ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" विनयशीलता, निरहंकारी मन आणि अढळ श्रद्धा या गुणांसहित मार्गक्रमण करणाऱ्यास निश्चित यशप्राप्ती होते."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
पुढील श्लोकात माझे वडील कृष्णाला 'सत्' खरा अर्थ समजून सांगण्यासाठी प्रार्थना करतात. ते म्हणतात की त्यांना सत्नाम हवे आहे. प्रत्येक ठिकाणी माझे वडील पुन्हा पुन्हा परमेश्वराला लवकरात लवकर त्यांच्या चरणकमली घेऊन जाण्यास विनवतात. ते म्हणतात " गीतेचे सार असलेल्या अशा सत्याचे मला वर्णन करून सांग." गीता हेच माझ्या वडिलांचे संपूर्ण जीवन होते. गीतेचा प्रत्येक श्लोक लिहून तो श्लोक आयुष्यात उतरवला पाहिजे असे त्यांना प्रामाणिकपणे वाटत होते. त्यांच्या रोजनिशीतील प्रत्येक दिवशी त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक श्लोकावरून त्यांचा हा दाह आपल्याला समजून येतो. त्यांच्या अंतिम सत्याच्या तळमळीमुळे, स्वामी अवतरले व सत्ययुगही येणार आहे. स्वामी लिहीत असलेल्या या सत्चरित्रामध्ये त्यांचं नावही जोडलं गेलं. भगवद् प्रित्यर्थ केलेले कोणतेही कर्म सत्य बनते. माझ्या वडिलांनी त्यांच्या जीवनातून हे सिद्ध केले हे आपल्याला समजते. कृष्णाने अठराव्या अध्यायात सांगितलेल्या सर्व अवस्था माझ्या वडिलांना प्राप्त व्हाव्यात अशी ते कृष्णाकडे प्रार्थना करतात. ' मला योगी, संन्यासी, मुमुकक्षू आणि ज्ञानी व्हायचे आहे,' सर्व अध्यायात जे सांगितले आहे त्याचे मूर्तिमंत स्वरूप त्यांना व्हायचे होते. ते पुन्हा पुन्हा परमेश्वराची प्रार्थना करत की या पाप्याला त्याचे शुद्ध बनवून त्याच्या चरण कमली घेऊन जावे. दररोज गीतेचे अमृतपान करावे एवढीच त्यांची इच्छा होती. माझ्या वडिलांनी जीवनामध्ये हे साध्य केले. गीता हेच त्यांचे जीवन होते. परमेश्वराशिवाय अन्य कोणतेही विचार मनात येऊ नयेत अशी त्यांची इच्छा होती.
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा