ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" साधना, साधना, साधना! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - २, श्लोक ७०
ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी भरलेल्या समुद्राला विचलित न करता त्याच्यामध्ये समावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करता सामावून जातात. तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो, भोगाची इच्छा करणारा नव्हे.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
हे कान्हा, जशा महासागराला अनेक नद्या येऊन मिळाल्या तरी तो विचलित होत नाही तसे मला इच्छांनी विचलित होऊ देऊ नकोस. माझ्या मनातील लालसायुक्त विचार दूर कर. कान्हा, गरुडवाहना, कस्तुरीरंगा, तू माझे आश्रयस्थान आहेस. शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा