ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" निर्मल हृदयामधून सत्य प्रकाशमान होते."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझे वडील दररोज परमेश्वराला त्याच्या चरणकमली घेण्यासाठी प्रार्थना करत. "मला हा जन्म नको. हा आत्मा या देहामध्ये स्थित असला तरीही तो लिप्त नाही. तो कार्य करत नाही, या सर्वाची मला जाण करून दे." अशा तऱ्हेने ते दररोज साश्रू नयनांनी परमेश्वराच्या विनवण्या करून गीतेतील प्रत्येक श्लोक आचरणात आणण्याची त्यांची उत्कट इच्छा तळमळून व्यक्त करत. त्यांना ज्ञानचक्षू हवे होते. ते म्हणत," सर्व कर्म स्वभावानुसार केली जातात. त्यामुळे मी या कर्माचा कर्ता नाही. सर्व कर्मांचा कर्ता करविता तूच आहेस. मी साधनमात्र आहे या सत्याचे मला ज्ञान होवो. परमेश्वर सगळ्याचा केंद्रबिंदू आहे.' ज्याप्रमाणे कृष्णाने विदुराघरच्या कण्या खाल्ल्या तसे त्याने त्यांच्याही घरी यावे यासाठी ते अश्रू ढाळत. ते प्रार्थना करत," यासाठी तू मला योग्य बनव." तथापि त्यांना माहीत नव्हते की प्रत्यक्ष पुरुष आणि प्रकृती त्यांच्या घरी दररोज जेवत होते. स्वामींनी आता सांगितले की त्यांच्या व माझ्या पूर्व जन्मांच्या परमेश्वराविषयीच्या व्याकूळ प्रार्थनांमुळेच स्वामी आणि मी भूतलावर अवतरलो. त्यांची कन्या- प्रकृती, पुरुष-परमेश्वरासमवेत त्यांच्या घरी राहिली. स्वामींनी वीस वर्षांपूर्वी माझ्या एका चुलतभावाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं." मी तुझ्या काकांच्या घरामध्ये वास करतो." त्यावेळी स्वामींनी त्याच्याबरोबर आमच्यासाठी विभूती पाठवली होती. तेव्हा स्वामींच्या बोलाचा खरा अर्थ मला समजला नव्हता. आता त्याचा खरा अर्थ स्पष्ट होतो आहे. माझ्या वडिलांच्या घरी स्वामींनी सात वर्षे अन्न सेवन केले. रिवाजानुसार विवाहानंतर मी माझ्या सासरी जाण्याऐवजी माझे पती माझ्या वडिलांच्या घरी राहायला आले त्याचे कारण आता मला कळले. अशा तऱ्हेने माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण झाली.
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा