रविवार, २० जुलै, २०२५

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " मनामध्ये सदैव सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो. मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - ३, श्लोक ३३ 
 
           ज्ञानी मनुष्यसुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कर्म करतो कारण प्रत्येकजण त्रिगुणांद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कर्म करतो. मग बळेच निग्रह केल्याने काय साधणार आहे?

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, मनिवण्णा, तू म्हटलेस की ध्यानी सुद्धा त्याच्या स्वभावानुसार व्यवहार करतो. तू मला ध्यानी बनव. मला माझ्या स्वभावानुरूप वागू देत. तू म्हणतोस की निर्बंध निरुपयोगी आहेत. या दुबळ्या दासाला जर तू निर्बंध घातले नाहीस, तर तो मोकाट सुटलेल्या गाईप्रमाणे या तुझ्या अद्भुत विश्वबगीच्याची नासधूस करेल नं ? कृष्णा, त्याला काठीने जोडपून काढ. त्याला योग्य मार्ग दाखव. त्याला चांगली कुरणे चरू देत. हे प्रभू! परमेश्वरा, नीलवर्णा, रुक्मिणीवरा, शरणो शरणम्. या चांडाळाला पवित्र बनव. तू माझा आशय दाता आहेस. माझ्यातील तमोगुण शिरजोर झाला आहे.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा