ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
त्यांच्या हृदयात वास करण्यासाठी प्रार्थना करतात. ते म्हणतात," तू मला मार्ग दाखव. केवळ तूच या विश्वनाट्याचा सूत्रधार आहेस. तू मला निर्भय बनव. खंबीर बनव. आणि लवकरात लवकर मला तुझ्या चरणांप्रत घेऊन जा. माझ्या मनातील रावण बुद्धी नष्ट कर आणि सदगुणांची जोपासना कर." माझे वडील वारंवार म्हणत की त्यांना केवळ परमेश्वरप्राप्तीची इच्छा आहे. ते वयानी तरुण असूनही त्यांना परमेश्वराखेरीज अन्य कशाचीही इच्छा नव्हती. ते निद्रिस्त आत्म्याला कुंभकर्ण व बुद्धीला रावणबुद्धी म्हणत. पहिल्या अध्यायातील ३२ व्या श्लोकात इच्छांपासून मुक्ती देण्यासाठी त्यांनी ईश्वराच्या विनवण्या केल्या." मला फक्त तू हवास, मला फक्त तू हवास, मला फक्त तू हवास, मला फक्त तुझी तळमळ लागू दे. तुझ्या दर्शनाविना माझ्या जीवाची किती उलघाल होते आहे. मला लवकर घेऊन जा." तेव्हा माझे वडील तळमळत होते आणि आता मी तगमगते आहे. त्यांची डायरी वाचल्यावर मला हे समजले. माझी आई ही अशीच होती. तिने जीवनभर परमेश्वरासाठी अश्रू ढाळले. ती म्हणायची," हे कान्हा मला तुझी चरण कमल प्राप्त होवोत ' ती वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी हे जग सोडून गेली. पहिल्या अध्यायातल्या ३७ व्या श्लोका ते म्हणतात," नातेवाईकांची ताटातूट होऊ नये म्हणून मी इतस्ततः भटकतो आहे. या सर्वांचा त्याग करून मला केवळ तुझे चरण धरून ठेवण्याची बुद्धी दे." तथापि त्यावेळी त्यांना कोणी नातेवाईक नव्हते. माझ्या आईचा मृत्यू झाला होता. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. आमच्या घरात आमच्याबरोबर त्यांचा मोठा भाऊ, एक बहीण, अजून एक भाऊ आणि माझे मामा हे सर्वजण राहत होते. या सर्व कुटुंबीयांकडे माझे वडील नात्याचे बंध या दृष्टिकोनातून पाहत होते. ते परमेश्वराला अनन्य भक्ती व ज्ञानचक्षु देण्यासाठी प्रार्थना करत. भक्तिमार्गावरून कधीही पाय घसरू नये यासाठी ते परमेश्वराकडे प्रार्थना करत.
दुसऱ्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे ज्ञानामध्ये स्थिर झालेल्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणांबद्दल माझे वडील काय लिहितात ते आता आपण पाहूया.
दुसऱ्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे ज्ञानामध्ये स्थिर झालेल्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणांबद्दल माझे वडील काय लिहितात ते आता आपण पाहूया.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा