शनिवार, १० मे, २०२५

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
           १५ ता.ला सकाळी ध्यानामध्ये मी स्वामींना कन्याकुमारीच्या दर्शना बद्दल विचारले. ते म्हणाले," तू स्वतः शोधून काढ." मला शक्य झाल्याने मी स्वामींना त्याविषयी सूचक संदर्भ देण्यास सांगितले.
           स्वामी म्हणाले," सर्वसंग परित्याग आणि कन्याकुमारी देवीचे दर्शन यामध्ये काही संबंध आहे." तरीही मला काही उमगले नाही. १६ ता.ला. सकाळी मी माझा मुलगा अरविंदनच्या घरी गेले. दुपारच्या ध्यानात मी स्वामींना देवीने दिलेल्या दूधभाता विषयी विचारले.
           स्वामी म्हणाले," जेव्हा एखादी व्यक्ती संन्यास घेते तेव्हा त्याची माता त्याला दूध भाताचे तीन घास देते. देवी कन्याकुमारी तुझी माता आहे. जसे तिने दुर्जनांचा नाश करण्यासाठी कठोर तप केले. तसे तू जगामधील दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी संन्यास घेतला आहेस. भगवान शिव कन्याकुमारीशी विवाह करणार होते परंतु नारद मुनींनी विवाह रोखला. त्यामुळे कन्याकुमारी दुष्ट दुर्जनांचा नाश करण्याची शक्ती प्राप्त झाली. त्यानंतर तिने जगाचा त्याग करून पुन्हा तप सुरू केले. त्याचप्रमाणे तू मांगल्य नाकारल्यामुळे जगातील दुष्प्रवृत्तींचा नाश होईल."
             माझ्या मनात बऱ्याचदा असा विचार आला, जे मांगल्ये मला हवे होते ते मी का नाकारले. आता त्याची मला उत्तर मिळाले. मी अनेक वर्षे तप करतेय, परमेश्वरासाठी अश्रू ढाळतेय. गीते आणि कवितांमधून माझी भाव व्यक्त करतेय. जेव्हा त्या तपाचे फल चाखण्याची वेळ आली तेव्हा मी त्या फलांचा त्याग केला.

 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा