ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" साधना, साधना, साधना! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक ७२
हे पार्थ! ब्रम्हाला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही स्थिती प्राप्त झाल्यावर योगी कधी मोहित होत नाही आणि अंतकाळीही या ब्रह्मस्थितीत स्थिर होऊन ब्रम्हानंद मिळवतो.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
कान्हा, तू माझा आश्रयदाता आहेस. मी तुला शरण आलो आहे. हे सर्वेश्वरा, या नम्र दासाला आत्मसाक्षात्कार होऊ दे. माझा संभ्रम दूर होऊ दे. मृत्युसमयी माझ्या मनात तुझेच विचार असू देत. जेव्हा हे मृत काष्ट धारातीर्थी पडेल तेव्हा गांधीजींप्रमाणे तुझे नाव घेत माझा प्राण जाऊ देत. मला परमानंद व परमधान प्राप्तीसाठी आशीर्वाद दे. आदिनारायणा, आपद् बांधवा तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा