ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मनामध्ये सदैव सत्प्रवृत्ती दुष्प्रवृत्ती यांच्यामध्ये लढा चालू असतो. मनुष्याने आत्मविश्लेषण करून मनाचे मंथन केले पाहिजे."
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
माझ्या वडिलांची रोजनिशी
अध्याय - ८, श्लोक ५
जो पुरुष अंतः काळीही माझेच स्मरण करीत देहत्याग करतो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो यात मुळीच शंका नाही.
माझ्या वडिलांच्या मनातील भाव .....
हे पुरुषोत्तमा, सत्या, सत्यव्रती, अहिंसामूर्ती, महात्मा गांधींनी छातीत गोळ्या घुसत असताना ' हरे राम हरे राम ' उच्चारण केले. माझ्या गुरूंनी त्यांच्या मृत्युद्वारे मला मार्ग दाखविला. हे पाहूनही हा महापापी, अजून अज्ञानी आहे. बद्रीनारायणाच्या प्राप्तीसाठी सदैव चिंतन करण्याचा प्रयत्न करत असता मानस हा देह व हे जीवन या विषयी ममत्व आहे. हा घोर पापी अक्षम्य गुन्हे करतो आहे आणि भारतमातेला भार बनवून राहिला आहे. हे भगवान, मला निरासक्त आणि निरीच्छ मन दे. मला तुझे चरण धरून ठेवण्यासाठी भक्ती दे. तू माझे आश्रयस्थान आहेस.शरणो शरणम्.
* * *
संदर्भ - जिती जागती गीता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा