ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
इथेच याक्षणी मुक्ती- भाग ३
प्रकरण - २
कुमारी पासून कुबेरापर्यंत
वसंता: स्वामी मला असं वाटतंय की मी खूप दिवसात तुमचे दर्शन घेतले नाही.
स्वामी: अगं आपण सकाळीच तर बोललो ना. त्याला खूप वेळ म्हणायचे का?
वसंता: आज कोणाचे दर्शन, स्वामी?
स्वामी: तूच सांग तुला कोणाचे दर्शन घ्यायचयं ?
वसंता: मला नाही माहित तुम्हीच सांगा. माझी कोणतीही व्यक्तिगत इच्छा नाही.
स्वामी: नाही तुझी काय इच्छा आहे?
वसंता: मला माहित नाही. तुम्हीच ठरवा. तुम्ही सर्वांमध्ये विद्यमान आहात. म्हणून मला अळीपासून ते ब्रम्हापर्यंत सर्वांचे आशीर्वाद हवेत. असे म्हटले आहे ना.
स्वामी: ठीक आहे. संन्यास यामध्ये आदर्श उदाहरण कोण आहे?
वसंता: मला माहित नाही. तुम्ही सांगा.
स्वामी: शुकमुनी. त्यांनी कृष्ण लिलांची महती गायली. परमेश्वराचे अमृत माधुरी.....
स्वामी आणि मी एका ठिकाणी गेलो. मी आत गेले. तेथे मी शुकमुनींना पाहिले. ते गहिवरून म्हणाले," मी तुम्हाला माझी पुत्री म्हणू का महालक्ष्मी म्हणू?" माझे डोळे पाणावले. मी त्यांच्या पायावर लोळण घेतली. त्यांनी मला आशीर्वाद दिले. मी एवढी भावनावश का झाले, मला इतके गहिवरून का आले ह्याचे मला आश्चर्य वाटले.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा