ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
प्रकरण - २
कुमारी पासून कुबेरापर्यंत
सायं ध्यान
वसंता : माझ्या मनात अनेक दिवसांपासून एक शंका आहे मी सदैव तुमच्या चिंतनात हरवून जाते, मग अजूनही माझा देह येथे कसा आहे ?
स्वामी : हा देह नव्हे, केवळ रूप आहे. लाकूड जळाल्यानांतर त्याचा आकार राहतो व त्याला स्पर्श केल्यावर तो आकार ढासळतो व केवळ राख उरते. तुझ्या देहाचेही तसेच आहे. केवळ आकार रूप राहिले आहे.
वसंता : स्वामी, सूक्ष्म देहातील कन्याकुमारी देवीने मला संन्यास घेण्यासाठी अनुमती दिली. भौतिक दृष्ट्या. मी कोणाकडून दूधभात घेऊ ? कोदाईंमध्ये आंडाळच्या मातेचा अंश आहे आणि एस. व्हीं. मध्ये मीनाक्षी देवीच्या पित्याचा अंश आहे. मी त्यांच्याकडून दूधभात घेऊ का ?
स्वामी : एस. व्ही दूधभात कालवून कोदाईला देतील व कोदाई तुला देईल. तू विश्वामध्ये ज्ञानाला प्रसार करशील. तू ज्ञान दुर्गा आहेस.
१८ जानेवारी २००१
मला बंगलुरच्या एका भक्तांचा फोन आला. व्हाईटफिल्डमध्ये १७ तारखेला सकाळच्या दर्शनाचे वेळी, ७ फेब्रुवारी २००१ रोजी वडक्कमपट्टीमध्ये होणाऱ्या समारंभास आशीर्वाद देण्यासाठी त्याने स्वामींना प्रार्थना केल्याचे सांगितले. स्वामी त्याच्या जवळ आले व म्हणाले," माझे आशीर्वाद आहेत, आशीर्वाद आहेत.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा