सोमवार, २३ मार्च, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            त्यानंतर आम्ही स्वामींचा फोटो व पादुका घेऊन नागरसंकिर्तन करत गावामध्ये मिरवणूक काढली. मी माझी कृष्णाची मूर्ती बरोबर घेतली. दारातच (लहान मुलगा) मणिवन्ननने माझे पाय धरले वरडत रडत 'मी तुला जाऊ देणार नाही' असे म्हणाला. मी म्हणाले," स्वामींनी मला सांगितले आहे मला गेलेच पाहिजे. ही सर्व माया आहे." माझ्या कृष्णाच्या मूर्तीला, श्री मनोहरनना  व मला हार घालण्यात आले. मी माझ्या कृष्णासोबत जीवन प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी पाऊल उचलले. मिरवणुकीच्या अग्रस्थानी असलेल्या सुवासिनी ध्यान सभागृहात पोहोचल्या. आम्ही श्री गणेशाला प्रदक्षिणा घालून ध्यान सभागृहाच्या पायऱ्या चढलो. एस. व्ही. नी दूधभात कालवला. कोदाईंनी त्याचे तीन उंडे बनवले आणि मला भरवले. ते खाऊन मी श्री मनोहर यांच्या सह सभागृहात प्रवेश केला.
             रंगीत दिव्यांच्या माळा व फुलांनी सभागृह सुशोभित केले होते. सभागृह इंद्राच्या दरबारासारखे भासत होते. लोक दोन्ही बाजूला बसली होती. व्यासपीठावर मध्यभागी स्वामींचा भव्य फोटो लावला होता. या फोटो त्यांचा उजवा हात चिन्मुद्रेत होता. त्यांच्या अनामिकेचा अग्रभाग अंगठ्यावर दाबला होता व बाकीची तीन बोटी मिटलेली होती. एका भक्ताने याचे सुंदर स्पष्टीकरण दिले. जर एखाद्याने तिन्ही गुणांवर नियंत्रण मिळवले तर जीव आणि शिव यांची मिलन होते. हे मुक्ती स्थळ आहे ती महिला भक्त म्हणाली, आम्हा तुम्ही तिन्ही गुणांवर विजय मिळवला आहेत. तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला आहे आणि तुमचा भगवानांची योग झाला आहे.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, २२ मार्च, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अनुक्रम
प्रस्तावना
१.मानवतेचा इतिहास
२.कर्मकायदा - अवतार कायदा 
३.विधिलिखित बदलते
४.काळ अन् मृत्यूवर विजय
५.सुईच्या अग्रा इतका अहंकार
६.बृहत योजनेनुसार भगवत रूपाचा साचा
७.आत्म्याची तीन मुखे 
८.स्तूपाचा जन्मदिन
९.जुनी कहानी अर्थ नवा
१०.एप्रिल नॉट होतोॲप्रिकॉट (जरदाळू)
११.कायद्याचे सिंहासन 
१२.अध्यात्मिक सूत्र मर्यादित 
१३.काहीही नाही हेच सर्व काही
१४.चुडामणी 
१५.यम कोण आहे ?
१६.दैवी न्यायाधीश
१७.माझ्याद्वारे जगाचा यमावर विजय
१८.देव माझ्या प्रेमाचा भुकेला 
१९.सुवर्णयोग - सोनेरी परिवर्तन
  

संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १ मार्च, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
             या सर्वोत्तम अवताराची रहस्य योगी अरविंदना कसे बरे ज्ञान झाले? ह्या सर्वश्रेष्ठ अवताराची कुशल योजना त्यांना कशी काय अवगत झाली? 'सत्यवान- सावित्री' या काव्यामधील अंतर्भूत आध्यात्मिक महत्त्व व्यक्त करून, खरे तर त्यांनी सत्य साई अन् वसंता यांची (जीवनशैली) प्रकट केली आहे. सावित्री तिच्या पतीचे विधीलिखित बदलते. स्वामी व मी युगाचे विधीलिखित बदलतो. आम्ही कलियुगाची सत्ययुगात परिवर्तन करतो. ही 'सत्यवान सावित्रीची' कहाणी आहे की ' सत्यसाई - वसंता' साईची गाथा?
VS

समर्पण
प्रिय भगवान,

          हे पुस्तक मी आपल्या चरणी अर्पण करते. हे तुम्ही लिहिले. सर्व काही तुम्हीच केले. अव्याहत प्रतीक्षेत माझे हृदय छिन्नभिन्न होत आहे. कृपा करून या आणि सर्वांवर कृपेचा वर्षाव करा.
आपली पादधूलिका
VS  

संदर्भ सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
             मी कधीही माझ्या वडिलांच्या डायऱ्या वाचल्या नाहीत. स्वामींनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिल्यानंतर आणि मला त्यावर लिहिण्यास सांगितल्यानंतरच मी त्यांच्या डायऱ्या वाचल्या. अजूनही वडक्कमपट्टीमध्ये तिजोरी त्यांच्या सर्व डायऱ्या जतन करून ठेवलेल्या आहेत. मणिवन्नननी  त्या डायऱ्या आश्रमात आल्यानंतरच आम्हाला त्यांच्या मनातील भावभावनांच्या गहनतेची जाणीव झाली. हे काही एखाद्या सर्वसामान्य मनुष्याचे भाव विश्व नाही. याद्वारे स्वामी मला आणि जगाला, ते कोण आहेत हे ज्ञात करून देत आहेत.
 
*     *     *
 
           माझे वडील कट्टर वैष्णवभक्त, गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक व भगवद्गीतेचे महाअनुयायी होते. त्यांच्या परमेश्वरावरील अतिव प्रेमातून अत्यंत उत्कट भक्ती निर्माण झाली. अशी भक्ती क्वचितच पाहायला मिळते. त्यांनी न चुकता गीतेतील मार्गाचे काटेकोरपणे पालन केले. त्यांच्या डायऱ्यांमधून त्यांची परमेश्वर प्राप्त तिकडे जाणारी जीवन यात्रा प्रतीत होते. भगवान श्री सत्य साईबाबांनी जर हे निदर्शनास आणून दिले नसते तर ते  सर्व अप्रकाशित राहिले असते. हे पुस्तक त्यांच्या मार्गदर्शनाची परिणती आहे. सर्वधर्माच्या लोकांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी होवो.
वसंत साई 

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
             माझ्या वडिलांच्या डायरीच्या शेवटच्या पानावर त्यांनी एक आकृती काढली आहे. जी स्वामींनी माझ्या डायरीत काढलेल्या जीवन तरंग सिद्धांताशी मिळतीजुळती आहे. माझ्या वडिलांनी त्यांच्या जीवनाची मीमांसा करताना याचा कसा वापर केला आहे ते आपण पाहूया.
 
 
 
            आ. वा. वा. मधुरकवी आळ्वार जन्म.
            आनंद (वर्ष) वैकाशी महिना २२ दि. गुरुवार  ४-६-१९१४ एकादशी सिद्धीयोग
             माझ्या वडिलांनी त्यांच्या जीवनातील चढउतारांची मीमांसा करताना, त्यांना गीतेतून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग केला आहे. त्यांच्या या जीवन तरंग सिद्धांतात ते सांगतात की त्यांच्या जन्मापासून म्हणजे १९१४ ते १९१८ त्यांचे जीवनसत्व गुणांनी युक्त होते. तरुणपणी ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. त्यादरम्यान त्यांच्या मनात गांधीविषयी, देशाविषयी व परमेश्वराविषयी अपार पूज्य भाव निर्माण झाला. हा कालखंड सत्वगुणांचा कळसाध्याय होता असे त्यांनी लिहिले आहे. या काळात माझ्या वडिलांनी अनेकदा तुरुंगवास भोगला व तेथेच त्यांनी आत्मपरीक्षणाची सवय लावून घेतली. दररोज ते भावपरीक्षण करत. त्यांच्या मनात उमलणाऱ्या सर्व विचारांचे आणि भावांचे निरीक्षण करत. या आत्मपरीक्षणातून त्यांना आत्मभान आले व त्यातून आत्मसाक्षात्कार झाला. अशा तऱ्हेने सर्वांनीच आत्मपरीक्षण करायला हवे. 
               ' वसंतसाई सत्चरित्र ' या पुस्तकांमध्ये मी स्वामींनी दिलेल्या जीवन तरंग सिद्धांताविषयी लिहिले आहे. माझ्या वडिलांनी खूप पूर्वीच म्हणजे १९५३ मध्ये हा जीवन तरंग सिद्धांत त्यांच्या डायरीमध्ये लिहिलेला आहे. स्वतःमध्ये परिवर्तन घडवून परमेश्वर प्राप्ती करून घेण्याची त्यांची उत्कंठा आणि निराधार या डायरीमधून आपल्याला दिसून येते. जो स्वतःमध्ये परिवर्तन घडवतो तोच परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो. या जगामध्ये अनेक लोक गीतेच्या अध्यायांचा अभ्यास करतात आणि त्यावर भाष्य लिहितात. तथापि त्यांनी गीतेच्या शिकवणीचे आचरण केले आहे का? माझ्या वडिलांनी गीतेतील प्रत्येक अध्याय व त्यांचे जीवन याचा तुलनात्मक अभ्यास करून या डायरीमध्ये त्यांचे भाव व्यक्त केले आहेत. त्यांनी जे केले आहे तसे जगातील अन्य कोणतीही व्यक्ती करू शकणार नाही. ते म्हणजे एक जिती जागती भगवद्गीताच होते.

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

 🕉️महाशिवरात्री संदेश🕉️


प्रत्येक मनुष्याने प्रत्येक पवित्र उत्सवाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे परंतु सर्व सणांमध्ये महाशिवरात्र हा सण विशेष का मानला जातो?

या दिवशी परमेश्वर तुमच्या अत्यंत जवळ असतो. माघ शुक्ल चतुर्दशीच्या मध्यरात्री दैवी स्पंदने मानवाच्या भोवती, अत्यंत समीप असतात. आपण हा दिवस अत्यंत पवित्र भावनेने व्यतीत केला तर दैवी शक्ती आपल्याला आकर्षित करते.

या जगात दैवी तत्त्वाइतके जवळचे काहीही नाही. कधी कधी आईदेखील काहीशी दूर असू शकते पण दैवी तत्त्व सदैव आपल्या जवळ असते. 

शिवरात्री म्हणजे रुद्रांवर विजय मिळवण्याची रात्र

‘रुद्र’ म्हणजे भयानक. अकरा रुद्रांची रूपं भयप्रद आहेत. ही भयप्रद तत्त्वं मानवामध्ये प्रवेश करून सर्व दुःख, क्लेश आणि चिंता यांस कारणीभूत ठरतात. या रुद्रांना वश करण्यासाठी महाशिवरात्रीची योजना करण्यात आली आहे.

रुद्रांवर नियंत्रण म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. इंद्रिय निग्रह सोपा नाही. आंतरिक आसक्तीमुळे मनुष्य स्वतःच्या दुःखाला स्वतःच कारणीभूत ठरतो.

जर रुद्रांच्या बाह्य प्रभावांवर नियंत्रण ठेवले नाही, तर अंतर्गत रुद्रांच्या प्रभावांवरही नियंत्रण ठेवता येत नाही. ही अंतर्गत प्रवृत्तीच सर्व क्लेशांचे कारण ठरते. म्हणून इंद्रिय निग्रह साधणे अत्यंत कठीण आहे.

३६५ दिवसांपैकी किमान एक दिवस तरी मनुष्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्या एका दिवसातील निग्रहामुळे मानसिक शांती प्राप्त होते आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न सुलभ होतात कारण एका दिवसाचेही इंद्रियसंयमन मनुष्याला मुक्तीच्या साम्राज्याकडे नेऊ शकते. म्हणूनच महाशिवरात्रीची योजना करण्यात आली आहे.

म्हणूनच, जेव्हा आपण संपूर्ण रात्र प्रभूचे नामस्मरण करतो, तेव्हा आपली दृष्टी, श्रवण, वाणी आणि सर्व इंद्रिये परमेश्वरामध्ये लीन होतात.

— सत्य साई बाबांनी ११ मार्च १९९४ दिवशी महाशिवरात्री निमित्त दिलेल्या दिव्य सत्संगातून....

  

 जय साईराम 



    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७८
       
             जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धारण करणारा अर्जुन आहे तेथेच श्री, विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
              कान्हा! तू आणि मी जेथे कुठे एकत्र (बरोबर) असू तिथे उत्कर्ष, विजयश्री, नावलौकिक आणि सदाचरण राहील. तू ये, येऊन माझ्या मनात रहा. गोविंदा, काळोखे मन प्रकाशित होऊ दे. आदिनारायणा, अनंतशयना! भगवान वासुदेवा! कान्हा! प्रभू! या निराधाराने केवळ तुझा आसरा शोधला, आदर करून आशीर्वाद दे. कान्हा! कान्हा! शरणो शरणम्. 

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७७
       
           हे राजन! श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही पुन्हा पुन्हा आठवण माझ्या मनाला अत्यंत विस्मय वाटतो आहे आणि मी अत्यंत आनंदित होत आहे आणि पुलकित होत आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
             कान्हा! तुझ्या प्रचंड, अतिअद्भुत रूपाचा विचार करकरून हा दिन अति आश्चर्यचकित होईल असे कर. पुन्हा पुन्हा चक्कीत होईल असे कर. श्रीनिवासा! जगदीशा! दिनरक्षका! दयाळा! दयासिंधू प्रभू! या निराधाराचा तू आधार. शरणो शरणम्. कान्हा, कमलनयना तुझ्या  सुवर्णचरणांवर या दुबळ्याला धडकन घालून आशीर्वाद दे. सदा सर्वकाळ केवळ तुझाच विचार करायला लाव. कान्हा! केशवा!

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

 


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            स्वामी म्हणाले," ते स्वतःच दुर्गेला मंगळसूत्र समर्पित करतील." आज ते खरं ठरलं आहे रात्रीतून सर्व तयारी करण्यात आली.

७ फेब्रुवारी २००१ पहाटे ४ वा.

            घड्याळाचा गजर झाला.' ॐ साई श्री साई जय जय साई.' ध्यान व अभिषेक झाल्यानंतर मी, स्वामींनी कुंकवाने आशीर्वादित केलेले त्यांचे पदक घातले. नवीन साडी व नवीन जोडवी घातली. मी माझ्या तिन्ही मुलांना व सुनांना आज घडणाऱ्या घटनेचा संदर्भात सांगितले. संन्यास घेण्यासाठी त्यांनी मला मुक्त करावे असेही मी त्यांना म्हणाले. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. ते म्हणाले," नाही आम्ही तुलाही नाही करू देणार. " ते रडत होते, माझी अर्ज करत होते माझी सून, मनो म्हणाली," तुम्हाला जे हवे ते तुम्ही करा, परंतु मंगळसूत्र काढू नका." मी म्हणाले," ही परमेश्वराची आज्ञा आहे मला ती शिरंसावंद्य मानलीच पाहिजे. केवळ तुम्ही माझी मुले नसून समस्त विश्वातील लोकं माझी मुलं आहेत. इथून पुढे मला त्यांच्यासाठी जगले पाहिजे. तुम्हाला माहित आहे दररोज मला त्यासाठी असंख्य फोन व पत्रे येतात. अनेक लोकं माझा शोध घेत येथे येतात. मला त्या सर्वांसाठी प्रार्थना करायला नको का? मी त्यांना मदत केली पाहिजे. भगवान तुम्हाला मंगल आशीर्वाद देतील जग तुमच्या त्यागाची प्रशंसा करेल. संन्यास घेण्यासाठी मला मनापासून व आनंदाने निरोप द्या.
             एस. व्ही.नी जमलेल्या सर्व लोकांना आजच्या घटने विषयी थोडक्यात सांगितले ते म्हणाले," जगाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णक्षराने लिहिला जाईल. आम्हा संन्यास घेत आहेत. आजचा दिवस विशेष आहे. आज पौर्णिमेचा पवित्र दिन आहे. अम्मांबरोबर बरोबर श्री मनोहरनही संन्यास घेत आहेत. याला आत्मसंन्यास म्हणतात. आत्मसंन्यास म्हणजे जंगलात जाणे व भगवी वस्त्र धारण करणे नव्हे. स्वामींनी त्या दोघांना पती पत्नीच्या वैवाहिक नात्याचा त्याग करण्यास सांगितला आहे. अम्मा त्यांचे मंगळसूत्र काढतील व श्री मनोहर अन ते दुर्गा मातेच्या चरणी अर्पण करतील. जगामध्ये असे कधीही घडले नाही.


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, ८ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १८, श्लोक ७५
       
           श्री व्यासांच्या कृपेने हे परमगृह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
                         
             कान्हा, योगेश्वरा मला योगी बनव, संन्यासी बनव. तुझा भक्त बनव. मुमुक्षू बनव. माझ्या हातून केवळ तुझीच कर्म घडू देत. तू मला कर्मसंन्यासी बनव. या पाप्याला पवित्र कर. मला तुझ्या चरणकमलांशी घेऊन जा. मला सदैव तुझ्या गीतामृताचे रसपान करू दे, तुझा उपदेशाचे अमृतपान करू दे. माझ्यामध्ये सद्गुण जोपासले जाऊ देत. हे पद्मनाभा, शेषशयना, माझा आश्रय. शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २७ 
       
           यज्ञ तप आणि ज्ञान यामध्ये जी स्थिती (आस्तिक बुद्धी असते, तिलाही सत् असे म्हटले जाते आणि परब्रम्हाच्या संतुष्टी प्रीत्यर्थ केलेल्या कर्मानाही सत् असे म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
              
           कान्हा! या हीनाला यज्ञ, तप आणि दान यामध्ये दृढश्चित्त कर. तुझ्यासाठी सत्कर्म करायला लाव. वैकुंठवासुदेवा! वराहवतारा! वामना! याला तुझ्या चरणी स्वीकारून त्याची कल्याण कर. कान्हा! तूच आधार प्रभू! शरणो शरणम्. नीचाला त्वरेने तुझ्या चरणी घे. प्रभू! शरणम्

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, २९ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २६ 
       
           'सत्' परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्थ! उत्तम कर्मातही 'सत्' शब्द योजला आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! या निरुपायी जीवाला तुझा उत्तम गीतोपदेश असा 'सत्' हा शब्द तसेच त्यातील सत्य आणि चांगलं ह्यांच्या अर्थाची जाणीव करून दे.  माझ्याकडून प्रशंसनीय कृत्ये करून घेऊन मला सत् नाम प्राप्त करून दे. वासुदेवा! ये नं! माझ्या मनात येऊन राहा. माझी काळोखे मन उजळू दे. कान्हा! ईसा! ये, येऊन मला तुझ्या चरणी स्वीकारून माझा उद्धार कर. तूच स्वामी! प्रभू!

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २२ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २३ 
       
           ॐ, तत्, सत् अशी तीन प्रकारची  सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! माझा त्राता! प्रभू! ह्या नीच जीवाला ' ॐ, तत्, सत्'  तुझे वर्णन करणाऱ्या या तीन सत्य वचनांचे पूर्ण ज्ञान दे. तू उपदेशलेले ब्राह्मण्य, वेद आणि यज्ञ या हलक्या जीवाला शिकवून त्याप्रमाणे वागावयास लाव. तुझ्या मार्गाचे अनुसरण करण्यास नि:शक्त अशा या दुबळ्याला तुझ्या मार्गावर चालावयास लाव. तुझ्या मार्गावर तू मला घेऊन चल. परमेशा! रामानुजा! गरिबाला दुसरा रस्ता नाही. कान्हा! तुझ्या चरणी घेऊन आशीर्वाद कर. तूच आधार. शरणो शरणम्.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १८ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १७ , श्लोक २२ 
       
           अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलना पूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जाते.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा! या दिन जीवाला तामसिक दान करणारा करू नकोस. अनुचित स्थळी, अनुचित काळी, अनुचित व्यक्तीला, असभ्य दान करायला देऊ नकोस. सात्विक दान करायला लाव. सर्वेशा! सर्वलोकशरण्या परमधामा, परमदयाळा, शेषशयना, पद्मनाभा, गोविंदा, गोपाला, सप्तवृषभ नियंत्रका, कृष्णा! तूच आधार. शरणो शरणम्.   

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १६ , श्लोक २१
       
            हे अर्जुना! काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत. मनुष्याने  त्यांचा त्याग केला पाहिजे. कारण ही तीन द्वारे आत्म्याचा नाश करणारी अर्थात त्याला अधोगतीला नेणारी आहेत.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, कमलाकांता, काम, क्रोध आणि लोभ या तीन  द्वारांमधून माझी पाठवणी करू नकोस. केवळ तुझी सेवा करण्यासाठीच माझा प्रयत्न ठेव. मी तुला शरण आलो आहे. या अधमाला नरकात ढकलू नकोस. हे श्रीरामा ध्यास घेणाऱ्या जीवांच्या संरक्षका, या श्वानाचे रक्षण कर. मला सद् विचार दे. शरणो शरणम्.  

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ११ जानेवारी, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १६ , श्लोक १२
       
            शेकडो आशारुपी पाशांनी बद्ध असलेले हे जीव कामक्रोधात बुडून जाऊन विषयभोगांसाठी अवैद्य मार्गांनी धनसंचय करतात.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           परमेशा ! या गुलामाच्या अमर्याद इच्छा नाहीशा कर. शेकडो इच्छांच्या दोरखंडांनी जखडून नकोस. काम क्रोधाच्या आहारी जाऊ देऊ नकोस. कामभोगासाठी गैरमार्गाने संपत्ती गोळा करायची बुद्धी देऊ नकोस. मला अपरिग्रही बनव.  भगवान, हा दास फक्त तुला शरण आला आहे अच्युता! अनंता! आधार देऊन दुवा कर.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक २०
       
            हे निष्पाप अर्जुना! हा वैदिक शास्त्राचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला सांगितला आहे. जो याचे तत्त्वतः ज्ञान करून घेतो तो ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, या पाप्याला पापमुक्त कर.  बुद्धिमान कर.  जे करणे योग्य आहे ते करण्याची बुद्धी दे. जे करू नये ते करत असल्यास तू येऊन त्याचे कृत्य थांबव. दया कर.  गुप्त शास्त्रांचे ज्ञान शिकव. तुझी शिकवण आत्मसात करण्याची ताकद दे. आदि नारायणा! अनाथरक्षका!  तूच याच रक्षण करायला हवंस. मी तुला शरण आलो आहे. कान्हा, कृपा कर.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ४ जानेवारी, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १९
       
            हे भारता! जो मला संशय रहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय आणि तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे सलग्न होतो.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, या पाप्याचे अज्ञान दूर कर तू परमपुरुष आहेस याचा मला बोध होऊ दे. हे प्रभू, मला ज्ञानी बनव. या दीनावर तुझी करुणा दृष्टी राहू दे. षट्गुणसंपन्न वैकुंठाधिपतीची भक्ती करण्याची मला बुद्धी दे. हे वासुदेवा, वराहअवतारा! वामना! परशुरामा! भीमा, बलरामा! नरसिंह! मत्स्य होणाऱ्या, कुर्मा होणाऱ्या, अखिलांड अच्युता! कान्हा, मला तुझ्या चरणांशी घेऊन माझे कल्याण कर.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १ जानेवारी, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
जिती जागती गीता
माझ्या वडिलांची रोजनिशी
 
अध्याय - १५ , श्लोक १८
       
            मी च्युत आणि अच्युत यांच्याही (अतीत) पलीकडे, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये आणि वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.

माझ्या वडिलांच्या मनातील भाव ..... 
       
           कान्हा, तू पुरुषोत्तम आहेस. तू ब्रम्हांडातील  चराचर दाखवणारा आहेस. सर्व जगात आणि वेद तुझा महिमा गातात. त्रिपाद वामना! मला तुझे दर्शन दे. मला तुझ्या चरणांशी घेऊन आशीर्वादित कर. तू माझ्यामध्ये भरून राहा आणि मला तुझ्या मध्ये सामावून घे. हे प्रभू, आदिनारायणा, परब्रम्हा, या पाप्याला तुझ्या चरणांशी घेऊन दुवा दे.

*     *     *

संदर्भ - जिती जागती गीता

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम