ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनाने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यानंतर, ते मन आणि ती गोष्ट एक होऊन जाते. परमेश्वराचा ध्यास घेतलेले मन परमेश्वर बनते. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक ६९
सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्र असते अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागृत असतो आणि त्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी मात्र जागृत असतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या योग्याला रात्रीसारखी असते.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
हे कान्हा, आपद्बांधवा, जेव्हा सर्व जीवांची रात्र असेल तेव्हा मला जागी ठेव. मला सर्व भूतांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती दे. तत्वे जागृत असता तू निद्रिस्त होशील, नाही का? मला हे व्हायला नकोय. अहो बाप्पा, तुम्ही सदा सर्वकाळ जागेच असायला हवे. तुमची क्षणभराची गफिलतासुद्धा सेवकाला हादरवते. अनाथरक्षका, आदिनारायणा, कृपया तू मला आपलेसे कर. तूच माझा आश्रय! शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा