रविवार, १३ जुलै, २०२५

  ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

" साधना, साधना, साधना! केवळ साधनेद्वारे जीव शिव बनतो. "
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - २, श्लोक ७१ 
 
           जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून आसक्ती इच्छा आणि अहंकार यापासून मुक्त होऊन राहतो त्यालाच शांती मिळते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          कान्हा, माझ्या सर्व मनोकामनांचा त्याग करण्याची मला बुद्धी दे. मला संन्यासी बनव. 'मी आणि माझे' यांचा नाश कर. तुझ्या मालकीच्या सर्व गोष्टी, माझ्या समजणाऱ्या मी किती मूर्ख आहे! माझ्यावर तुझे स्वामीत्व आहे, हो ना ? हे प्रभू, या श्वानाला सदैव तुझ्या चरणांशी ठेव. माझा अहंकार नष्ट कर. मला मनो शांती दे, तूच माझा आधार. शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा