ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १७ , श्लोक २३
ॐ, तत्, सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा! माझा त्राता! प्रभू! ह्या नीच जीवाला ' ॐ, तत्, सत्' तुझे वर्णन करणाऱ्या या तीन सत्य वचनांचे पूर्ण ज्ञान दे. तू उपदेशलेले ब्राह्मण्य, वेद आणि यज्ञ या हलक्या जीवाला शिकवून त्याप्रमाणे वागावयास लाव. तुझ्या मार्गाचे अनुसरण करण्यास नि:शक्त अशा या दुबळ्याला तुझ्या मार्गावर चालावयास लाव. तुझ्या मार्गावर तू मला घेऊन चल. परमेशा! रामानुजा! गरिबाला दुसरा रस्ता नाही. कान्हा! तुझ्या चरणी घेऊन आशीर्वाद कर. तूच आधार. शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा