींनी केसांचा मुकुट धारण केला आहे आणि भगव्या रंगाची कफनी परिधान केली आहे. 
                  मला परमेश्वराचे रूप डोळ्यापुढे का बरं आणता येत नाही ? मी परमेश्वरावर प्रेम केले, कृष्णावर प्रेम केले व मला त्याच्याशी लग्नही करायचे होते. परंतु परमेश्वराच्या विशिष्ट चेहऱ्याची किंवा रूपाची मी कल्पना करू शकत नाही. कारण परमेश्वराचे रूप कल्पनेच्या पलीकडचे आहे. मी कृष्णावर प्रेम केले परंतु त्याच्या रुपाकडे लक्ष दिले नाही, म्हणून प्रेम साई अवतारात स्वामी कसे दिसतील हे मी सांगू शकत नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १६ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

        " आपल्या मृत्युचे ठिकाण आणि वेळ ही अगोदरच निश्चित असते, त्यानुसारच हे घडते. यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. " 

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

परम पातिव्रत्य

वसंता - स्वामी, प्रेम साई अवतारात माझे रूप कसे असेल ? तुमच्या मनात कल्पनाचित्र तयार आहे का ?
स्वामी - तुझं रूप परमेश्वरच्याही कल्पनेबाहेरचे आहे. 
वसंता - काय सांगताय, स्वामी ?
स्वामी - निर्मितीच्या तत्वांपलीकडे आणि देवतांच्याही पलीकडे जाऊन तू स्वतःचे रूप स्वतःच निर्माण केले आहेस. एक उदाहरण देतो. सीतामातेने माया हरीण मिळावे अशी इच्छा बाळगली, अशी छोटीशी इच्छाही मनात न बाळगता तू स्वतःला निर्मण करते आहेस. अशातऱ्हेने तू परिपूर्ण पवित्र्याने रुक्मिणी, सत्यभामा, दाक्षायिणी आणि इतर देवतांमधील छोटासा दोषही स्वतःमध्ये येणार नाही अशी खबरदारी घेऊन स्वतःला घडवत आहेस. ज्यामध्ये कणभरही दोष नसेल असा महाशक्ती अवतार म्हणून तू स्वतःला घडवत आहेस. आजपर्यंत जगाने पाहिलेच नाही, असे देवतातत्व तू जगाला दाखवत आहेस. तू तुझ्या पातिव्रत्याचे पावित्र्य दर्शवते आहेस. तुझ्या उच्चतम पातिव्रत्याची कल्पना देवदेवतासुद्धा करू शकणार नाहीत. 
प्रेमसाई अवतारात मी कसा दिसेन ते तुला माहित नाही, असे तू का म्हणतेस ? जेव्हा तू प्रत्यक्ष माझे दर्शन घेतेस तेव्हा तू सर्वांना विचारतेस. " स्वामी माझ्याकडे पाहत होते का ? ते माझ्याकडे बघून हसले का ?" का बरं असं विचारतेस ?
वसंता - मला माहीत नाही, स्वामी. 
स्वामी - जगामध्ये बाह्य रूपाच्या आधारे लोक कल्पनाचित्रे तयार करतात. तू भावचित्र तयार केलेस. तू हे रूप कसे तयार केलेस ? भावविश्वातून. त्याविषयी तू एका गीतामध्ये लिहिले आहेस. " तुला हे दिव्य रूप कोणी दिले." माझे हे रूप तू निर्माण केले आहेस. तू फक्त तुझ्या भावांमधून निर्माण झालेले रूपच पाहू शकतेस ; तुला भौतिक रूप पाहता येत नाही आणि म्हणूनच तू असे म्हणू शकत नाहीस की मी पुढील अवतारात कसा दिसेन. तू साक्षात परमेश्वराच्या कल्पनेच्याही पलीकडे आहेस. तुझे पातिव्रत्य एवढे उच्च आहे की कोणीही तुझ्या पातिव्रत्याच्या पावित्र्याची कल्पना करू शकत नाही ; म्हणून मी पूर्वी म्हणालो की, तू तुझ्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे माझ्या हातातूनही निसटून उंच उंच जात आहे. 
वसंता - स्वामी, मला असे पातिव्रत्य नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुमच्या पलीकडे जाऊन मी काय करू ? नको ! मला हे पातिव्रत्य नको. सीता, रुख्मिणी आणि सत्यभामा यांच्यामधील उणीवा माझ्यामध्ये असल्या तरी मला चालतील, पण माझी जागा तुमच्याहून खालीच असायला हवी. 
स्वामी - उणीवांमुळे पातिव्रत्याला मर्यादा येतात. तुझ्या गुणांमुळे तू पातिव्रत्याची उंच उंच शिखरे पादाक्रांत करत आहेस. तुझ्या पावित्र्याची कोणीही कल्पनासुद्धा करू शकणार नाही. मी तुझ्या तोलचा नाही.
वसंता - स्वामी ! स्वामी !  हे तुम्ही काय बोलताय ? मला काहीही नको. मला फक्त तुम्ही हवे आहात. 
स्वामी - प्रेम साई अवतारामध्ये तुझ्या रूपाशी मिळते जुळते माझे रूप तू निर्माण करत आहेस. प्रेम साई अवतारामध्ये, राम, कृष्ण आणि सत्य साई यांच्यातील दोष नसतील. पुढील अवताराच्या कालखंडात सर्व काही निर्दोष आणि परिपूर्ण असेल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, १३ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

             " आपल्या अतृप्त इच्छा आकांशा व आसक्ती पुढील जन्मात आपल्या बरोबर येतात. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

                 सर्वसाधारणपणे अवताराचा इतिहास त्याच्या प्रवेशानंतरच नोंद केला जातो. मी प्रेमसाईंच्या प्रवेशाअगोदरच त्यांची कथा त्यांच्या कुटुंबाचा तपशील लिहिले आहेत. मी त्यांच्या घराचे नाव, भेट देतील ती ठिकाणे, त्यांच्या कुटुंबात घडणारे प्रसंग अशा अनेक गोष्टी तपशीलवार लिहीत आहे. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा इतिहास आणि त्याचा पूर्वजन्म याविषयी लिहीत आहे. एवढेच नाही तर मी गतयुगातील त्यांच्या जन्माचाही मागोवा घेत आहे. मी प्रेमसाईंचा विवाह, विवाहाप्रसंगी घडणाऱ्या घटना, प्रेमाची प्रसूती व त्या अपत्याच्या जन्मामागचे रहस्य हे सर्व पाहू शकते. एवढेच नाही तर त्या मुलाचे जन्मनक्षत्र, जन्मदिनांक, जन्मवेळ हे सर्व आधी सांगू शकते. एका प्रकरणामध्ये तर मी मुलाच्या नामसंस्कार विधीचेही वर्णन केले आहे. हे सर्व मी कसे काय पाहू शकते ?
                माझे पवित्र प्रेम आणि पातिव्रत्य त्यामुळे हे शक्य झालंय. माझं परमपातिव्रत्य मला एवढ्या टोकाचे सत्य ग्रहण करण्याची ताकद देते. माझं एकाग्र प्रेम आणि पातिव्रत्य त्यामुळे हे सर्व शक्य होतं. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साईराम   

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             " तुमचे सर्व भाव ईश्वराकडे वळवा. राग आला तर तो परमेश्वराप्रती व्यक्त करा," मला तुझे दर्शन का नाही मिळाले ?" त्याच्यापाशी तुम्ही तुमचे भाव व्यक्त करा."  

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

स्वामी म्हणतात, 
               " तुला मी प्रेम साईंविषयी का लिहायला सांगतोय हे तुला माहीत आहे ? आजपर्यंत अवताराच्या प्रवेशाअगोदर कोणीतरी अवताराविषयी लिहिले आहे का ? त्याचे नाव, त्या नावामागचे कारण किंवा त्याचे नातेवाईक कोण असतील, नातेवाईक म्हणून त्यांचीच निवड का करण्यात आली, त्यांच्या कुटुंबात घडणाऱ्या घटना, हे आजपर्यंत कोणीही सांगितले नाही. फक्त तूच हे करू शकतेस. आपल्याबरोबर येणाऱ्या सर्वांची तूच निवड केली आहेस. म्हणूनच मी त्यांना ' निवडलेले मोती ' म्हणतो. तुझ्या परम  पावित्र्यामुळेच तुला हे ज्ञात होऊ शकते. निर्मिती व अवताराचे अवतरण ह्या विषयीचे सत्य खेचून घेऊन ही परम रहस्ये तू अखिल जगतासाठी उघड करत आहेस ."

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम  

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

      " तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या जन्माची निर्मिती करत असता. तुमचे भाव तुम्हाला जन्ममृत्युच्या चक्रात ढकलतात. " 

प्रकरण पाच

प्रेम साई अवतार 

                  जग कर्मभूमी आहे. इथे केलेल्या प्रत्येक कर्माला फळ आहे. मनात उमटणाऱ्या प्रत्येक भावाला प्रतिक्रिया, प्रतिबिंब आणि प्रतिध्वनी आहे. यालाच कर्मकायदा म्हणतात. हाच आपल्याला जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवतो. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण कुविचारांना थारा देणार नाही. मनामध्ये भौतिक भाव ठेवणाऱ्यांनाही केलेले कर्म आणि त्यानुसार मिळणारे कर्मफल हे तत्व लागू होते. जर आपण भिंतीवर बॉल टाकला तर तो तेवढ्याच वेगाने तेवढ्याच अंतरावर आपल्याकडे परत येतो. तुम्ही सर्वजण मायेमध्ये अडकला आहात. जेव्हा तुम्ही मायारूपी भिंतीवर बॉल टाकता तेव्हा तो बॉल तुमच्याकडे परत येतो. हाच कर्मकायदा आहे याच कर्मकायद्याने मला प्रेम साई अवताराचे फळ दिले. माझा प्रत्येक भाव परमेश्वराशी निगडित असतो. मी अहोरात्र भगवद्भावात रममाण असते. त्याची परतफेड करण्यासाठी भगवंत भूतलावर येऊन त्याचे भाव दर्शवणार आहे. मुक्ती निलयममध्ये माझ्याबरोबर राहणारे आश्रमवासी माझे नातेवाईक बनून पुन्हा येणार आहेत. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, २ डिसेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ परमेश्वराची इच्छा धरा. तोच एकमात्र सत्य आहे. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

                  प्रेमावताराच्या काळात सर्वजण एकत्र राहतील. माझे आई वडील, आजी, मामा, मामी, काका,काकी ह्या सर्वांची पुढील जन्मात तीच नावे असतील. मी त्याच कुटुंबात जन्म घेईन फक्त माझं नाव बदलेल. माझं नाव प्रेमा असेल. ह्यातून काय निदर्शनास येते ? अशातऱ्हेने सर्वजण सत्ययुगात जन्म घेतील. ह्या जन्मात माझ्या कुटुंबातील विभक्त झालेले सर्वजण पुढील जन्मात एकत्र राहतील. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंब प्रेमरज्जूने बांधलेले असेल व त्यामुळे कुटुंबात एकोपा असेल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

             " आध्यात्मिक शिकवण विचार, उच्चार आणि आचार यांमध्ये उतरवल्यानेच विवेक आणि ज्ञान प्राप्त होते. निव्वळ पुस्तकी ज्ञान निरर्थक आहे. "

प्रकरण पाच

प्रेम साई अवतार

               प्रेम साई अवतारामध्ये केवळ प्रेमा आणि राजाच नव्हे, तर माझ्या कुटुंबातील ज्यांनी वियोगाचे दुःख अनुभवले आहे ते सर्व आपल्या कुटुंबियांबरोबर आनंदाने एकत्र राहतील. निरंतर भगवद्भावात राहिल्यामुळे तसेच स्वामींशी आणि माझ्याशी असलेल्या सामीप्यामुळे ते पुढील जन्मात आमचे निकटवर्तीय असतील. कुटुंबातील कोणीही देहधारी परमेश्वराच्या सहवासाचा परमानंद पूर्णपणे लुटला नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा येत आहोत. प्रेम साई अवतारात आम्ही प्रत्यक्ष परमेश्वरासोबत राहत आहोत हे आहाला माहीत असेल. माझे आजी आजोबा, आई वडील, काका, मामा आणि त्यांचे कुटुंब स्वामींबरोबर राहण्यासाठी पुन्हा येतील व तेव्हा कोणाचाही वियोग होणार नाही. हे प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी तत्व आहे. पुढील अवतारात जन्म घेणाऱ्या माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या उदाहरणाद्वारे स्वामींनी हे तत्व दर्शवले आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" वैराग्य सर्व इच्छांचा नाश करत मनुष्याला रिक्त करते. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

                माझ्या कुटुंबामध्ये ताटातूट होऊनही सर्वांनी सत्याचा शोध घेत भगवद्भावात जीवन व्यतीत केले. नेहमी विचार करत असे, ' राम आणि सीता यांचे पावित्र्य कोठे गेले ? त्यांचे मन धर्माचरणापासून कधीही ढळले नाही. आता मानवी जीवन एवढे अधोगतीला का गेले ? ' 
                 हे ' प्रेम साई अवतार ' ह्या पुस्तकाचे बीज आहे. ह्यामध्ये अवताराच्या वियोगाचे निराकरण करणारा एक उपाय सुचवला आहे. वसंता आणि भगवान सत्य साई बाबा यांचा वियोग हेच सत्ययुग येण्याचे तसेच प्रेम साई अवताराचे कारण आहे, असे मी म्हटले आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

मोती अकरावा

निर्मितीचे कारण 

                निर्मितीचा आरंभ कसा होतो ? सर्वप्रथम मनामध्ये इच्छा उत्पन्न होते. अॅडमला सफरचंद खाण्याचा मोह झाला. ह्या इच्छेमधून लज्जा, शरम आणि देहभाव निर्माण झाला. अॅडम व इव्हला आपले देह आच्छादित करण्याची आवश्यकता वाटली. ' तो पुरुष आहे, ती स्त्री आहे ' हा विचार उद्भवला आणि आकर्षण जन्माला आले. ह्याच्यामधून कामाची निर्मिती झाली. आणि निर्मितीचा प्रारंभ झाला. ह्यावरून असे दिसते की प्रथम आकर्षण उत्पन्न झाले.  त्यातून संयोगाची इच्छा आणि निर्मितीचा श्री गणेशा. प्रथम काम त्यापाठोपाठ विवाह आणि नंतर संतती.  ह्या तिन्ही गोष्टी निर्मितीचा पाया आहे. ह्या तिन्ही गोष्टींशिवाय जग अस्तित्वात येऊ शकत नाही. जो मनुष्य त्यामध्ये गुरफटतो तो जन्म मृत्युच्या चक्रामध्ये अडकतो. ह्या तिन्हीच्या शुद्धीकरणामुळे सत्य युग जन्मास येईल. 
                जर विवाह कामावर आधारित असेल तर संतती मायेच्या बंधनात जन्म घेते व त्या जीवाला पुन्हा पुन्हा जन्म मृत्युच्या चक्रात ढकलले जाते. मानव खालच्या पातळीवर येतो. तथापि, जर आपण प्रथम कामाचे शुद्धीकरण केले आणि नंतर विवाह केला तर दिव्य संतती जन्मास येते. ही नवनिर्मिती आहे. हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी स्वामी आणि मी आलो आहोत. आम्ही आमच्या भावांद्वारे कामदहन करत आहोत. 
                 कामदहन कसे करावे ? विवाहपूर्व काळात मनुष्याने आपली इंद्रिये व मन स्वैरपणे भटकू देऊ नये. तरुण स्त्री आणि पुरुषांनी आत्मसंयम राखावा. त्यांनी भारतीय संस्कृतीचे पालन करावे. ब्रम्हचार्याचे पालन करावे. हेच कामदहन आहे. अशा पद्धतीने जीवन जगून त्यांनतर गृहस्थाश्रमात पाऊल टाकावे, विवाह करावा म्हणजे ज्ञान संतती जन्मास येईल. 
                कलियुगात अज्ञानामधून संतती जन्मास येते याउलट सत्ययुगात ज्ञानामधून संतती जन्मास येते. 
                 जर आपली वर्तणूक योग्य नसेल तर आपल्या मुलांमध्ये नैतिक मूल्यांचा अभाव असेल. आपल्या भावांचे प्रतिबिंब, प्रतिक्रिया आणि प्रतिध्वनी आपल्याकडे परत येतात. त्यापासून आपली सुटका होत नाही. जेव्हा आपली वर्तवणूक आणि भाव शुद्ध नसतात तेव्हा त्याचा परिणाम मुलांवर होऊन त्यांच्यामध्ये पशुवृत्ती दिसून येते. 
                 जर आपण आपली पंचेंद्रिये ईश्वराभिमुख करून जीवन व्यतीत केलेत. केवळ परमेश्वरप्राप्ती हेच जीवनाचे ध्येय ठरवून ध्येयप्राप्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत तर सत्ययुग जन्मास येईल. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' The Establishment Of Prema ह्या पुस्तकातून     


जय साईराम 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

भगवान बाबांचा ३वा जन्मदिन संदेश 

प्रेमस्वरूपलारा, 
                       दुःखाला दूर ठेवण्यासाठी, प्रत्येक मनुष्यास त्याच्या इच्छांची पूर्ती व आनंद हवा असतो. या जगामध्ये आनंद व दुःख कायमस्वरूपी नसते; काळानुसार ते बदलते. प्रत्येकास आंनद आणि दुःख दोन्ही अनुभवावे लागते. मनुष्य माया व तिरस्कार, घृणा यामध्ये अडकून चिंता व दुःखास आमंत्रित करतो. ज्याच्याकडे समभाव आहे तोच खरा मानव होय. म्हणून मनुष्याने दिव्यत्वावर श्रद्धा ठेऊन आपल्या हृदयामध्ये त्याचे प्रेम अनुभवले पाहिजे. 
                     प्रत्येकाने दिव्य आनंद प्राप्त केला पाहिजे. दुःखावर विजय मिळवला पाहिजे. निस्वार्थ, निरपेक्ष प्रेम विकसित करून ऐक्य व दिव्यत्व अनुभवले पाहिजे. हा आजचा माझा महत्वाचा संदेश आहे . मानवी जीवन अत्यंत मूल्यवान व उदात्त आहे. मनुष्याला कोमल हृदय, निरागस मन व श्वाश्वत जीवनतत्वे ही ईश्वरदत्त देणगी प्रदान केली आहे. प्रत्येकाने हे सत्य जाणून घेऊन हृदयामध्ये त्या माधुर्याची अनुभूती घेतली पाहिजे. समभाव विकसित करून कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदी राहिले पाहिजे. ह्या द्वंद्व जगामध्ये आलटून पालटून सुख आणि दुःख येणे स्वाभाविक आहे, अटळ आहे. प्रतिकूल परिस्थितीने निराश होऊ नका तसेच यशाने हुरळून जाऊ नका. कोणतीही प्रतिकूलता श्वाश्वत आनंदाकडे नेणारी पहिली पायरी आहे. पांडवांनी वनवासात असताना अनेक दुःखांचा व संकटांचा सामना केल्यानंतरच त्यांना कृष्णाची  कृपा प्राप्त झाली. कृष्ण सदैव, सर्वत्र त्यांच्या सोबत होता. पांडवांनी जीवनामध्ये उचित गोष्टींना प्राधान्य दिले. त्यांच्या जीवनामध्ये प्रथम परमेश्वर त्यानंतर जग व सर्वात शेवटी ते स्वतः असा अनुक्रम होता. ह्याउलट कौरवांचे प्रथम स्वतःहास, त्यांनतर जगास व शेवटी परमेश्वरास प्राधान्य होते. त्यामुळे त्यांचा युद्धात पराजय झाला व आनंद त्यांच्या हातातून निसटला.
                    ज्याने परमेश्वराचे सान्निध्य अर्जित केले आहे, तो सदैव आनंदी असतो. अनेक वर्षे तपश्चर्या करूनही परमेश्वराचे प्रेम संपादन करणे कठीण असते परंतु तुमचे परमभाग्य की आज तुम्ही स्वामींच्या दिव्य सान्निध्याचा आंनद लुटता आहात. ह्या दिव्य आनंदाच्या प्राप्तीसाठी, पूर्वीच्या अनेक जन्मात तुम्ही उग्र तपश्चर्या केली असणार, अनेक यज्ञ केले असणार, खडतर तप  केले असणार. माझे प्रेम इतरांच्या अलोट प्रेमास आकर्षित करते. 
                  कठोर शब्दांनी कोणालाही दुखावू नका. कुमार्गावरून वाटचाल करू नका. अणूपासून ते ब्रह्मांडापर्यंत सारे परमेश्वरव्याप्त आहे, हे सत्य जाणून घ्या. हे सत्य तुमच्यामध्येही विद्यमान आहे परंतु तुम्हाला त्याची जाणीव नाही. हीच सर्वात मोठी चूक आहे. तुम्ही श्रद्धा आणि विश्वास स्वरूप आहात. आत्मविश्वासाने जगातील कोणतीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता.

..... भगवान बाबांच्या २३ नोव्हेंबर २००१ च्या जन्मदिन संदेशातून


जय साईराम   

गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" माया सत्याला दडवून ठेवते. एकोहम् बहुस्यामी हे सत्य जाणा." 

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

               विवाहविधी करताना अग्नीला साक्षी ठेवून वर आणि वधू एकमेकांना वचने देतात; तरीही ते विभक्त का होतात ? हे प्रश्न मला नेहमी भेडसावतत. 
               मी अवताराच्या कुटुंबाबद्दल विचार केला तर त्यांच्याही जीवनात पती पत्नीमध्ये वियोग होता. मुलांची ताटातूट होती. कुटुंबीय आणि इतर नातेवाईक विभक्त होते. असं का ?
               मला या सर्व गोष्टी बदलून टाकायच्या आहेत. प्रेमाच्या अभावामुळे प्रत्येक कुटुंब विभक्त होत आहेत. जगाचा व्यवहार प्रेमाच्या पायावर चालायला हवा, अज्ञानाच्या नव्हे. रामावतारातील धोब्याप्रमाणे लोक अज्ञानामुळे अवताराच्या कौटुंबिक जीवनामध्ये ढवळाढवळ करतात. प्रेमावतारामध्ये अवताराच्या कुटुंबाला वियोगाचे दुःख सोसावे लागू नये, म्हणून मी खडतर तप केले. मी स्वामींना एक अट घातली आणि वर मागून घेतला, की सत्ययुगामध्ये कोणीही अज्ञानी नसेल. सत्ययुगातील सर्व बालके स्वामींचा सत्य भाव आणि माझा प्रेम भाव यामधून जन्माला येतील. त्यामुळे ती ज्ञानी प्रजा असेल. ही नवनिर्मिती आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

          " एका मागोमाग एक ज्ञानाची कवाडे खुली झाली की आपल्याला सत्याच्या सुवर्ण तेजाचे दर्शन होते. "

प्रकरण पाच

प्रेम साई अवतार 

प्रतिबिंब, प्रतिक्रिया, प्रतिध्वनी 

              आमच्या कुटुंबातील पती, पत्नी सुखी जीवन जगले नाहीत. सर्वांना वियोगाचे दुःख भोगावे लागले. लहानपणापासून मला हा प्रश्न पडे, की हा वियोग का ? माझे काका आमच्याबरोबरच राहत होते आणि माझी काकी आणि तिच्या मुली काकीच्या माहेरी राहत होत्या. कुटुंबे विभक्त का होतात ? केवळ माझ्याच कुटुंबातील नव्हे, तर माझ्या गावातील अनेक कुटुंबामध्ये हीच परिस्थिती होती. मी बाहेरच्या जगामध्ये पाहिले तिथेही तेच. मी यावर खूप विचार केला. 
             " कुटुंबामध्ये सगळ्यांनी एकत्र राहणे अभिप्रेत असते, ते वेगळे का होतात ? अग्नीला साक्षी ठेवून आणि सर्व नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह आयोजित केला जातो. विवाहसमयी धर्मशास्त्रानुसार मंत्रोच्चारण केले जाते. सर्वकाही यथायोग्य केले जाते, तरीदेखील ते वेगळे का होतात ?

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १५ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

           " जोपर्यंत मनुष्याच्या ठायी अज्ञान, इच्छा व वासना असतात तोपर्यंत त्याचा परमात्म्याशी योग होऊ शकत नाही."

प्रकरण पाच

प्रेम साई अवतार

               पूर्वजन्मात मी राधा होते, माझा जीवप्रवाह कृष्णाशी बांधलेला होता. आता तो स्वामींशी बांधला आहे. जेव्हा मी पुढे प्रेम साईंबरोबर येईन जेव्हा माझा जीवप्रवाह त्यांच्याशी बांधलेला असेल. या प्रेमाच्या अखंडित बंधामुळेच मी हे सारे लिहू शकतेय. या तिन्ही कालखंडांबद्दल मी कसे काय लिहू शकते ? मला ' मी ' नाही हेच त्याचे खरे कारण आहे. मला ' मी ' नसल्यामुळे स्वामीच प्रत्येक गोष्ट सांगतात. नाहीतर मी भूत, वर्तमान आणि भविष्य याविषयी कसे लिहू शकेन? आत्मचरित्र लिहिणारा स्वतःच्या वर्तमान जीवनाविषयी लिहितो. स्वतःच्या पूर्वजन्माबद्दल व भविष्यातील जन्माबद्दल कोण लिहू शकेल ? स्वामी मला सगळं सांगतात, त्यामुळे मी लिहू शकते. ' मी ' विना ' मी ' ची ही कहाणी आहे.

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रेमाद्वारे त्यागाची जोपासना होते. त्यागाद्वारे प्रेम फोफावते. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

               आतापर्यंत कोणीही त्यांच्या भविष्यातील जन्माविषयी लिहिले नाही. आत्मचरित्रामध्ये जीवनकथा सांगितली जाते. पुस्तकाच्या या भागामध्ये मी माझ्या भविष्यातील जन्माविषयी, तसेच माझा हा जन्म आणि पूर्वजन्म त्याच्याशी कसे संबंधित आहेत, याविषयी लिहित आहे. मी नाडीग्रंथासारखे लेखन करत आहे. मी स्वामींच्या पुढील जन्माविषयीही लिहीत आहे.  माझे तिन्ही जन्म परमेश्वराशी जोडलेले असल्यामुळेच मी हे लिहू शकते. माझ्याबरोबर पुढील जन्मात कोण येतील व त्यांचे माझे नाते काय असेल याविषयी मी लिहीत आहे. माझे कुटुंबिय आणि आता माझ्याबरोबर राहणारे यांना ( स्वामी आणि मी ) आमच्याविषयीची सत्यता माहीत आहे. ते पुन्हा येतील. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि पाहा त्यातून तुम्हाला केवढा आनंद मिळतो. "

 प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

              आत्मचरित्र लिहिणारी व्यक्ती, जीवनामध्ये आलेले अनुभव लिहिते. वाचक ते वाचताना तद्रूप होतात व त्या लेखनापासून त्यांना प्रेरणा मिळते. हे आत्मचरित्र विशेषतः परमेश्वराचा शोध घेणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यांची आध्यात्मिक जाण वाढीस लागेल. माझी सर्व पुस्तके आत्मचरित्रपर आहेत. आजमितीस माझी ३१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. २२हून अधिक पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अजून काही पुस्तके नवीन येत आहेत. जे क्रमानुसार ती पुस्तके वाचतील त्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळेल. ते वाचल्यानंतर त्यांना समजेल की एखादा जीव संपूर्ण आयुष्यभर परमेश्वराशी झालेल्या विरहाने कसा तळमळतो, विलाप करतो. प्रत्येकाला काही ५० पुस्तके वाचणे शक्य होणार नाही म्हणून मी ह्या एका पुस्तकामध्ये ते संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ४ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ त्यागमार्गाद्वारे परमशांती प्राप्त होते. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

२९ सप्टेंबर २००८ 
वसंता - स्वामी, मला आत्मचरित्रात प्रेम साईंविषयी लिहायचे आहे, त्यांच्याविषयी काही सांगा ना. 
स्वामी - आजपर्यंत कोणीही आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या भविष्यकाळाबद्दल लिहिले नाही. आत्मचरित्रात फक्त भूतकाळ आणि आणि वर्तमान याविषयी लिहिले जाते. भविष्यकाळाबद्दल लिहिणारी तू एकमेव व्यक्ती आहेस. प्रत्येकजण त्याच्या गतजन्मातील कर्माचे फळ वर्तमानात भोगतो. वर्तमानात करत असलेल्या कर्माची फळे भविष्यात भोगतो. केवळ तूच तुझा पूर्वजन्म आणि पुढील जन्म याविषयी लिहितेस. ह्या तिन्ही कालखंडात तू अवतारशी जोडलेली आहेस म्हणून तू भविष्याविषयी लिहू शकतेस. तू तुझा नाडीग्रंथ लिहिते आहेस. 
वसंता - मला समजले, आता मी लिहीन. 
ध्यानसमाप्ती

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" माया सत्याला दडवून ठेवते. एकोहम् बहुस्यामी हे सत्य जाणा. "
 
प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

               स्वामींनी मला ' प्रेम अवतार ' लिहिण्यास सांगितले. त्याचे मी पाच भाग लिहिले. त्यापैकी तीन प्रसिद्ध केले आहेत. पहिले पुस्तक ' प्रेमसाई प्रेमावतार ' हे बीज आहे. हे पुस्तक लिहीत असताना मी व आश्रमवासियांनी जो आनंद अनुभवला तो शब्दातीत आहे. ते पुस्तक म्हणजे माझ्या तपाने प्रसन्न होऊन परमेश्वराने दिलेली भेटच आहे. जे माझ्या बरोबर राहतात त्यांना स्वामी आणि माझ्याबद्दलचे सत्य माहित आहे. त्यांनी केलेल्या त्यागासाठी त्यांना मिळालेलं हे इनाम आहे. सर्वांचा त्याग करून ते माझ्याबरोबर रहायला आले आहेत. परमेश्वरप्राप्तीच्या या सच्च्या तृष्णेसाठी मिळालेलं बक्षीस आहे. स्वामींच सामीप्य लाभावं म्हणून आम्हाला जी तळमळ आहे त्यासाठी मिळालेली ही देणगी आहे. आम्ही आचरत असलेल्या भावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी स्वामींनी हे इनाम दिलंय. आश्रमवासी आणि मी त्या पुस्तकाचे लेखन कधीच विसरणार नाही. आम्ही दररोज परमानंद अनुभवला !

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, २८ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" वैराग्य सर्व इच्छांचा नाश करते आणि मनुष्याला रिक्त करते. " 
 
प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

               सत्य युगामध्ये भगवंताला भूतलावर येण्याची गरज नसते. आधीच्या सत्य युगामध्ये भगवंत अवतरला नाही. मी राधा, सीता आणि आंडाळ यांच्या मनातील परमेश्वराविषयी असणारी तळमळ, ध्यास घेऊन आले आणि एकाग्र साधना केली म्हणून सत्य युगामध्ये प्रेम साई अवतार अवतरणार आहे. 
               स्वामी म्हणाले, 
              " काम, विवाह आणि अपत्य जन्म या तीन गोष्टींमुळे निर्मिती होते. हे दोषरहित करण्यासाठी आम्ही आलो आहोत. म्हणून तुला पुनःपुन्हा अनुभव येत आहेत. या तिन्हीच्या शुद्धीकरणाने सृष्टी निर्मळ होईल. या नूतन पवित्र सृष्टीमुळे सत्य युग विकसित होईल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या जन्माची निर्मिती करता. तुमचे भाव तुम्हाला जन्ममृत्युच्या चक्रात अडकवतात. "
प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

              प्रेम साई अवतारामध्ये आंडाळ, सीता आणि राधा यांचे भाव आणि प्रभाव रूप धारण करून क्रियाशील बनतील. त्यांची भक्ती आणि परमेश्वराशी संयुक्त होण्याची तृष्णा हेच सत्ययुगाचे बीज आहे. मी आंडाळ आहे, मी सीता आहे, मी राधा आहे. माझ्यामध्ये असलेल्या त्यांच्या प्रभावामुळे मला परमेश्वरप्राप्तीची तळमळ लागली आहे. 
* माझ्या मनात रुजलेल्या आंडाळच्या ठशांमुळे मी प्रेमसाई अवतारात स्वामींशी विवाह करणार आहे. 
* माझ्यावर असणाऱ्या सीतेच्या खोल प्रभावामुळे मी सुखी कौटुंबिक जीवन जगेन आणि आम्हाला एक अपत्य असेल. 
* माझ्या मनातील राधेच्या खोल ठशांमुळे, मी सर्व निर्मितीमध्ये प्रवेश करून स्वतः साई कृष्णाशी, मूळ पुरुषाशी संयुक्त होईन. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः


मोती दहावा


              आपण सकाळपासून रात्रीपर्यंत कामात व्यस्त असतो. धावपळीच्या जीवनात आपण अगदी थोडी विश्रांती घेतो. या सर्व धकाधकीतून आपण काय मिळवतो ? बायको, मुले, अधिकारपद आणि थोडीशी मालमत्ता. यासाठी आपण किती धडपड करतो. कित्येक वेळा दैवाला दोष देतो आणि मनःशांती हरवून बसतो. जीवनात जराही शांती नाही. यातून सुटका मिळवण्यासाठी माणूस सिनेमाला जातो, मित्रांना भेटतो कादंबऱ्या, मासिके वाचतो. हे सर्व तात्पुरते उपाय आहेत. काही काळ कदाचित तो त्याची दुःख विसरेल, पण घरी परतल्यावर ती पुन्हा त्याच्या मानगुटीवर बसतील. माणसांनी कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे. सखोल चिंतन केल्यावर तुम्हाला याच उत्तर सापडेल. जेव्हा तुम्ही सर्व कर्म परमेश्वराची पूजा म्हणून कराल तेव्हाच तुम्हाला खरी मनः शांती मिळेल.
               आपण स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठीच जन्मास आलो आहोत. सगळी कर्म योगात परिवर्तित करून आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. कोण कोणाचा नातेवाईक ? कौटुंबिक जीवन हे आगगाडीच्या प्रवासाप्रमाणे आहे. ट्रेनच्या प्रवाशांप्रमाणेच कुटुंबात सर्वजण एकत्र येतात; ते कर्मांनुसार एकमेकांना जोडलेले असतात. एकमेकांचे ऋण फेडले की ते वेगवेगळ्या मार्गांनी जातात. त्या कुटुंबात असेपर्यंत प्रत्येकाने बंधनात न अडकता आपली कर्तव्ये परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनी पार पाडावी.
               सर्व नाती फसवी आहेत. फक्त परमेश्वर शाश्वत आहे. तोच आपला खराखुरा नातलग आहे. त्यालाच आपला समजून कर्म करीत राहणं हाच कर्मयोग आहे. ' मी कर्ता आहे ' या भावनेने केलेल्या कर्माचे पाश होतात, परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने केलेल्या कर्माचा योग्य होतो.
              माझ्या ' योगसूत्र ' या पुस्तकात मी आपल्या रोजच्या साध्या कृती आणि गोष्टी योगामध्ये परिवर्तन करण्याचे सोपे मार्ग सांगितले आहेत. सर्वांमध्ये फक्त परमेश्वरच वास करीत आहे हे सत्य एकदा जाणलंत की तुम्ही सगळ्या गोष्टी परमेश्वराशी जोडण्यातील आनंद अनुभवाल. दरवाजा, एक सामान्य दरवाजाच मानलात तर त्यातून काहीच आनंद मिळणार नाही. पण तीच वस्तू परमेश्वराशी जोडण्यासाठी असून असा विचार कराल की ' हा मोक्षाचा दरवाजा आहे ', तर मग तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा घटना परमेश्वराशी जोडू शकता. मी लहानपणी आमच्या खोलीतील प्रत्येक वस्तू परमेश्वराशी जोडत असे. दिवाणखान्यातील खांब हा प्रल्हादाला वाचवण्यासाठी प्रकट होणाऱ्या नृसिंहावताराचा खांब होत असे. खोलीच्या मध्यभागी असणारा झोपाळा हा राधाकृष्णासाठी असे. अशाप्रकारे मी सर्वकाही परमेश्वराशी जोडण्याची स्वतःला सवय लावून घेतली.
               तुम्ही अगदी रोजची घरगुती कामं दिव्यत्वाशी जोडलीत, तर तुम्हाला अवजड कमाचेसुद्धा ओझे वाटणार नाही.
              अशाप्रकारे मी भौतिक अर्थ तोडून सर्व गोष्टी परमेश्वराशी जोडण्याची सवय लावून घेतली. माणसाने ' तोडणे आणि जोडणे ' च्या सरावाची प्रयत्नपूर्वक सवय करून घ्यायला हवी. त्यामुळे तुम्ही जे काही बघता, ऐकता किंवा करता, ते आपोआपच परमेश्वराशी जोडता.
              माझी कर्म मला स्पर्श करीत नाहीत अथवा मला त्यांचा त्रास होत नाही. मला त्यांचं ओझं वाटत नाही त्यामुळे मी माझी कामं विनासायास करू शकते. माझं मन शांत, समतोल असतं. मी जीवनात, नदीत तरंगणाऱ्या ओंडक्याप्रमाणे स्वछंद फिरते. मी कशालाही स्पर्श करत नाही. कारण माझ्यात ' मी ' नाही, अहंकार नाही. मला काही स्पर्श करीत नाही आणि मी कशालाही स्पर्श करीत नाही, त्यामुळे माझ्या मनावर कुठलेही संस्कार नाहीत. हा माझा स्वभाव जन्ममूत्युच्या चक्रात न अडकलेल्या स्वछंद पक्ष्यासारखा आहे. 

संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' कर्म कायद्यावर उपाय ' ह्या पुस्तकातून.

जय साईराम
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः


जन्मदिन संदेश


 सर्वसंग परित्याग केल्यानंतरच मोक्ष प्राप्ती होऊ शकते.
              त्यागाशिवाय कोणालाही मुक्ती मिळणे शक्य नाही. मुक्ती मिळवणे ही काही साधी सोपी गोष्ट नव्हे. जर तुमचा एक पाय भौतिक जीवनात आणि एक पाय आध्यात्मिक जीवनात असेल तर तुम्हाला कधीही मोक्षप्राप्ती होणार नाही. असे करत असाल तर ती केवळ स्वतःची फसवणूक ठरेल. तुम्ही तुमच्या बायको, मुले तसेच अर्थार्जन करण्यासाठी त्याग करायला तयार असता मग तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी त्याग का करू शकत नाही ? भौतिक जीवन म्हणजे ' जनन मरण ' व्याधी आहे. भवरोग आहे. हा कधीही बरा न होणार रोग आहे. जर तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही डॉक्टरांकडे जाता व त्यांनी लिहून दिलेली औषधे घेता. त्यांनी सांगितलेली सर्व खाण्यापिण्याची पथ्ये पाळता, सूचना पाळता. तुमचा भवरोग बरा करण्यासाठी महामहिम डॉक्टर भगवान श्री सत्य साईबाबा येथे आले. मग त्यांनी लिहून दिलेली औषधे तुम्ही का घेत नाही ? त्यांनी सुचवलेले उपचार जर तुम्ही घेतलेत तर तुमची जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्तता होईल. त्यागरूपी औषध घेतल्याशिवाय तुम्हाला कधीही, काहीही प्राप्त होणार नाही. त्याग हे आध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीचे पहिले पाऊल आहे. तसेच आध्यात्मिक जीवनाचा आधारस्तंभ आहे. अनासक्त भावनेने तुम्ही तुमची कर्तव्ये बजावली पाहिजेत. परमेश्वर तुम्हाला संन्यास घेण्यास सांगत नाही. तुम्ही जीवनाच्या ज्या कोणत्या अवस्थेत आहात, त्यातील सर्व गोष्टींविषयी असणाऱ्या आसक्तीचा त्याग केलात तर तुम्हाला निश्चित परमेश्वर प्राप्ती होईल.
  ⃦⃦ न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनौके अमृतत्व मानशुः   ⃦
            कर्म, संतती वा धन ह्या कोणत्याही गोष्टीने अमरत्व प्राप्त होत नाही.
            भगवान सत्यसाईंनीही हेच सांगितले. मायेमधून जागे व्हा. सर्व अशाश्वत आहे. परमेश्वरासाठी मी माझ्या जीवनात सर्व गोष्टींचा त्याग केला. त्यानंतर वैश्विक मुक्तीसाठी मी मला प्राप्त झालेल्या परमेश्वराचाही त्याग केला.

श्री वसंतसाई



जय साईराम