ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - १५ , श्लोक २०
हे निष्पाप अर्जुना! हा वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला सांगितला आहे. जो याचे तत्त्वतः ज्ञान करून घेतो तो ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा, या पाप्याला पापमुक्त कर. बुद्धिमान कर. जे करणे योग्य आहे ते करण्याची बुद्धी दे. जे करू नये ते करत असल्यास तू येऊन त्याचे कृत्य थांबव. दया कर. गुप्त शास्त्रांचे ज्ञान शिकव. तुझी शिकवण आत्मसात करण्याची ताकद दे. आदि नारायणा! अनाथरक्षका! तूच याच रक्षण करायला हवंस. मी तुला शरण आलो आहे. कान्हा, कृपा कर.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा