ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" त्याग आणि करुणा हे प्रेमाचे दोन नेत्र आहेत. "
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - ९, श्लोक २७
हे कौंतेया ! तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
हे नीलकांता, गरुडवाहना, हा हीन जीव जे काही करतो, जे काही खातो, जे काही त्याग करतो, त्याला ज्या काही भेटवस्तू दिल्या जातात आणि तप म्हणून तो जे काही करतो ते सर्व तुला अर्पण करू देत. केशवा, मी तुझ्या चरणी नतमस्तक होत आहे. या जीवाचा उद्धार कर. महात्माजींप्रमाणे माझ्या ओठांवरही अंतसमयी तुझेच नाम येऊ दे. मी तुझे नामस्मरण करत असतानाच मला मृत्यू येऊ दे. तू माझा आश्रय आहेस.शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा