रविवार, २७ जुलै, २०२५

 

   ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार       

        " जो दुसऱ्याला काया, वाचा, मनाने दुखवत नाही तो खरा साधक होय."
 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - ९, श्लोक २६ 
 
           जो कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण करतो त्याचा मी स्वीकार करतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
 
          हे कान्हा  नीलश्यामा, विश्वामधली सर्व फुले, पाने, फळे आणि तीर्थे मी तुला अर्पण करतो. या दुबळ्या दासाचे मन, बुद्धी, जाणीव, आत्मा, पंचमहाभूते, पंचकारण, दहा जीवनावश्यक वायू, पत्नी, मुलेबाळे, घरदार, धनदौलत, सुखदुःख, शेतीवाडी, सर्वकाही मी तुला अर्पण करतो. या यःकश्चित जीवाचे रक्षण. हे करुणेश्वरा, अच्युता, आपद्बांधवा, या असुरक्षित अनाथाला तुझी प्राप्ती होऊ दे. हे प्रभू, तू माझे आश्रयस्थान आहेस.
शरणो शरणम्.
 
*     *    *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा