ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" देहभावाचा त्याग केल्यानंतर सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
पुढील श्लोकात म्हटले आहे" कान्हा! ह्याला आत्म्यातील आत्म्याची आत्म्याने जाणीव होण्यासाठी शक्ती दे. तूच परमात्मा होऊन ह्यांच्या आत्म्यामध्ये वास कर. ह्या छोट्याशा भिंतीवर तू येऊन राहा. कृष्णा! जर तू इथे आलास तर हे पडके घर राजमहाल बनवून जाईल. पुढच्या श्लोकात ते सांगतात की स्थावर असो वा जंगम, जन्मास येणारा प्रत्येक जीव क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून उत्पन्न झाला आहे. याचे ज्ञान तू मूढमतीला दे. परमेश्वर सर्व भूतांमध्ये मध्ये समभावाने भास करतो. विनाशामध्ये सुद्धा जो अविनाशी अशा परमेश्वराला पाहतो तो खरा ज्ञानी. ते पुन्हा परमेश्वराच्या विश्वरूप दर्शनासाठी प्रार्थना करतात.
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा