गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रत्येक गोष्टीत चांगले पाहा. तोच परमेश्वर होय ."

इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )

           माझ आयुष्य हे असे आहे. जन्मापासून मी कोणाशी बोलायला, कोणामध्ये मिसळायला घाबरत असे. भौतिक जगातील लोकांचा स्वभाव माझ्याहून खूप वेगळा आहे. मी या जगाशी जुळवून घेऊ शकत नाही. मी त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. ते असत्याच जीवन जगले. ते बोलले तसे वागले नाहीत. मी रडले, म्हणाले, " माणसं अशी का बर आहेत ? माझा स्वभाव निराळा आहे. " बाह्यजगापेक्षा मी वेगळ्याप्रकारे लहानाची मोठी झाले. त्यामुळे जेव्हा जगाला धैर्याने तोंड देण्याची वेळ आली तेव्हा मी घाबरून गेले. 

          माझ्या बालपणी, मी नेहमी रामायण, भक्त विजय आणि अनेक महान भक्तांच्या गोष्टी ऐकत असे. मला वाटत असे की, जगात सर्व माणसं ह्या महान दिव्यात्म्यांनी घालून दिलेल्या तत्वांप्रमाणे वागतात. तसे नसल्याचे जेव्हा माझ्या लक्षात आले तेव्हा मी गोंधळून गेले. " 


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

     " कुटुंबाशी असणारे बंध पुन्हा जन्म घेण्यास कारणीभूत होतात. परमेश्वराशी असणारे बंध मोक्ष प्रदान करतात. " 

इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )


           आज अभिषेकानंतर मी पादुकांवर फुले वाहिली. त्यावेळी एका तगरीच्या फुलाची पाकळी उडाली आणि तिने देवघरातील छोट्या साईकृष्णाचा चेहरा झाकून टाकला. आरतीनंतर आम्ही सर्वांनी पहिले. सकाळीच स्वामींनी सांगितल होत  की त्यांना इथे राहायच नव्हत. तरीसुद्धा फक्त माझ प्रेम त्यांना या जगात राहण्यास भाग पडत आहे. कृष्णाच्या चेहऱ्यावरील पाकळी सुचवत आहे की स्वामींना कलियुगातील लोकांना पाहणसुद्धा अगदी असह्य होत आहे. 

ध्यान 

वसंता - स्वामी, पलीज कलियुगात अवतार का येत नाहीत याबद्दल अधिक सांगा नं. 

स्वामी - अवतार कलियुगात येऊ शकत नाही. यासाठी तुझ जीवन हे पुरेस उदाहरण आहे. तू म्हणालीस " मी कोणात मिसळू शकत नाही. " तुझ्या सवयी वेगळ्या, तुझा स्वभाव वेगळा. यामुळेच तर तुला हे सर्व भोगावे लागते आहे. 

ध्यानाची समाप्ती   


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
पुष्प - ४८
तीव्रता 

१६ जानेवारी २००९ ध्यान 
वसंता - स्वामी, तुम्ही सर्व जाणता. मला मात्र कोणतीही गोष्ट का माहित नसते? जर मला तुम्ही ज्या दिवशी बोलावणार ती नेमकी तारीख मला माहिती असती तर माझे मन शांत राहिले असते. तुम्ही मला कधी बोलावणार ? मला तुम्हाला भेटायचे आहे. 
स्वामी - म्हणूनच सर्वज्ञतेची शक्ती तुझ्यापासून दडवून ठेवली आहे. ह्या अनभिज्ञतेमुळे तू विलाप करतेस, तू मला भेटण्यासाठी व्याकुळ झाली आहेस. तुझ्या मनात नेहमीच हा विचार असतो जर ही सर्वज्ञतेची शक्ती तुझ्या ठायी आली तर तुझी व्याकुळता, तुझे अश्रू, तुझा विलाप सर्व थांबेल. ही सर्वात मोठी इच्छा नव्हे का? तू नेहमी तेच मागतेस तुझे मन ह्यामध्येच गुंतलेले असते. ही अशी इच्छा आहे की जी जगातील सर्व लोकांच्या इच्छांना दूर करते. जर एखाद्याला इच्छित गोष्ट मिळाली नाही तर त्याचे मन त्या गोष्टीवरच केंद्रित होते. जर आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळाली तर त्याबद्दलची व्याकुळता थांबते. जर एखाद्याला हवी असलेली गोष्ट मिळेल ह्याची खात्री नसते तेव्हा ती मिळवण्यासाठी अधिक तीव्रता असते. जेव्हा त्याला माहित असते की त्याला हवी असलेली गोष्ट मिळणार आहे तेव्हा तेथे भावनेची तीव्रता नसते. म्हणून ही शक्ती तुझ्यापासून दडवली आहे. 
वसंता - आता मला समजले, स्वामी. जेथे अनिश्चितता असते थेट व्याकुळता असते. 
ध्यान समाप्ती  
           माझी केवळ एकच इच्छा आहे. मला स्वामींचे दर्शन, स्पर्शन आणि संभाषण हवे आहे. ही व्याकुळता आजकालची नाही तर ह्याची सुरुवात १९७४ साली जेव्हा मला स्वामींविषयी समजले. ह्यापूर्वी मला कृष्णासाठी तीव्र व्याकुळता होती आणि ह्याच कारणासाठी माझी ही व्याकुळता कधी संपेल असे मी स्वामींना विचारले. आमच्या दोघांच्या देहांमध्ये एकच बुद्धी, एकच जीवप्रवाह कार्यरत असूनही भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचं ज्ञान, सर्वज्ञतेची शक्ती दडवून ठेवली आहे. जर मला हे ज्ञात असते तर मी शांत असते. परंतु मला ती नेमकी तारीख माहित नसल्यामुळे माझी व्याकुळता अधिकाधिक वृद्धिंगत होत आहे. ती बकासुराच्या भुकेसारखी आहे. तथापि ही बकासुराची भूक स्वामींच्या एका रूपाने तृप्त होणार नाही. त्या व्याकुळतेला प्रत्येकामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निवास करणारे स्वामी हवेत, सर्वांना स्वामींचे दर्शन, स्पर्शन, संभाषण मिळावे अशी इच्छा आहे. हे सत्ययुग आहे, नवनिर्मिती आहे. 
           मला स्वामींचे दर्शन, स्पर्शन व संभाषण प्राप्त न झाल्यामुळे माझ्या भावनांची तीव्रता अव्याहतपणे वाढते आहे. माझ्या मनाला अन्य कोणत्याही गोष्ट स्पर्श करत नाहीत.भविष्यात काय घडेल. ह्याबद्दलच्या अनिश्चिततेमुळे अपेक्षा तीव्र आहेत. जोपर्यंत भविष्यातील घडणाऱ्या गोष्टीबद्दल निश्चितता नसेल तोपर्यंत माझी ही व्याकुळता वाढतच राहणार. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या 'Brilliance of a Million Suns' ह्या पुस्तकातून. 


   



ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " परमेश्वराला तुमच्यामध्ये प्रस्थापित करा. तुम्ही परमेश्वरमध्ये प्रस्थापित व्हा. "
इन्क्युबेटर (निर्जंतुक पेटी )

           सत्ययुग पुढे अनेक वर्षे येण्याच चिन्ह नव्हते. सत्ययुग येण्यासाठी अजून कित्येक हजार वर्षे बाकी आहेत. अशा परिस्थितीत जर सत्ययुगाचा उदय आत्ताच करायचा झाला तर हे कार्य किती खडतर असल पाहिजे ? कलिचा सैतान अकाल येणाऱ्या सत्ययुगावर हल्ला करेल. युगांच चक्र नैसर्गिकपणे फिरत असताना हे अस होत नाही. परंतु आता सत्ययुग त्याच्या नियोजित वेळेपूर्वी, अकाली येत आहे. माझे भाव आणि प्रेम यांच्यायोगे मी योग्य वातावरणनिर्मिती करून सत्ययुगाच रक्षण करीत आहे. स्तूप निर्जंतुक पेटीचे कार्य करीत आहे. कसं ? तर स्तूप माझे भाव सर्वव्याप्त करून सत्ययुगाचं रक्षणही करत आहे. हा स्तंभ मातेच्या गर्भाप्रमाणे प्रेमाचं पोषण करत आहे, तसच, जन्माला येणाऱ्या भावी सत्ययुगाचं, कलीरूपी सैतानापासून संरक्षण करण्यासाठी वातावरण निर्माण करीत आहे. सत्ययुग स्तूपाच्या निर्जंतुक पेटीत योग्य वेळ येईपर्यंत राहील. हा आहे विश्वगर्भ.    

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम  

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" प्रेम हे नाम, रूप, स्थळ आणि काळ या सर्वांच्या पलीकडे आहे. "
 
इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )

           खरंच ! स्वामी, नुसत्या विचारानेही माझा थरकाप होतोय!
           स्वामी कलियुगामध्ये अवतरित झालेत; करुणेपोटी ते सत्ययुग आणणार आहेत. प्रेम सर्वांच परिवर्तन करीत आहे. माझ प्रेम आणि विश्वामुक्तीची इच्छा स्वामींना पृथ्वीवर राहण्यास भाग पाडत आहे. 
          स्वामी गेले ऐंशी वर्षे सर्व मानवजातीला प्रेमाचा मार्ग दाखवत आहेत, आणि मार्गदर्शन करीत आहेत. कोणी त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागतय का ? हे जग आणि ह्या जगातील माणसं अवताराच्या येथील वास्तव्यासाठी योग्य नाहीत. 
           आता आपण इन्क्युबेटरविषयी पाहू या. जेव्हा मूल अपूर्ण दिवसांचे जन्माला येते. तेव्हा त्याचे व्यवस्थित पोषण होण्यासाठी त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवले जाते. मूल योग्य वेळेपूर्वी जन्माला आले असल्याने बाहेरील वातावरण त्याच्यासाठी योग्य नसते. ते रोगांना बळी पडू शकते. इन्क्युबेटर ही कृत्रिम गर्भाप्रमाणे बाळाचे रक्षण करीत असते.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .... 
जय साईराम 

गुरुवार, १६ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
      " खऱ्या प्रेमाला देह अथवा विवाहाची आवश्यकता नसते केवळ भावना पुरेशा असतात."
इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी )

           कौशिक ऋषींच्या मते 'विलक्षण प्रेम ' म्हणजे काय ते आता पाहूया. मानवी देह हा घाम, लाळ, मलमूत्राने भरलेला असतो. कोणताही मानवी देह याशिवाय असू शकतो का ? अवताराचा देहसुद्धा याला अपवाद नाही ! मग मी एकटीच हे सर्व माझ्या देहात नको म्हणून का रडते आहे. कारण मला देह परमेश्वराला अर्पण करायचा आहे. आजपर्यंत कोणी शरीरनिवेदन केले आहे का ? माझ वेडं प्रेम त्यासाठी रडत असत. 
           कौशिकऋषी या प्रेमाच ' विलक्षण ' अस वर्णन करतात. हे मानवी प्रेम नाही, आध्यात्मिक क्षेत्रातील प्रेमही नव्हे आणि अवताराचे प्रेमही नाही. हे अवर्णनीय, विलक्षण, एकमेवाद्वितीय प्रेम आहे. म्हणूनच स्वामी म्हणाले, " तुझ प्रेमच मला या जगात राहण्यास भाग पाडत आहे, नाहीतर मी इथे राहूच शकलो नसतो."
            कलियुगात अवतार येत नाहीत. कलिच्या वातावरणात कलियुगाच्या लोकांबरोबर ते राहू शकत नाहीत. कलियुगाच्या अखेरीस सर्वांचा विलय करण्यासाठीच अवतार येतो. त्यानंतर युगाच नवीन चक्र सुरु होत. पण आता स्वामींचा अवतार कलियुगाच्या सुरुवातीस आला आहे. आत्ताच जर कली इतका वाईट आहे, तर कल्पना करा, पुढील हजार वर्षात तो कुठल्या स्तराला गेलेला असेल ?  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम   

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी मनुष्याला असणाऱ्या लालसेपोटी निसर्गाचा समतोल बिघडला आहे. "
इन्क्युबेटर (निर्जंतुक पेटी)

       हे अस प्रेम आहे जे रात्रंदिवस बुडून अश्रू ढाळत असत. 
       हे अस प्रेम आहे, ज्याला काहीही नको आहे. अगदी परमेश्वरी पदवीही. 
      हे अस प्रेम आहे जे उच्चस्तरीय ज्ञानात आणि ब्रह्मसूत्रातही समाविष्ट होऊ शकणार नाही. 
      १२ मार्च २००४ साली कौशिक नाडी वाचली गेली. त्यात म्हटले आहे, " ही भगवान बाबांच्या प्रती असलेली अलौकिक, विलक्षण प्रेमभक्ती आहे " ही एक अढळ आणि चिरंतर प्रेमभक्ती आहे. 
      हे अस प्रेम आहे जे माझ हृदय नि मन ओतप्रोत भरून टाकत; आणि मी लिहिलेल उच्च ज्ञान मला विसरायला लावत. 
     हे अस प्रेम जे ईश्वरावस्था नाकारून फक्त स्वामींच्या एका दर्शनासाठी आसुसलेलं असत. 
    हे अस प्रेम आहे, जे मला विचार करायला लावत, ' मी जर स्वामींच्या जवळच्या भक्तांच्या घरातील नोकर किंवा कुत्र्याचं पिल्लू असते तर मला त्यांच दर्शन मिळाल असत.'     

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
  
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम  

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " परमेश्वराची निर्मिती परस्वरावलंबी आहे. निर्मितीत समतोल राखण्यासाठी आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीची परतफेड केली पाहिजे. " 
 
इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी ) 

           दहा वर्षांपूर्वी माझे नाडीवाचन केले गेले, त्यात माझ प्रेम हे ' एकमेवाद्वितीय प्रेम ' आहे असे म्हटले होते. ते पूर्वीच्या अवतारांच्या प्रेमाप्रमाणे नाही. सीतेचे रामावरील प्रेम नाही. रुक्मिणीचे कृष्णाप्रती असलेले प्रेम नाही. राधेचेही कृष्णावरील प्रेम नाही. माझ प्रेम अगदी विलक्षण आहे. या अवतारावर असलेल्या माझ्या प्रेमाला काय बरे नाव द्याल ? त्याच कोणत्या प्रकारात वर्गीकरण करता येईल ? हे एक वेडं प्रेम आहे. 
            सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मला इतक प्रेम हवय की जे माझ्या ह्या एका देहात सामावू शकणार नाही. हे संपूर्ण जग वसंता होऊन स्वामींवर प्रेमवर्षाव करू देत. ह्या प्रेमाचे एकमेव परिणाम म्हणजे नवनिर्मिती. आजपर्यंत कोणत्याही युगात कोणत्याही अवतारावर इतक प्रेम प्रकट केल गेल नव्हत.    

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम  

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

  " मनुष्याने विवेकबुद्धीचे अनुसरण केल्यास पंचतत्वांमध्ये समन्वय राहील. " 

 

इन्क्युबेटर (निर्जंतुक पेटी )


           विशेष कृपा म्हणजे विशेष प्रेम. निर्मितीच्या प्रारंभापासून कित्येकांनी प्रेम व्यक्त केले आहे. हे काही सांसारिक प्रेम नाही. भौतिक प्रेम हे निरनिराळ्या नात्यांद्वारे व्यक्त होते. पुरुष आणि स्त्रीमध्ये आसक्ती असते. पतिपत्नींमध्ये त्याला प्रीती म्हणतात. पालक व मुलांमध्ये ममता, तर दोन मित्रांमध्ये मैत्री असते. ही सर्व भौतिक प्रेमाची उदाहरणे आहेत. जेव्हा हे प्रेम  परमेश्वराकडे वळवले जाते, तेव्हा ते भक्तीच्या सहा भावामधून व्यक्त होते. 

            वात्सल्य भाव, साख्य भाव, अनुराग भाव, दास्य भाव, मधुर भाव आणि शांत भाव. 

            माझ प्रेम इतरांसारख नाही. ते सर्वसाधारण भौतिक प्रेम नाही किंवा भक्तीच्या या सहा भावांमध्येही मोडत नाही.     

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" परमेश्वर ना नर आहे ना नारी, वास्तविक त्याला लिंग नाही. "
 
इन्क्युबेटर ( निर्जंतुक पेटी ) 

तारीख ८ डिसेंबर २००८, ध्यान 
वसंता - स्वामी, मी 'विशेष कृपा ' विषयी लिहिले. 
स्वामी - विशेष कृपा म्हणजे काय ? विशेष प्रेम होय. तुझ्या प्रेमामुळेच मी या जगात आहे. नाहीतर मी इथे राहूच शकलो नसतो. यापूर्वी कलियुगात अवतार झाला होता का ? कलियुगात अवतार येत नाही. कलियुगाचा कालखंड खूप कठीण असतो. अवतार अशा परिस्थितीत पृथ्वीवर राहू शकत नाही. म्हणूनच कलियुगात अवतार नाही. 
वसंता - स्वामी, मग कल्की अवतार कसा येतो ?
स्वामी - युगान्ती सर्वांचा संहार करण्यासाठी अवतार अवतरण करतो. त्यानंतर क्रिथयुग येते. आता आपण कलियुगाच्या सुरुवातीस आलो आहोत. कलिचे परिवर्तन करणे सोपे कार्य आहे काय ? तू तुझ्या प्रेमाने हे करते आहेस. 
वसंता - स्वामी, कित्येक वेळा आम्ही यज्ञाच्या फोटोंमध्ये घोड्यांची प्रतिमा पाहिली आहे. तुम्ही म्हणालात की तो 'प्रेमअश्व' आहे. 
स्वामी - आता तो घोडा म्हणजे युगान्तास येणारा कल्की अवतार दर्शवतो. वैकुंठ एकादशीला विशेष यज्ञ कर आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना कर. 
          ... अपूर्ण दिवसात जन्माला आलेल बाळ इन्क्युबेटरमध्ये ठेवले जाते. ते सशक्त होईपर्यंत त्यात राहते. इन्क्युबेटरमध्ये वातावरण व तापमान मातेच्या गर्भाप्रमाणेच असते. सत्ययुगाची जन्म अपूर्ण दिवसात, ठरलेल्या वेळेपूर्वी म्हणजे कलियुग हे कालक्रमानुसार बदलण्याआधी व्हायला हवा. तुझे भाव इन्क्युबेटरप्रमाणे योग्य वातावरण निर्माण करीत आहेत. ते कलियुगाच्या दुष्परिणामांपासून सत्ययुगाचे रक्षण करतात. स्तूप ही निर्जंतुक पेटीच होय. स्तूपाद्वारे तू योग्य वातावरणनिर्मिती करते आहेस. त्यानंतरच, सत्ययुग येईल. 

ध्यानाची समाप्ती      

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " प्रेमाला लज्जा माहित नाही. कोणतीही गोष्ट प्रेमाला नियंत्रित करू शकत नाही. ते कोणावरही अवलंबून नाही. ते सदा मुक्त असते. " 
विशेष कृपा
 
            विशेष कृपा ही सर्वोच्च स्थिती आहे. अवताराच्या या तीन अवस्था आहेत. प्रथम करुणेद्वारा परमेश्वर अवतार घेतो. अवतारकाळात तो काहींवर कृपावर्षाव करतो. तिसरी स्थिती म्हणजे विशेष कृपा. जेव्हा ही विशेष कृपा वर्षू लागते, तेव्हा ती पात्रता पहात नाही, फक्त वर्षाव करते. 
            १९९७ साली आम्ही ' लिबरेशन हिअर इटसेल्फ राईट नाऊ ' या पहिल्या पुस्तकाच प्रकाशन पुट्टपर्तीत केले. याच दिवशी स्वामी पहिल्यांदा सुवर्णरथावर आरूढ झाले आणि पवित्र नाडीशास्त्रात लिहिल्याप्रमाणे असे जाहीर केले गेले की, जे रथारूढ स्वामींचे दर्शन घेतील त्यांना मुक्ती मिळेल. 
           याच शुभदिनी स्वामींनी माझ्या पुस्तकाला स्पर्श केला. त्यांनी फीत काढून त्या पुस्तकाचे आपल्या दिव्य हस्ते प्रकाशन केले. 
            आता स्वामी ज्या दिवशी सुवर्णरथावर आरूढ झाले त्याच दिवशी त्यांनी मला यज्ञात ' काळा ' ची आहुती देण्यास सांगितले. विशेष कृपेची ही दोन कार्ये जगदोध्दारासाठी व वैश्विक मुक्तीसाठी केली गेली.
  
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" प्रेम हवेला शुद्ध बनवून पृथ्वीला मंगल बनवते. "

विशेष कृपा 

           स्वामी त्यांच्या संदेशात म्हणाले की सर्वांनी त्यांच्याकडे परमेश्वराच्या आत्मतत्वात परतून विलीन व्हावे. मीही हेच सांगते आहे. माझ्याप्रमाणे सर्वांनी परमेश्वरात एकरूप व्हावे. मी स्वामींमध्ये जशी एकरूप झाले, तसेच सगळे त्यांच्यात विलीन होतील. माझ्या सर्व पुस्तकांमध्ये मी हेच सांगत आहे. मी हे लिहीत असताना तेच शब्द स्वामींच्या संदेशरूपात आमच्याकडे आले. आम्ही दोघ एक आहोत याचा हा पुरावा. 

           श्रीकृष्ण कोण आहे हे कुब्जेला माहित होते, म्हणूनच तिच्यावर विशेष कृपेचा वर्षाव झाला. त्या दृष्टीहीन मुलाला, स्वामी कोण आहेत हे ठाऊक नव्हते, तरीही त्याला स्वामींची विशेष कृपा लाभली. विशेष कृपेला भेदभाव ठाऊक नाही. ती निःपक्षपाती असते. याच कारणासाठी स्तूपाचे नाडीशास्त्र सांगते की अगदी दुष्ट दारुड्यालाही मुक्ती मिळेल. 

           परमेश्वर मानवावर तीन प्रकारे दयेचा वर्षाव करीत असतो. 

* करुणा 

*  कृपा 

*  विशेष कृपा 


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम 

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प  -४७ 

           परमेश्वरामधून प्रेमाचा उद्भव होतो. जेव्हा त्याच्यामध्ये प्रेम उद्भवते तेव्हा सृष्टीची उत्पत्ती होते. समस्त सृष्टी त्याची लेकरे आहेत. एक आत्मा अनेक होतो. हे ' एकोहम  बहुस्यामि ' आहे. परमेश्वराची मुले  त्याच्यासारखीच असायला हवीत. मुले त्यांच्या पालकांसारखी असणे म्हणजेच निर्मिती, सृष्टी सर्वसाधारणपणे असे घडते. तथापि जर आपण त्यावर चिंतन केले तर आपल्या असे लक्षात येते की परमेश्वर आपला मूलस्रोत आहे. आपण त्याच्यासारखे असायला हवे. स्वामींनी भूतलावर येऊन ८४ वर्षे ही शिकवण दिली ." उठा !जागे व्हा ! मायेचा पडदा दूर सारा. मी एकमेव तुमचा पिता आहे. अन्य कोणी नाही. मी समस्त सृष्टीचा पिता आहे. सर्व माझी लेकरे आहेत. तुमचे आपापसातील भेद विसरून माझ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर हेच तुमचे खरे स्वरूप आहे ! तुम्ही परमेश्वराची लेकरे आहात, हे जाणून घ्या. एका परमात्म्यामधून सर्व जीवात्मे आले आहेत. प्रेम हा तुमचा स्थायीभाव आहे. बाकी सर्व वृतींचा तुम्ही त्याग करून जीवनात सत्य, धर्म आणि अहिंसा ह्यांचे आचरण केले तरच तुम्हाला शांती प्राप्त होईल. "

स्वामींनी हा संदेश दिला. 

           आजच्या परिस्थितीत परमेश्वराला धरून ठेवणे हे आपले तप आहे. प्रेमाचा उद्भव केवळ परमेश्वरमधूनच होतो. हे प्रेम वृध्दींगत करणे आपल्या प्रेमाची व्याप्ती वाढवणे. आपले नाते केवळ परमेश्वराशीच असायला हवे. आता, इथे, याक्षणी आपण आपल्या प्रयत्नांद्वारे त्याची अनुभूती घेतली पाहिजे. माझे संपूर्ण जीवन म्हणजे ह्यासाठीचे  प्रयत्न. मी प्रदीर्घ साधना करून स्वामींचे प्रेम प्राप्त केले. ५८ वर्षाच्या दीर्घ साधनेनंतर स्वामी माझ्याशी ध्यानात बोलू लागले. माझ्या मार्गात काहीही आले तरी मी कधीही स्वामींना दृष्टीआड होऊ न देता त्यांना घट्ट पकडून ठेवले. 

           सर्वांनी प्रयत्न करून ' मी आत्मा आहे' ह्याची अनुभूती घेतली पाहिजे. हे जीवनाचे ध्येय आहे. आपले आत्म्याशी असलेले नाते हेच केवळ खरे आणि शाश्वत नाते  आहे. जर तुम्ही भौतिक नात्यात भ्रमित झालात तर तुम्ही जन्म मृत्युच्या चक्रात अडकाल. 

संदर्भ - श्री वसंतासाई ' New Bliss ' ह्या पुस्तकातून . 

 

जय साईराम  

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

स्वामींचा वाढदिवस 


१७-११-२००९
आज आहे स्वामींचा वाढदिवस !
ओ स्वामी, केव्हा, कुठं आणि कसे जन्मलात ?
अरे ! काळ ह्या कालातीताला गवसने घालून त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहे !
हे काळा ! इकडे ये. तुला मी एक गोष्ट दाखवते. 
इथे पहा, एक सुंदर कळी उमलत आहे..... फुल जन्मास येत आहे. 
एक पावसाचा थेंब ! कुठून आला बरं हा थेंब, नव्या नव्हाळीचा ?
आकाशातून मातीत पडला ... तो मातीत पडत असताना माती उसळली 
तिचा जन्म आपण पाहतो आहोत. ..... 
काळोखे आकाश !पहा पहा, साई सूर्याचा जन्म. 
अरे हे काय ? सूर्याला कोण झाकून टाकत आहे? हं, ते आहेत धावते ढग ..... 
अरे बापरे, हा कसला आवाज ? असं विचारतो आहेस का ?
अरे, गडगडाट करत ते म्हणतायत, " आम्ही जन्मलो, आम्ही जन्मलो. "
डोळे दिपतायत, हा कसला प्रकाश म्हणून विचारतो आहेस होय ?
अरे ही तर लखलखती वीज, ती म्हणतेय, ' मी जन्मले, मी जन्मले.'
संवाद : 
काळ : हे सगळं काय आहे? 
वसंता : ये, तुला दाखवते. तुझ्या वाढदिवसाचा झेंडा इथे रोव. नवीन पाणी येतंय बघ, समुद्राला मिळण्यासाठी. हे काय ? झेंड्याला ढकलून देत पाणी वाहतंय असं म्हणतोस होय ! अरे हे पाणी क्षणा क्षणाला नव्यानं जन्मास येत आहे. 
काळ : तिथे नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मी तिकडे जातो, वाढदिवसाचा झेंडा रोवायला. 
वसंता : हे बघ, नवीन फुलपाखरू, तुझ्या झेंड्यावर आत्ताच जन्मलं. 
काळ : ओय ओय, माझ्या पायाला काहीतरी चावलं, 
वसंता : अरे ही तर नवी मुंगी, ती म्हणतेय, " मी आताच जन्मलेय, माझा वाढदिवस साजरा करा."आता तू सांग , तुझ्या वाढदिवसाचा झेंडा तू कसा आणि कुठं कुठं रोवशील ? स्वामी क्षणा क्षणाला सर्वत्र नव्या नव्हाळीने जन्मास येत आहेत. 
काळ : काय सांगतेस काय तू ? माझं डोकं भिरभिरतंय; हे नारी , तू कोण ? तुला हे सगळं कसं काय कळलं , सांग न मला. 
वसंता : मी कोण विचारत आहेस का ? मला सगळं कसं माहीत, असं वाटतंय नं तुला ? 
अरे, माझ्या गळ्यात स्वामींचं मंगळसूत्र आहे. त्यांनी मला सांगितलं, मी अर्धांगिनी आहे त्यांची, 
आम्ही शिव शक्ती आहोत. तू इथे येऊ नकोस, जा तू. 
तिथे पुट्टपर्तीमध्ये अर्धाच देह आहे. तिथे अर्ध्या देहाचाच वाढदिवस साजरा करतात. 
इथे मुक्ती निलायममध्ये मी कोण आहे हे ह्यांनी ओळखलं आहे. 
हे पूर्ण देहाचा पुर्णत्वानं पूर्ण वाढदिवस साजरा करतात. 
अरे काळा, तू निघून जा. 
इथे भगवंताला काळवेळेत बांधायला येऊ नकोस हे सत्ययुग आहे, इथे परमेश्वर प्रत्येकामध्ये प्रत्येकक्षणी जन्म घेतो. इथे आम्ही क्षणा क्षणाला स्वामींचा वाढदिवस साजरा करत असतो. 
मी स्वामींकरता ही कविता लिहिली. हे ज्ञानाचं उच्चतम शिखर आहे. इथे पूर्ण सत्याचं नूतन प्रकटीकरण झालं आहे. हे लिहून झाल्याबरोबर माझं मन पुन्हा प्रेमाकडे वळलं. स्वामींच्या दर्शन, स्पर्शन, आणि संभाषणासाठी आसुसलं. स्वामी, अवघे जग तुमच्याकडे येते, मला तुमचे दर्शन का नाही मिळणार ? हा प्रवास अंतहीन आहे, एकीकडे उंच उंच जाणारं ज्ञान, तर दुसरीकडे प्रेम; खोल खोल गहिरं होत जाणारं. माझा हा खडतर प्रवास अव्याहत चालूच आहे. तथापि हे स्वामींचं अवतार कार्य आहे. भगवान आणि काळाशी माझा असा संघर्ष सुरु आहे. अखेरीस मी यशस्वी होईन, मी विजयी व्हायलाच हवं. मी ह्या कलियुगाला सत्ययुगात परिवर्तित केल्याशिवाय सोडणार नाही. सत्यसाई अवतार कधीच पराभूत होणार नाही. म्हणून मी पराकोटीच्या सबुरीने वाट पाहत आहे. 

संदर्भ - श्री वसंतासाई लिखित साहित्यातील. 


जय साईराम  

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " शुद्ध भाव मानवाला माधव बनवतात. अशुद्ध भाव मानवाला पशु बनवतात. "

विशेष कृपा 

           सकाळी मी लिखाण करीत असताना, इंटरनेटवर आम्हाला एक संदेश आला. तो स्वामींचा संदेश होता,' माझ्याबरोबर ये, यापुढे जराही ताटातूट नाही, ही आज केलेली आज्ञा  आहे. माझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी मी मला माझ्यापासून अलग केल. अनुभव संपला. आता मला माझे सर्व माझ्यामध्ये, एका आत्मतत्वामध्ये परत यायला हवेत. 

           हेच आहे सत्ययुग. स्वामी म्हणत आहेत की आता सर्व अनुभव संपले आहेत. याचा अर्थ काय ? याचा अर्थ कर्माचे अनुभव संपलेत. कर्मांमुळे अनुभव घेण्यास सर्व जन्माला येतात. आता जर कर्मच उरली नाहीत, तर त्याचा अनुभवही उरला नाही. याच कारणासाठी स्वामींनी मला १७ नोव्हेंबरला यज्ञात काळाची रूपकात्मक पूर्णाहुती देण्यास सांगितले. आम्ही तीन पुठ्ठ्यांवर भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमानकाळ असं लिहून एक घड्याळही काळाचं चिन्ह म्हणून पूर्णाहुतीमध्ये घातल. त्यावेळी आम्ही पाहिले की घड्याळ, भूतकाळ आणि वर्तमानकाळ पूर्णपणे जळला होता आणि भविष्यकाळाला अग्नी जराही शिवला नव्हता . याचाच अर्थ असा की सत्ययुग कोणाचेही जन्म कर्मांमुळे नसतील. आपण परमेश्वरापासून वियुक्त नसून संयुक्त आहोत ह्या जाणीवेतून सर्वजण दैवी आयुष्य जगातील. हे सत्ययुग आहे, नवीन निर्मिती !    

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " संपूर्ण विश्वामध्ये एकच चैतन्य भरून राहिले आहे. आपले भाव आपल्याला त्या वैश्विक चैतन्याशी जोडतात. "

 

विशेष कृपा 

           प्रथम काही जणांनी मला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. तेव्हाच माझ लक्ष वैश्विक कर्माकडे वेधलं गेलं. माझ्या लक्षात आलं की हे जग रोग, समस्या आणि कर्मांमध्ये पूर्णपणे बुडलय. मी स्वामींजवळ रडले, " तुम्ही माझ्या तपस्येची शक्ती घ्या आणि सर्वांना मुक्ती द्या. " ह्या प्रार्थनेचे फळ म्हणजेच विश्वमुक्ती. मी काहीही करत नाहीये. स्वामींनी त्यांच्या स्पंदशक्तीला वसंता हे नाव-रूप देऊन आणल आणि तिच्याद्वारे स्वामीच कार्य करीत आहेत, म्हणून वसंता हे त्यांच केवळ एक साधन आहे. वसंता ह्या नावरुपाद्वारे स्वामींची विशेष कृपा कार्य करीत आहे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" ईश्वराभिमुख केलेले तुमचे भाव तुम्हाला परमेश्वर बनवतात." 

 

विशेष कृपा 

            माणसाची कर्म कशी धुतली जातात हे १९९९ साली घडलेली ही घटना दर्शवते. सावित्री ह्या दक्षिण आफ्रिकेतील भक्त आहेत. त्या साई समितीच्या उत्साही कार्यकर्त्या असून नऊ साई केंद्रांच्या अध्यक्षा होत्या. १३ ऑक्टोबर १९९७ रोजी त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. ८ ऑक्टोबर १९९९ ला टांझानियाच्या सुमित्राने मला फोन करून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. ध्यानात मला स्वामी म्हणाले,' कॅन्सर कॅन्सल झाला. ' माझ्याकडे त्यांना फोन करून स्वामींचा निरोप देण्याची सुविधा नव्हती. म्हणून मी स्वामींनाच सांगितले की त्यांना संदेश पोहोचवा ! नंतर आफ्रिकेच्या दुसऱ्या एका भक्ताचा फोन आला असता ते म्हणाले की ते स्वामींचा संदेश त्यांना सांगतील. नोव्हेंबरमध्ये सावित्री स्वामींच्या वाढदिवसासाठी पुट्टपर्तीला गेल्या. त्यावेळी त्यांनी सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये तपासण्या करून घेतल्या. तेव्हा त्यांना एकदम तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. ३ डिसेंबरला स्वामींनी त्यांना मुलाखतीला बोलावले आणि काही औषधे चालू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांनी स्वामींकडे मला भेटण्याची परवानगी मागितली. स्वामींनी अनुमती देऊन म्हटले. " वडक्कमपट्टी आंटीना जाऊन भेट. " माझ्या तपस्येमध्ये एखाद्याचा कर्मसंहार करण्याची ताकद आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होते.  

*     *     *


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" ईश्वर प्रेम आहे, ह्या प्रेमाची अभिव्यक्ती हा मानवधर्म आहे."
विशेष कृपा 

            मी मागितलेली विश्वमुक्ती या विशेष कृपा आणि करुणेद्वारे सर्वांना मिळेल. जरी परमेश्वराने अवतार घेतला, तरी तो कर्माच्या कायद्यात हस्तक्षेप करीत नाही. याच कारणासाठी त्यांनी स्वतःला दोहोंमध्ये विभागले आणि त्यांची विशेष कृपा म्हणून माझा जन्म झाला. माझ्या तपश्चर्येमुळे सर्वांना मुक्ती मिळेल. त्यांच्यापासून निर्माण झालेली सृष्टी त्यांच्यासारखीच होईल व पुन्हा त्यांच्यामध्ये विलीन होईल. याच एका कारणास्तव त्यांनी ही कुशल योजना आखली. 
            अनेक वर्षांपूर्वी मी एका स्त्रीला तिच्या पतीचे जीवन धोक्यात होते म्हणून सावित्री शक्ती दिली होती. स्वामींनी त्या व्यक्तीचे आयुष्य २० वर्षांनी वाढवले. याप्रमाणे मी काहींना कर्मसंहार करून त्यांचे आयुष्य वाढवू शकले. माझ्या प्रार्थनांमुळे अनेक असाध्य रोग बरे झाले. अनेक लोकांचे कर्मसंहार झाले. या घटना मी अनेक पुस्तकात नमूद केल्या आहेत. ' माझे अश्रू आणि मी केलेल्या तपश्चर्येमध्ये कर्मसंहार करण्याची ताकद आहे. ' हे ह्या घटनांमधून सिद्ध होते. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
         " जर आपले भाव शुद्ध असतील तर आपण शक्ती आणि उत्साह दोन्हीचा आनंद घेऊ शकतो."
विशेष कृपा 

          प्रथम स्वामी म्हणाले की मी त्यांची 'दयादेवी ', करुणेची देवता आहे. आता 'स्पंद' ची नवीन स्पष्टीकरण देऊन स्वामी हळूहळू खुलासा करीत आहेत. प्रथम स्वामींनी मला चित् शक्ती म्हणून संबोधले. नंतर दयादेवी आणि आता विशेष कृपा. त्यांनी त्यांच्यातच स्थित असलेल्या त्यांच्या स्पंद शक्तिला माझ्या स्वरूपात आणले. मला या सत्याची काहीच कल्पना नसल्याने मी त्यांच्यात विलीन होण्यासाठी सतत रडत राहिले. 
          या वियोगावस्थेमुळे आणि अमर्याद प्रेमामुळे मला सर्वांना माझ्यासारखे बनवायचे आहे. माझ्या तपश्चर्येनी मी सर्व कर्म समतोल करते. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाई नमः 
सुविचार 
" आपले भाव आपल्या जीवननिर्मितीस जबाबदार असतात. "
 
विशेष कृपा 

            दुसर उदाहरण. या करुणेमुळे पुट्टपर्तीमध्ये तीन दिवस सहस्त्रचंद्रयज्ञ केला गेला. पहिले दोन दिवस जगाच्या कल्याणासाठी स्वामींनी साक्षीअवस्थेसाठी करुणेचा वर्षाव केला. हा यज्ञ करण्याच कारण ही करुणाच आहे. तिसऱ्या दिवशी जेव्हा ते सुवर्णरथात आले, तेव्हा ते संपूर्ण दिव्यकृपावस्थेत होते. ही विशेष दिव्य कृपा जगातून दुष्टशक्ती नाहीशा करते. त्याच दिवशी स्वामींनी मला मुक्ती निलयममध्ये यज्ञात काळाची आहुती देण्यास सांगितले. स्वामींची स्पंदशक्ती असल्याने मी मुक्ती निलयममध्ये राहून काळाची पूर्णाहुती द्यावी असे मला स्वामींनी सुचवले. 
           तिसऱ्या दिवशी स्वामींनी जो विशेष कृपेचा वर्षाव केला तो याचीच फलश्रुती आहे. म्हणूनच, स्वामींनी त्याचदिवशी विशेष कृपेचा वर्षाव केला. 
           म्हणूनच स्वामी मला म्हणाले की मी त्यांच्या विशेष कृपेचे रूप आहे. ते म्हणाले," तू सर्वांवर करुणेचा वर्षाव करते आहेस आणि साक्षात् युगपरिवर्तन करत आहेस. " 


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
        " आपले अस्तित्व म्हणजे जीवनभराचे एक स्वप्न आहे हे आपण जाणले पाहिजे. "
 
विशेष कृपा 

           एकदा स्वामींनी त्यांचे भक्त वॉल्टर यांना जीवनदान दिले. हे विशेष कृपेचे उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. ही प्रेरक चैत्यन्यशक्ती परमेश्वराला कार्य करण्यास उद्युक्त करून विशेष कृपेचा वर्षाव करते. दुसरे उदाहरण कृष्णावतारात कुब्जेने कंसाच चंदन कृष्णाला दिले. कृष्णाने तिच्यावर कृपावर्षाव करून तिचे शरीर आमूलाग्र बदलले. क्षणार्धात कुब्जा एक सुंदर स्त्री झाली. तिने श्रीकृष्णाचे दिव्यत्व जाणले होते. तिने कुठलीही भिती न बाळगता कृष्णाला कंसाच चंदन दिले, म्हणूनच कृष्णानी कुब्जेच तीन ठिकाणी वक्र असलेलं शरीर सरळ करून तिच सौंदर्य तिला बहाल केल. क्षणार्धात तिची सर्व कर्म धुतली गेली. स्पंदशक्तीने कृष्णाला हे करण्यास आतून उद्युक्त केले. 
           प्रत्येक अवतार मानवतेवर करुणा आणि कृपेचा वर्षाव करीत असतो. या करुणेमुळे तर अवतार पृथ्वीवर अवतरतात. सहसा हे अवतार साक्षीअवस्थेत असतात आणि कधीकधी दिव्य  कृपावस्थेतून ते मानवांची कर्म धुवून टाकतात.    
   
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " देह सोडताना आत्मा त्याच्या कर्माचे ओझे वाहतो आणि पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतो. "
विशेष कृपा 

          एक उदाहरण, अनेक वर्षांपूर्वी, स्वामी त्रिचीला मोठ्या जनसमुदायासमोर प्रवचन देत होते. त्यावेळेस त्यांनी त्या गर्दीतून एका आंधळ्या मुलाला बोलावले आणि त्याला दृष्टी दिली. सर्व अचंबित झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी रहात होते त्या घरासमोर आंधळ्यांची बरीच गर्दी जमली. आदल्या दिवशी स्वामींनी एका मुलाला दृष्टी दिली  म्हणून सर्वजण दृष्टी मिळवण्यासाठी जमा झाले ! परंतु स्वामी मागील दरवाजाने बिल्डिंगमधून बाहेर पडून निघून गेले. ही घटना स्वामींची त्या मुलावर विशेष कृपा झाल्याचे दर्शवते. 
          स्वामी कर्मकायद्यात हस्तक्षेप करीत नाहीत. सर्वांनी आपापली कर्म भोगली पाहिजेत. स्पंदशक्ती साक्षी अवस्थेत असलेल्या परमेश्वरास कृपावर्षाव करण्यास उद्युक्त करते. अवताररूप परमेश्वर करुणा वर्षवतो. त्याच कारुण्यामुळे स्पंदशक्ती काही जणांना विशेष कृपेचा प्रसाद देते. प्रत्येक अवताराच्या काळात फार थोड्या भाग्यवंतांना हा विशेष कृपेचा लाभ मिळतो. हे आहे परमेश्वराचे सर्वज्ञत्व. दयेपोटी परमेश्वर अवतरित होतो परंतु विशेष कृपा हे त्याच्या चित् शक्तीचे कार्य आहे, हा फरक आहे.  
 
संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 
जय साईराम 

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" सत्य ईश्वर आहे. सत्यवचनाने परमेश्वर प्राप्ती होऊ शकते."  
 
विशेष कृपा 

            स्पंद, परमेश्वराची प्रेरक चैतन्यशक्ती त्याला त्याला हलवून जागवते. त्यानंतर तेजोगोल बाहेर पडून अवताररूप धारण करतो. 
            परमेश्वर हा करुणेच मूर्तिमंत स्वरूप आहे. स्पंदशक्ती म्हणजेच करुणा. जेव्हा जेव्हा अनाचार वाढतो आणि धर्माचा ऱ्हास होतो तेव्हा ही कारुण्यशक्ती परमेश्वराला हलवते. 'अवतरित होण्याची वेळ आली' हे ती परमेश्वराच्या निदर्शनास आणून देते. याच कारणामुळे तेजोगोल पृथ्वीवर अवताररूपात येतो. जरी तो करुणेचे मूर्तिमंत स्वरूप आहे तरी तो साक्षी अवस्थेत असतो. तो अवतारकार्यासाठी आणि धर्मस्थापनेसाठी आला आहे. तो कर्मकायद्यात हस्तक्षेप करीत नाही. तरीसुद्धा कधी कधी त्याचा कोणाकोणावर कृपावर्षाव होतो, आणि त्यांची कर्म धुतली जातात. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकार पुढील भागात ..... 
जय साईराम 

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ४६

जन्मदिन संदेश 

साई अमृत 


साई अमृत सर्वाना अमरत्व बहाल करेल: 
           अथक साधना करून आपणापैकी प्रत्येक जण कुंडलिनीचा सात चक्रे पार करू शकतो. आपले शेवटचे चक्र सहस्रार उघडले की आपल्यालाही भगवंताच्या मांडीवर बसण्याचं भाग्य लाभते. आपल्याला अमरत्व प्राप्त होते. भगवान नावाचे अमृत आपण मिळवले की आपण जीवन्मुक्त अवस्था प्राप्त करतो. आपण मृत्यूवर विजय मिळवू शकतो. भगवंत रुपी अमृताचं प्राशन करण्यासाठी सर्वांनी साधना करायलाच हवी. हा साई अवतार आपण सर्वांना त्याच्या अमृताद्वारे मुक्ती प्रदान करण्याकरिताच अवतरला आहे. आपण ह्या अवताराचा उपयोग आपल्यासाठी करून घ्यायला नको का? अमृत सागर अशा साईंकडे मी सर्वांना मुक्ती मिळावी म्हणून रोज प्रार्थना करत असते. 
            स्वामींनी मला ध्यानात सांगितलं, "आत्मा जेव्हा सहस्रारात पोहोचतो तेव्हा अमृताचे थेंब ठिबकू लागतात. ते अमृत प्यायल्यानंतर साधकाची क्षुधा आणि तृष्णा ह्या भावना नष्ट होतात. म्हणून मी तुझ्यावर अमृताचा वर्षाव केला आणि तुझं रूपच अमृत झालं." महान साधू व संन्यासी जेव्हा महिनोंमहिने ध्यानात राहत असत तेव्हा ह्या अमृतामुळेच ते टिकाव धरू शकत असत. त्यांना भूक आणि तहान यांची भावनाच होत नसे. अमृताच्या काही थेंबांचा जर एवढा प्रभाव असेल तर जरा कल्पना करून पहा, अवघे शरीर अमृताने भरलेली अवस्था कशी असेल ?भगवान म्हणालेत," तू ह्या अवस्थेत असल्यामुळे तू अखिल जगत अमृतत्वात परिवर्तित करू शकतेस." माझं अस्तित्वच अमृतमय कसं बरं झालं ? मी क्षण नं क्षण भगवत चिंतनात असते. म्हणून भगवंत चैतन्य अमृत होऊन माझ्या संपूर्ण शरीरात व्याप्त झालं. साई अमृत माझ्या रक्तात आणि आत्म्यामध्ये भिनलंय. प्रत्येक क्षणी त्याच्या प्रेमामृताने भरून वाहणारे माझे विचार हा प्रेमकुंभ (माझं शरीर ) भरतात.
           आपली आख्यायिका सांगते की, देव आणि दानवांनी क्षीरसागराचं मंथन केलं तेव्हा अमृत कुंभ प्रगटला. अमृतासाठी देव आणि दानव भांडू लागले. तेव्हा महाविष्णूंनी अत्यंत मोहक असा मोहिनी अवतार धारण केला आणि फक्त देवांना अमृत दिले. ह्याप्रमाणे साईरुपी अमृत कुंभामधील दिव्य प्रेमामृत अखिल जगतास देण्याचे कार्य माझ्यावर सोपविले गेले आहे. परंतु हे अमृत सर्वांना दिले जाईल. ह्या जगातील प्रत्येकाला अमर करणे, हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे. हे माझे जन्म रहस्य आहे. स्वामी आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. साई महाविष्णूंनी स्वतः हा वसंतमोहिनी अवतार धारण केलाय आणि तेच जगातील सर्वांना अमरत्व बहाल करणार आहेत. 
- श्री वसंतसाई अम्मा 
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

संदर्भ - श्री वसंतसाई लिखित साहित्यातून   
   

जय साईराम 

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" सत्य मनाला निर्मल बनवते. सत्य वचन ही अंतर्शुद्धी आहे. " 
विशेष कृपा 

तारीख १ जुलै २००८, सकाळचे ध्यान 

वसंता - स्वामी, 'स्पंद' विषयी थोडेसे सांगा नं. 
स्वामी - परमेश्वर हा कृपेचे मूर्तिमंत स्वरूप आहे. दयेपोटी तो अवतरित होतो, साक्षी म्हणून वावरतो. तो कुणाच्याही कर्मात हस्तक्षेप करीत नाही. क्वचित कधीतरी तो एखाद्या व्यक्तीवर विशेष कृपा करतो. त्यावेळी त्या व्यक्तीची सर्व कर्म नाहीशी होतात. यालाच म्हणतात 'स्पंद ' विशेष कृपा. 
वसंता - स्वामी, ही स्पंदशक्तीच परमेश्वराच लक्ष एखाद्या जीवाकडे वळवते का ? 
स्वामी - हो. स्पंदशक्ती कार्यान्वित झाल्यावर परमेश्वर एखाद्याचा कर्मसंहार करतो. हे अतिशय दुर्मिळ आहे. विशेष कृपा तुझं रूप घेऊन अवतरित झाली. ही अनुकंपाच युगपरिवर्तनाचं कारण आहे. 
वसंता - स्वामी, सीता आणि राधा पण अशाच होत्या का ? त्यासुद्धा स्पंदशक्ती होत्या...
स्वामी - होय. सीतेची भूमिका खूप छोटी होती. राधेची थोडी मोठी, आता तुझी भूमिका त्या दोघींपेक्षा खूप मोठी आहे. तू तुझ्या तपश्चर्येने आणि अश्रुंनी युगपरिवर्तन करायला आली आहेस. तू दयेपोटी इथे आलीस. 
ध्यानाची समाप्ती  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " जेथे जेथे आपली दृष्टी जाते तेथे आपले मन जाते आणि इच्छांचा उदय होतो. "

 

मन आणि विषय 


            मी ' डेंटल ' शब्द ऐकल्यावर काय केले ?

            प्रथम मी म्हणाले," डेंटिस्टचे वडीलही डेंटिस्ट आहेत. " मी नेहमी विषयाचा उगमाशी संबंध जोडते, असेच यातून दिसते. 

            ही मूल भावना आहे. मी एखादा शब्द ऐकला की तो उगमाला जाऊन भिडतो. मी म्हणाले , डेंटिस्टचे वडीलही डेंटिस्ट आहेत. मुलाचे मूळ हे वडील आहेत. हा वंश आहे. 

            माझ मन एखादा शब्द ऐकल्याक्षणी त्या शब्दाचा उगम शोधत. परमेश्वर सर्वांच मूळ उगमस्थान आहे. म्हणूनच जेव्हा मी ' ट्रान्सेंडेंटल ' शब्द ऐकला, मी म्हणाले, "ट्रान्स ...,ओह ,जसे ट्रान्समायग्रेशन. मी सर्वांमध्ये परकायाप्रवेश करेन. " नंतर विचार केला, 'अवघ्या सृष्टीत मी परकाया प्रवेश करेन. सर्वांमध्ये केवळ माझे भाव असतील ... सर्वत्र केवळ परमेश्वर.'  ​


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा  

उर्वरित प्रकरण पुढील भागात..... 

जय साईराम

गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

      " जर आपण मनाची परमेश्वराशी गाठ बांधली तर ते नियंत्रणात येईल आणि फलस्वरूप विश्वातील कोणतीही गोष्ट आपल्याला स्पर्श करणार नाही."

मन आणि विषय 

            'डेंटल ' या एका शब्दाने बत्तीस विचार जोडले जाऊन एक लांबच लांब शृंखला बनते. एक शब्द इतके विचार कसे काय निर्माण करू शकतो ? सकाळपासून रात्रीपर्यंत आपण किती बोल्ट असतो? किती गोष्टी पाहतो ? किती वाचतो ? किती विचार येतात ? अशाप्रकारे रोज किती विचार एकमेकांशी जोडले जातात ?

            दिवसभरात किती निरनिराळे विचार मनात आले याचा हिशोब केलात तर ते एक लाखाहून जास्त असतील !

            हे विचारांच गाठोड म्हणजेच मन. हे विचार शारीरिक जाणीवेतून निर्माण होत असतात. एका दिवसात एक शब्द एक लाख विषय गोळा करतो. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " केवळ परमेश्वराला स्पर्श केल्याने आपल्याला चिरंतन शांतीचा लाभ होतो. "
मन आणि विषय 

२१) नंबर येण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागते. 
२२) पुढील तारखेचा (Appointment ) विचार. 
२३) डॉक्टरची वाट बघत मी किती ताटकळत बसले. 
२४) माझ्याशेजारी बसलेल्या माणसाशी झालेल्या गप्पांची आठवण. मला त्यांनी सांगितलेले अनुभव, आणि माझ ऐकून घेऊन मला दिलासा दिल्याचे आठवले. 
२५)डॉक्टरकडे त्यानंतर मी तीन वेळा गेले पण तो माणूस काही पुन्हा दिसला नाही. 
२६) डॉक्टरकडे मी एक रुग्ण म्हणून गेले आणि मला मित्र मिळाला. मला तो पुन्हा भेटेल अशी मी आशा करते. 
२७) मला इतक्या वेदना होत असताना डॉक्टरची भेट घेण्यासाठी वेळ ठरवावी का लागली ? डॉक्टरांनी सांगितले की ते फक्त आधी वेळ ठरवून घेतली तरच भेटतील!
२८) मला दातदुखीनी इतकं बेजार केला होत, तरीसुद्धा ते म्हणाले अगोदर वेळ ठरवून भेटा. हे काय ? माझी दातदुखी काय वेळ ठरवून आली नाही, ती अशीच आली. 
२९) तातडीची गरज भासली म्हणूनच मला डेंटिस्टकडे जावे लागले!
३०) मला किती त्रास होतो आहे, पण डॉक्टरला भेटण्यासाठी दोन दिवसांनंतरची वेळ मिळाली आहे. 
३१) पण ठीक आहे, डॉक्टर चांगला आहे. 
३२) दातदुखीच्या रुग्णांनी मी त्याच्याकडेच जायचा सल्ला देईन. तो एक चांगला डॉक्टर आहे.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
     " प्रारंभी जग एक माया आहे अशा दृष्टीने पाहा त्यानंतर अंतर्मुख होऊन परमेश्वराला अंतर्यामी पाहा व त्यानंतर संपूर्ण विश्वामध्ये परमेश्वराला पाहा."
 
मन आणि विषय 

          ... तुम्ही वस्तू शोधता -- मी त्यांना परमेश्वराशी जोडते... 
एक शब्द ' ट्रान्सेंडेंटल ' कसा विचारांच्या शृंखला निर्माण करतो ह्याचे हे एक उदाहरण. 
१) डेंटल 
२) दात 
३) दातदुखी, दुखणे 
४) दुखण्याचे वर्णन 
५) दुखण्यावर उपाय 
६) डॉक्टर 
७) डॉक्टरचे नाव
८) उपचारांचा खर्च 
९) किती दिवस दुखणे सहन केले 
११) किती त्रास झाला 
१२) जेवू शकत नाही 
१३) केवढी सूज होती 
१४) मदत मागितली 
१५) कोणी मदत केली ?
१६) डॉक्टरकडे किती चकरा झाल्या ?
१७) कोणालाही दातदुखीचा त्रास होऊ नये 
१८) मी दुसऱ्या डॉक्टरकडे गेले होते पण त्यांनी बरोबर उपाय केला नाही. 
१९) माझा सध्याचा डॉक्टर खूप चांगला माणूस आहे . 
२०) त्यांनी मला मागच्या वेळेस एक्स-रे पण दिला. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, ३ ऑक्टोबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" आसक्तीविरहीत प्रेम दिव्य असून ते परमेश्वराचेच रूप आहे. "
 
मन आणि विषय 

            मी काहीही पाहिल,कुठेही पाहिल की मला त्यात परमेश्वर दिसतो, म्हणूनच मी वेगळी आहे. सृष्टीमधील सर्वकाही, माझ्या मनात केवळ भगवंताचेच विचार आणतात, आणि म्हणून माझे विचार आदिविषय बनतात. 
           माणसाच मन सतत विषयांच्या शोधात असत, त्यांच्या पाठलाग करत असत. जन्ममृत्युच्या चक्रात अडकण्याच हेच कारण होय. ,मन म्हणजे 'मी' आणि 'विषय ' म्हणजे 'माझे '. तुम्ही 'मी' तुमच्या देहाशी जोडता आणि 'विषय' गोळा करत राहता, म्हणूनच जन्ममृत्युच्या चक्र अखंड चालू राहत. 
            माझ मन परमेश्वराच्यामागे सतत धावत असत; मी सर्वकाही परमेश्वराशीच जोडते. इथे 'मी' नाही. जर 'मी' च नाही तर 'माझे' ही असू शकत नाही. मला 'मी' नाही म्हणून मला आदिमूल सापडले. मन नाहीसे झाल्यावर सर्वत्र परमेश्वरच दिसतो. मला सृष्टीच्या उगमस्थानाचा, मूलप्रकृतीचा शोध लागला. आता परमेश्वर आणि सृष्टी हे एकच आहे. परमेश्वरच सृष्टी.     

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील  भागात ..... 
जय साईराम 

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
         " परमेश्वराप्रत पोहोचण्याच्या प्रवासामध्ये (मनातील ) भाव अत्यंत महत्वाचे आहे. "
 
मन आणि विषय 

         ... हे परमेश्वराच्या सर्वव्यापकत्व या तत्वाशी जोडते. 
         ... हे 'सर्वतो पानिपादम् ' या श्लोकाची आठवण करून देते. 
         ... 'सर्वतो पानिपादम्' या श्लोकामुळे स्वामीच सर्वकाही आहेत हा विचार मनात येतो. 
            दुसऱ्याच क्षणाला मी मोराच पीस पाहते, आणि मी त्याला कृष्णाच्या रूपाशी जोडते. माझ्या विचारांची शृंखला मोरपीसापासून सुरु होते आणि परमेश्वरापर्यंत जाऊन संपते. मोर हा 'विषय', विचारांची शृंखला म्हणजे मनअशाप्रकारे मी जे पाहते त्याला परमेश्वराशी जोडते. 
            या विचारांच मूळ काय ? त्याचा उगम कुठे ? एक विचार आला की लगेच दुसरा त्याच्यामागे येतो, मग तिसरा. अशाप्रकारे, सर्व विचार उभे राहतात. या विचारांचा उगम कुठे ? परमेश्वर, फक्त परमेश्वर. माझे सर्व विचार फक्त परमेश्वरापासून उगम पावतात. मी प्रत्येक गोष्टीचा फक्त उगमच पाहते, म्हणून ते आदिमूल होते. माझ मन अशाप्रकारे विचार करते. आता 'विषय' बघू या. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम 

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" या जगामध्ये आपण केवळ धडे घेण्यासाठी जन्म घेतला आहे."

३ 

मन आणि विषय 


           उदाहरणार्थ, जेव्हा मी दरवाजा बघते, तेव्हा तो केवळ दरवाजा म्हणून  न पाहता मोक्षाचे द्वार म्हणून पाहते. ' उशी ' ला तामीळमध्ये ' तलै यणै ' असा शब्द आहे; त्याचा अर्थ ' डोक्याच बांध घालण ' असा आहे. पण मी म्हणते, ' हे डोक्याचे बांध घालुन नाही, तर मनात उठणाऱ्या विचारांना बांध घालण होय. ' याप्रमाणे, मी जे पाहते त्याला परमेश्वराशी जोडते. माझे सर्व विचार परमेश्वराकडेच वळलेले आहेत. लहानपणापासून मी माझ्या इंद्रियांना आणि मनाला अशाप्रकारे परमेश्वराशी जोडण्याची सवय लावली. प्रत्येक गोष्टीत इंद्रियांना आणि मनाला अशाचप्रकारे परमेश्वराशी जोडण्याची सवय लावली. प्रत्येक गोष्टीत मी परमेश्वर पाहते. माझ मन फक्त ईश्वराशी योग साधते म्हणूनच माझे सर्व विचार फक्त त्याच्यावरच केंद्रित असतात. माझ्यासाठी 'माझे' असे फक्त परमेश्वरच आहे. 

           इथे अजून एक उदाहरण देते. मुक्ती निलायममध्ये अनेक मोर फिरत असतात. पण मोर माझ्या दृष्टीस पडले की मला लगेच ' द पीक ऑफ आय इज पीकॉक्स आय ' हा मी लिहिलेला निबंध आठवतो.    


संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

पुष्प - ४५

ध्यात्मिक माया 

            एकदा एका गावकऱ्याने साधूला विचारले," तुम्ही मला सांगता की देवावर प्रेम कर, पण हे कसे करावे "? साधूने विचारले ," तू कोणावर सर्वात जास्त प्रेम करतोस? " त्याने सांगितले," मी कोणावरच प्रेम करीत नाही , पण मला माझे कोकरू खूप आवडते." साधू उत्तरले, " मग तू कोकराला देव समज व त्याची पूजा कर." मनाची एकाग्रता खरी महत्वाची. आपले मनच एका गोष्टीवर केंद्रित झाले पाहिजे. आपल्याकडे श्रद्धा व भक्ती असली पाहिजे. मी हे लिहीत असताना मला एका भक्ताचा फोन आला. त्या म्हणाल्या, " दुसऱ्या एका भक्तांच्या घरी माझ्या चित्रावर विभूती साक्षात झाली आणि प्रसादासाठी ठेवलेल्या केळावर ' ओम् ' हे पवित्र अक्षर उमटले. मी तिला सांगितले " हे त्या भक्ताच्या श्रध्देमुळे व विश्वासामुळे झाले ."

            अशा कृपाप्रसादाच्या घटना भक्ताची परिपूर्ण श्रद्धा व प्रेम यामुळे घडतात. देवाचे आशीर्वाद अनाकलनीय पद्धतीने व्यक्त होत असतात. 

            जिथे जिथे मनाची एकाग्रता असेल तिथे यश नक्कीच मिळेल. मग ते कोकरू असले काय वा माणूस असला काय ? ऋषी असले काय की देव असला काय ? तुम्ही केवळ परमेश्वरचरणी, जे शुद्ध व पवित्र सत्य आहे, व जो तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो त्याच्या चरणी आश्रय घेणे श्रेयस्कर आहे. परमेश्वरावर मन एकाग्र करा. साधनेद्वारे तुम्ही तुमच्या अंतर्यामी असलेल्या परमेश्वरांस बहिर्यामी करा. 

संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' चमत्कार माया ' ह्या पुस्तकातून 

जय साईराम    

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" कर्मफलाचा त्याग केल्यानंतरच परमेश्वर प्राप्ती होते."
 
मन आणि विषय 

            आता माझ जीवन पाहू या. मी कशी जगले ? मी जे काही बघते, त्याचा परमेश्वराशी संबंध जोडते. उदाहरणार्थ, तोच ' ट्रान्सेंडेंटल' हा शब्द घेऊया. मी हा शब्द ऐकला, आणि मला ' ट्रान्समायग्रेशन ' शब्द आठवला. प्रेमसाई भाग ३ ' साई डायजेस्ट ' या पुस्तकात एका प्रकरणात स्वामी म्हणाले, ' परमेश्वराचे ट्रान्समायग्रेशन ', " जरी खुद्द परमेश्वराने तुझ्यात परकायाप्रवेश केला तरीही तू बदलणार नाहीस. तुझ जन्मजात ज्ञान आणि सर्वांमध्ये वाटून घेण्याचा (Sharing) तुझा स्वभाव तुला सोडणार नाही. स्वामी म्हणाले की परमेश्वराने जरी कौटुंबिक विषयावर चर्चा केली तरी मी स्थितप्रज्ञच राहीन. 
          हे ज्ञान मला कसे प्राप्त झाले ? ते 'विषय ' मुळेच. मी जी गोष्ट पाहते, त्याचा परमेश्वराशी संबंध जोडते. 'योगसूत्र ' पुस्तकात सर्व भौतिक गोष्टींचा मी परमेश्वराशी संबंध कसा जोडते याविषयी लिहिले आहे. 

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम    

रविवार, १९ सप्टेंबर, २०२१

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 
सुविचार 
" त्याग ही सत्याची गुरुकिल्ली आहे. "
३ 
मन आणि विषय 

           तो अजून शोक व्यक्त करीत म्हणतो....
           .... अगदी परमेश्वरासोबतही 'मी आणि माझे ' आहे. मन आणि विषय नसलेली अशी कोणती जागा आहे बरं ? हे देवा, मला अशी जागा दाखव जिथे मनात विचार येणार नाहीत. मला अशी जागा दाखव जिथे शत्रुत्व, मत्सर, मी आणि माझे अस्तित्वात नाही. आम्हाला कुठे बर आश्रय मिळेल ?
            यासाठी उपाय काय बर ? तो भौतिक जीवनापासून आध्यात्मिक जीवनाकडे, परमेश्वराच्या निवासी पोहोचला. पण तिथेही तोच प्रकार.  

संदर्भ - सत्ययुग आणि कर्मकायदा 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
जय साईराम