गुरुवार, ३ जुलै, २०२५

 

 ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
       सुविचार  
    

       " जेव्हा प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पित केले जाते तेव्हा त्याचा योग होतो."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ६८ 
 
           म्हणून हे महाबाहो! ज्याची इंद्रिय विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात त्याची बुद्धी स्थिर असते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा, मणिवण्णा, सर्व विषयांच्या बाबतीत मी माझ्या इंद्रियांवर संपूर्ण ताबा ठेवायला हवा. मला पूर्ण नियंत्रण क्षमता दे. ज्ञानामध्ये स्थिर कर. हे विश्वेश्वरा नित्या सत्या तूच माझा आधार.शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा