रविवार, १३ सप्टेंबर, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           पुस्तकात स्वामींनी ही सुचविले.  त्यांनी पानात एक छोटे कार्य ठेवले व काही लिखाणांना कंस दिले. ते लिखाण माझी अवस्था दर्शविते. पृथ्वीचे ज्ञान व्यक्त होऊन माझ्या हृदयाशी बोलते. आज पर्यंत जगाला अज्ञात असलेले ज्ञान व सत्य मला कसे बरं ज्ञान झाले? कारण स्वामी मला सर्व काही सांगतात. नाहीतर मी कसे काही सर्व लिहू शकेन ? हे ज्ञान मानवी आकलनापलीकडचे आहे. आजवर हे ज्ञान संत अथवा ऋषींनी लेखनबद्ध केले नाही.

संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

      जन्माष्टमी  संदेश 

          आपण ‘कृष्ण’ या शब्दाचा अर्थ योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे. या शब्दाचे तीन अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे — ‘कृष्यति इति कृष्णः’ — जो मशागत करतो, तो कृष्ण. कशाची मशागत करायची? आपल्या हृदयभूमीची. कृष्ण आपल्या हृदयभूमीची मशागत करतो—दुर्गुणरूपी तण उपटून टाकतो आणि प्रेमरूपी जलाने ते सिंचित करतो. साधनेच्या साहाय्याने हृदयभूमीची नांगरणी करतो आणि भक्तीची बीजे पेरतो. अशा प्रकारे कृष्ण आपल्या हृदयाची मशागत  करतो. या शब्दाचा दुसरा अर्थ आहे — ‘कर्षति इति कृष्णः’ — जो आकर्षित करतो, तो कृष्ण. कृष्ण आपल्या डोळ्यांनी, आपल्या वाणीने, आपल्या लीलेने आणि आपल्या प्रत्येक कृतीने आपल्याला आकर्षित करतो. त्याच्या वाणीने तो द्वेषाने भरलेली हृदयेही मृदू आणि शांत करतो आणि त्यांना आनंदाने भरून टाकतो. या शब्दाचा तिसरा अर्थ आहे — ‘कुष्यति इति कृष्णः’ — जो सदैव आनंदमय असतो, तो कृष्ण. कृष्ण सदैव आनंदावस्थेत होता. या सर्व गुणांमुळेच ऋषी गर्गांनी त्याचे नाव ‘कृष्ण’ असे ठेवले. ‘कृष्ण’ या शब्दाचा सामान्य अर्थ श्यामल वर्णाचा असा घेतला जातो परंतु लोकं केवळ याच अर्थाचा विचार करतात आणि भगवानांच्या नावामागील अधिक गहन आणि खरा अर्थ विसरून जातात. हे सर्व भगवानांनी १४ ऑगस्ट १९९० रोजी दिलेल्या एका प्रवचनात सांगितले होते.               


जय साईराम

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           जर आपण भलाई केली तर आपल्याकडे चांगले येते. आपण बुराई केली तर वाईटच आपला पाठपुरावा करेल. हे आपण स्वतः लिहिलेले व लिहीत असलेले विधिलिखित आहे. आपण आपल्या आचार, विचार व उच्चारातून फक्त चांगलेच केले पाहिजे. स्वामींनी सातत्याने ८४ वर्षे याची शिकवण दिली. आता महर्षी अरविंदांनी नाविन्यपूर्ण रीतीने हे लिहिले आहे. पुस्तकात सर्व काही स्वामींनी अधोरेखित केले व मला लिहायला सांगितले. सर्व सारखेच आहे. अरविंदांनी स्वामींच्या अवतार कार्याबद्दल आधीच लिहिले आहे. मानवाची गहिरे ठसे त्याला कुमारगांवर घेऊन जातात. अखेरीस, मनुष्य यावर मात करतो. म्हणूनच खरा शत्रू कोण हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. प्रत्येक माणसाने या गुप्त शत्रूवर ताबा मिळवून त्याचा पराजय करायला हवा.
          परमात्म सत् चरित्र भाग १४ या पुस्तकातील आत्म सोबती या नव्या अध्यायाच्या शेवटच्या उतारातून खालील भाग घेतला आहे.
           स्वामींनी अरविंदांच्या सावित्री पुस्तकातील पान १०३ वर काही लिहिले व काही भाग सुचविला. 
           पृथ्वीची सुज्ञता सावित्रीच्या स्थिर मनाशी हितगुज करते. तिचे मन विचारांचा पलीकडे उडी घेते व मानवासाठी अज्ञात आणि अनंत असणाऱ्या नव्या क्षितिजाचे दरवाजे उघडते.
           ती सभावतालच्या सर्वांना आपल्या कवित घेते व त्यांना दिव्यत्वाकडे नेण्यासाठी सिद्ध होते.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           आता आपण यासंबंधी पाहुयात. जन्मल्या क्षणापासून मानवास विरोधाला तोंड द्यावे लागते. विरोधाला सुरुवात होते व तो वाढत जातो. हा विरोध आणि झगडा किती शेकडो वाटांनी व ठिकाणाहून बंड करतो! कोण आहे हा शत्रू? म्हणून चिंतन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ते आपलेच वाईट विचार आहेत. आपण जन्मल्याबरोबर ते येतात व आपल्या विरोधात उभे ठाकतात. आपली संस्कारात आपले शत्रू आहेत. कोणतेही नवीन शत्रू उड्या मारून आपल्यासमोर उभे ठाकत नाहीत. सर्व काही आपलेच भावविश्व आहे. आपण शरीर धारण करून जन्मल्याक्षणी ते आपला पाठपुरावा करू लागतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीने पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे महान संतांनी घोषित केले आहे व स्वामींनी याची शिकवण दिली.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, ९ ऑगस्ट, २०२६

 

 

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           ज्या स्वामींनी देह सोडला ते माझ्या अश्रूंमुळे व विलापाद्वारे परत येतील. त्यांना हे कार्य एकाच देहाद्वारे सिद्धीस नेता येणार नाही का? पुन्हा देह कशासाठी? पहिला देह, त्यांनी जागतिक कर्मांसाठी सोडलेला देह आहे हे सूचित करतात. इतक्या टोकापर्यंत त्यांनी सहन करायला हवे! आता स्वामी नूतन देहांत येतात. सत्ययुगात प्रेम साई अवतरेल. हे खूप मोठे, प्रचंड कार्य आहे. हे कार्य एका अवताराच्या काळात पूर्ण होणारे नाही. म्हणून भगवान एका मागोमाग एक चार अवतार घेतो. हे पूर्वी कधी घडलेले नाही. परमेश्वराची पूर्ण शक्ती, ताकद पृथ्वी सहन करू शकणार नाही. म्हणून तो एक अवतार धारण करून अवतरीत होऊ शकत नाही म्हणून तो स्वतःच चारात विभागून अवतरतो. तो अवतार कार्याचे उल्लंघन करू शकत नाही व कर्मकायद्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तो परिपूर्ण स्वरूपात येऊ शकत नाही. म्हणून त्याने चार अवतार धारण करून अवतरण्याची योजना आखली.
             स्वामींनी परत त्याच पानावर अधोरेखित केले.....
या पृथ्वीच्या अस्तित्वातच एक दडलेली अंधारी विरोधी शक्ती आहे व ती जगाच्या प्रत्येक पावलागणिक विरोध करते. शेकडो ठिकाणी शेकडो वेळा संघर्ष करून मानवाला या विरोधी शक्तीला हरवावे लागते. ही शक्ती चुकीच्या मार्गाने नेते, विकृत बनते व मानवाचा पाडावा करते. या दडलेल्या शत्रूवर मानवाला विजय मिळवायलाच हवा.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

 

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           ऑपरेशन आणि परमेश्वरावर? पूर्वीच्या युगांमध्ये असं काही घडलेलं आपण ऐकला आहे का? भगवान, जो अवघ्या जगाचा प्रतिपाळ करतो, त्याच्यावर शस्त्रक्रिया केली! हे सर्व कशासाठी? का? हे कसं काय? जगाला सुरक्षित ठेवणाऱ्या भगवंताला या जगाचे दुःख सोसलेच पाहिजे. जगाच्या दुःखात सहभागी व्हायला हवे. हा अवतारकायदा आहे. स्वामी कर्मकायदा बदलू शकत नाहीत.
            अवतरीत अवताराने दुःख भोगलेच पाहिजे. भवसागराची दुःखे पाहून संत महंत भगवंताची प्रार्थना करतात. देव व ऋषीगण त्यांची प्रार्थना ऐकून भगवंताला विनंती करतात. केवळ महाविष्णू संरक्षक देव आहेत, म्हणून ते त्याची प्रार्थना करतात. या कारणासाठीच महाविष्णू अवतार घेतो. तो जेव्हा जेव्हा अवतार धारण करतो तेव्हा त्याला अत्यंत क्लेश सोसणे भाग असते. आताचे कार्य खूप व्यापक आहे म्हणून हा महोत्तम अवतार प्रचंड प्रमाणावर कार्य करत आहे. प्रथम शिर्डी बाबा म्हणून येऊन त्याने पायाभरणी केली; नंतर सत्यसाई म्हणून अवतरला. शिर्डी बाबा शिवा अवतार होता; तर सत्यसाई शिवशक्ती अवतार म्हणून त्याने मलाही रूप देऊन आणले. त्यांच्यापासून झालेल्या ताटातुटीने मी अश्रू ढाळत आहे, विलाप करतेय. मी जागतिक कर्माचा भार वाहते व आम्ही दोघं सोसतोय. 



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

बुधवार, २९ जुलै, २०२६

 

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       

  गुरुपौर्णिमेचा संदेश 

 ॐ श्री साई राम 
   भगवान बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

आज गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र दिवस आहे.
आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या गुरूंच्या प्रती पूर्ण श्रद्धेने कृतज्ञता समर्पित करण्याचा आजचा दिवस आहे.
जसा पौर्णिमेचा चंद्रमा आकाशातील अंध:काराला दूर करतो  तसेच गुरु आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंध:काराला दूर करतो. 
 तो कोणता अंधकार आहे जो आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या बंधनात टाकतो?
 
अविद्या, अज्ञान, भ्रम, अहंकार देहाभिमान  यामुळे आपण नित्य आणि अनित्य यामधील भेद ओळखू शकत नाही.काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे तसेच परमेश्वराला कशी भक्ती आणि कसा भक्त प्रिय आहे  हेच आपल्याला समजत नाही. 
हे खरे अज्ञान आहे. गुरूंचा अनुग्रह झाला की आपल्या जीवनातील हे अज्ञान दूर होते.

स्वामींनी मानवतेला सर्वप्रथम कोणता संदेश दिला होता?
 " मानस भज रे गुरु चरणम 
 दुस्तर भवसागर तरणम " 
 अर्थात
 मनाला गुरूंच्या चरणावर स्थिर करा
जेव्हा आपले मन गुरूंच्या चरणांवर स्थिर होते आणि हेच आपल्याला  भवसागरातून तरुन नेते म्हणून जीवन मार्गावर वाटचाल करताना त्यांच्या आज्ञेचे पालन करा. त्यांची शिकवण आचरणात आणा.
आजचा दिवस आपल्या जीवनामध्ये गुरूंचा महिमा जाणून घेण्याचाही दिवस आहे.
स्वामींनी म्हटले आहे सत्य बोला धर्माचे(सदाचरण)पालन करा. मातापित्यांचा सन्मान करा.सेवा करा. हीच माझी गुरुदक्षिणा आहे.
 
जय साईराम

रविवार, २६ जुलै, २०२६

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

           राजमुकूट धारण करण्याऐवजी त्या वेळी राम वनात गेला. या वेळेपासून त्याचा वनवासाला सुरुवात झाली. तिथे पासून ताटातूट झाल्याने त्याच्या यातना वाढल्या. हे अवताराचे क्लेश आहेत. याप्रमाणेच दुष्टांचा नाश करून धर्म स्थापना करण्यासाठी कृष्णावतार झाला. त्याचेही संपूर्ण जीवन दुःखमय होते. त्याच्या जन्मापासूनच अनेक असुरांनी त्याचा वध करायचा प्रयत्न केला. त्याचे कौटुंबिक जीवनही दुखत होते.

            स्वामी या युगात जगाचे रक्षण करण्यासाठी आले. ते पूर्वीच्या अवतारांसारखे नाहीत; ते विनाश करण्यासाठी न अवतरता मानव जातीमध्ये परिवर्तन करण्यासाठी आले. म्हणून त्यांनी जगाची कारणे स्वतःवर घेऊन स्वतः दुःख भोगले. त्यांनी स्वतःच दोहोत विभागले, म्हणून आम्ही दोघांनी जागतिक कर्मे स्वतःवर घेऊन क्लेश सोसले .आम्ही सर्वांची पापकर्मे आमच्या शरीरांवर घेतली व त्यांना अमृतावस्था प्रदान करण्यासाठी, वैश्विक मुक्तीसाठी यातना सहन केल्या. स्वामींनी सर्वसामान्य मानवासारखा देह त्याग केला. यावर कृपया थोडावेळ चिंतन करा. २००३ पासून स्वामींच्या देहाला किती यातना झाल्या? एवढेच नाही तर अगदी बालवयात मांत्रिकाने त्यांच्या मस्तकात खिळे ठोकून व डोळ्यांमध्ये औषधी घालून त्यांना तीव्र ताप दिला. हे कशासाठी? भगवंताने एवढे दुःख का  सोसावे? हे केवळ कलियुगातील लोकांसाठी भगवान करत आहेत. 'त्यांना' नीट चालता, बोलता येत नव्हते! किती हे दुःख! हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्या अव्यय शरीरात सुया टोचल्या होत्या. बालपणी त्यांच्या पुस्तकात एक खेळा ठोकला आणि शेवटी त्यांचे सर्व शरीर यातनामय झाले !



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, १९ जुलै, २०२६

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

            अशा रीतीने एखादाच चिंतन करतो. तो आध्यात्मिक पुस्तके वाचतो. साधू, संत व साक्षात्कारी आत्म्यांच्या शोधात जातो हजारात अगदी एखादाच असे चिंतन करतो अशा हजारोंमध्ये काही शेकडा साधना करतात व त्यांच्यामधील एखादाच भगवत् प्राप्ती करतो.
           केवळ दुःख मनुष्याच्या हृदयातील विरोध नाहीसा करून त्यास रस्ता दाखवितो. नाहीतर तो या जगात संतोष व समाधानी राहील. माणूस मी व माझे यांमधून मुक्त झाला तरच त्याच्या जीवित आचे दुःख कमी होते.
           भगवंताला जर जग वाचवायचे असेल तर त्याने या जगाच्या दुःखात सहभागी होणे भाग आहे. हा कायदा अवतरीत भगवंतासाठी आहे. पूर्वी प्रत्येक अवतार जगाचे कल्याण कमी करण्यासाठी आला. धर्माचा ऱ्हास झाल्यानंतर अवतार सर्व सुरळीत करण्यासाठी अवतरीत होतो. राम अवतरला त्याने राक्षसांचा संहार केला. राक्षस ऋषींच्या तपाचे विनाशक होते. त्यामुळे रामाला त्यांचा विध्वंस करणे भाग होते. परंतु हे करण्यासाठी त्याला सीतेची ताटातूट सहन करावी लागली. त्याचा विरह राक्षसांचा संहाराचे कारण बनला. या ताटात तुटीमुळे रामाने केवळ रावणाचा नव्हे तर त्याचा अखिल वंशवर अक्षय सेना मुळापासून नष्ट केली. या कारणासाठी रामाचे वैयक्तिक जीवन दुःखमय होते.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


गुरुवार, १६ जुलै, २०२६

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

            पृथ्वीवरील सुखांमुळे तुला परमेश्वरी आनंदाचा लाभ होत नाही. म्हणून दुःख आणि वेदनांची गरज निर्माण होते. दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय या अज्ञानी जगात आनंद मिळू शकत नाही. मानवाच्या हृदयात असलेल्या विरोधाचा भंग करण्यासाठी देव दुःखाचा हातोडा वापरतो. या दबावाशिवाय मानवाचा आत्मा सुखातच संतुष्ट राहील. माणूस जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत दुःख आणि वारी आहे. ज्याला जगाचा उद्धार करावयाचा आहे, त्याला दुःख भोगलेच पाहिजे. देव जेव्हा मनुष्य रूपात पृथ्वीवर अवतार घेतो तेव्हा त्यालाही हाच नियम लागू होतो.

              जग म्हणजे हाल अपेष्टा. जगात हे स्वाभाविक आहे. मानवाला हे उमजलं की तो दुःख व यातनांमधून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधू लागतो. माणूस सहजपणे दुःख, यातनांचा स्वीकार करतो व दुसऱ्यांना उपदेश करतो," जग हे असंच असतं! संसारी जीवन असच असणार!" अशा तऱ्हेने बोलून, त्यांनी स्वतःच्या सहजपणे सर्व स्वीकारले तसं दुसऱ्यानेही स्वीकारावी म्हणून त्याला समजावून सांगतो! हजारांत एखादा चिंतन करतो. त्या हजारात अगदी एकच त्याला उमजलेले आचरण आणतो! तो म्हणतो,' मला हे यातनामय संसारी जीवन नको! माझे दुःख दूर करण्याचा मार्ग कोणता? यातून मुक्त कसे व्हावे?"


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, ५ जुलै, २०२६

    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

            प्रत्येक व्यक्ती मला त्यांच्या मानवी दृष्टीकोनातून पाहते, त्यामुळे चुका घडतात. मी सर्वांचे रुदय परिवर्तन करण्यात आले आहे, तरीही त्यांचा मानवी स्वभाव त्यांना माझ्यापासून दूर करतो. हे केवळ इथे आश्रमातच नाही तर जगभर असेच आहे. मी भावाद्वारे सर्व बदलते. माझे भाव स्तुती मधून बाह्यगामी होतात व परिवर्तन करतात. काहीजण शिल्लक समाधानासाठी इथे येतात. जरी माझे प्रेम त्यांना खेचून आणते तरी त्यांचा स्वभाव त्यांना माझ्या प्रेम बंधाशी प्रतिकार करायला लावतो. अशा रीतीने त्यांचा एक पाय आश्रमात असतो तर दुसरा त्यांच्या स्वभावात. म्हणून ते माझी उंची गाठू शकत नाहीत. ते नावापुरतेच आश्रमवासी आहेत.  स्वामींनी किती सांगितले, मी किती सांगितले. जर ते बदलले नाहीत तर कठीण आहे.

            सत्याचा मार्ग, भगवंताचा मार्ग खडतर आहे. हृदय बुद्धी व इंद्रियांनी त्यांची दिशा बदललीच पाहिजे. माझ्या भावा विश्वामधून सर्वांना सारखीच मुक्ती मिळेल. हे नक्की होईल. अगदी नक्की. तथापि ही सर्वसामान्यांना मिळणारी मुक्ती असेल. माझ्या समीप असल्याची मुद्रा कोणालाही नाही, कठोर कष्ट व जागरूकता यांची शेवटच्या घटकापर्यंत गरज आहे.
 


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २८ जून, २०२६

 


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

            परंतु तिच्या बरोबरीने उभा राहू शकेल असा एकही तुल्यबळ सोबती नसतो. तिला तिच्या उच्च पातळीवरून खाली वाकून सर्वांना सांभाळावे लागते व त्यांच्या आत्म्यांना मातीच्या ममतेने कवटाळावे लागते. ती मात्र अंतरी एकटीच, एकाकी राहते.
 
          हे माझ्या अवस्थेशी तंतोतंत जुळते. या आश्रमात अगदी थोडे लोक आहेत. अत्यल्प व्यक्तींनी माझ्या हाकेला प्रतिसाद दिला. आहे इतर इथे येऊन शकत नाहीत. इथे वास्तव्य करण्यासाठी अनेक आले पण दीर्घकाळ राहू शकले नाहीत. याचे कारण हे स्थळ अतिशय शक्तिशाली आहे. इथे स्वामींचे अवतार कार्य घडत आहे. त्यामुळे इथे वास्तव्य करणे अति कठीण आहे.
 


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २१ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय २ 
कर्मकायदा - अवतार कायदा

 
            अरविंदांच्या सावित्रीमध्ये १०३ पानावर स्वामींनी काय सुचित केले ते आपण पाहू.

            .....तथापि अल्प तिच्या हाकेला प्रतिसाद देतात आणि अत्यल्प तिच्या दिव्यत्वाला. ते तिच्या दिव्यत्वाची पाऊलवाट चोखाळू  शकत नाहीत व आपल्या खुज्या मानवी आवाक्याने ते मागे पाडतात. ती त्यांची अग्रणी आहे, त्यांची हृदयसम्राज्ञी तरीही त्यांच्या स्वभावापासून फार वेगळी. ते तिचा आदर करतात. तिला धरून ठेवतात, परंतु ते तिची उंची गाठू शकत नाही. काहीजण आपल्या क्षुद्र उद्दिष्ट पूर्तीसाठी तिच्यावर भार टाकू पाहतात, किंवा बंड करून तिच्या प्रेमाचे जोखड झुगारून टाकण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनाही तिचे प्रेम मनापासून हवे असते.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम





रविवार, १४ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

 वैश्विक स्फोट

२३ ऑक्टोबर १९३८
अमावस्येची काळोखी रात 
अहो आश्चर्यम्
अवस्थेच्या अंधाऱ्या रात्री 
जाहला पुनवेचा जन्म!

पिता मधुरकवी आळ्वार
माता वेदवल्ली
दक्षिणेकडील मधुरैसमीप 
वडक्कम्पट्टी ग्राम तयांचे
कन्येच्या आगमने आनंद त्यांसी शब्दातीत
सानुल्या या देवदूताचे 
नामाभिधान केली 'वसंता'
केवढे समर्पक नामकरण 
केले तयांनी अजाणता!
वसंता अर्थात वसंतऋतु 
अखेरीस त्या शुष्क मानवी जीवांना
गवसले प्रयोजन
आनंदाचा उत्सव करण्या 
प्रभुवराचे गुणगान गाण्या!

स्वागत तुझे माता मेरी 
साक्षात् प्रभूशी विवाह करी!
या! सकल जन या... 
तिची कथा पुढे ऐकण्या!

कट्टर गांधीवादी पिता 
आचारी जीवनी भगवद्गीता! 
असे अत्यंत दानशूर 
स्वातंत्र्य सैनिक शूरवीर 
तळपला शुक्र तार्‍यासम 
सच्चा पुत्र भारत मातेचा

वेदवल्ली, वैष्णव भक्तपरायण
रात्रंदिन प्रार्थनेत रममाण
पतीस घडतात तुरुंगवास 
त्या दुर्बल स्त्रीस 
आसरा ना कोणी दूजा
केवळ एक प्रभू परमेश, प्रभू परमेश!

हे प्रभू आहेस कोठे तू?
अंतरलास का मजसी तू?
हे माझ्या कृष्णा ! 
मज उध्दरणार नाहीस का ?
तिच्या करूण हृदनाचे पडसाद उमटती स्वर्गलोकी
भार असह्य वसुंधरेसी 
प्रभू म्हणे," परतुनी ये स्वगृहासी 
प्रतिक्षेत मी तवा नेत्रातील अश्रू पुसण्यासी!"

भगवंतासाठी अपयश येते क्वचित
कसे ? ते पाहू आपण 
बालवसंतेने नेली पुढे 
मातेची प्रज्वलित ज्योत 
त्या प्रखर ज्योतीने 
जर दाहिले प्रभुंवरा 
तर दोष कोणा द्यावा बरे?

धगधगता अग्नी भक्तिचा 
उद्रेक ज्वालामुखीचा 
अर्थात स्फोट विश्वाचा 
'ब्रम्हांड स्पोर्ट' सिद्धांत नव्हे हा 
आहे साक्षात स्फोट ब्रम्हांडाचा!

भगवंताशी संकल्प बदल अनिवार्य आता 
२७ मे २००१ या शुभदिनी 
मांगल्ये दिले ब्रह्मचारी बाबांनी
देऊनी मांगल्ये केली घोषणा मूक  
"आम्ही दोघ आहोत एक "

नायक नायिकेचा विवाह 
होऊनही सदा जीवन सुखी होता
कथेची होते सुफळ सांगता!

परी अम्मा याहुनी न्यारी 
वसंता न केवळ, ही आहे विश्वमाता
तिचे विश्व, तिची लेकरे दुःखात चूर असता 
असेल का संतोष तिच्या चित्ता ?

जोवरी ना देसी वैश्विक मुक्ती 
नसे मज शांती विश्रांती 
अग्निप्रवेश, नरकयातना 
सिद्ध मी याहूनी घोर सत्वपरीक्षा देण्या 
पाऊले ना ढळतील माझी मार्गावरूनी 

हा मार्ग वैश्विक मुक्तीचा, 
मानवा, दानवा 
कीटक, पशु, जलचरा 
मुक्त करील चराचरा


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



गुरुवार, ११ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

            त्याच पानावर स्वामींनी एक ओळ अधोरेखित केली.

            ......काळ व इतिहासातून माणूस काहीही शिकत नाही.

           वेळ सतत बदलत राहते. युगे बदलतात. मनुष्याने अनेक काव्य वाचली आहेत; परंतु त्यापासून तो काहीही शिकला नाही. यामुळे तो स्वतःच स्वतःचा कट्टर शत्रू होतो. रामायण, भागवत, महाभारत, भगवत् गीता किती बरं दिव्य पुस्तके इथे आहेत! तथापि या पुस्तकांनी शिकवलेले सूक्ष्म अर्थ लोक आचरणात आणत नाहीत. परिणामतः माणूस पुन्हा पुन्हा जन्मास येऊन मृत्यू पावतो. माणूस जन्मास न येण्यासाठी जन्माला आले हे विसरला आहे. म्हणून, मार्ग दर्शविण्यासाठी अवतार अवतरला.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम



 

मंगळवार, ९ जून, २०२६


ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 


इथेच याक्षणी मुक्ती- भाग  

प्रकरण - २

कुमारी पासून कुबेरापर्यंत 
 
            उद्घाटन समारंभाची वेळी भगवानांनी आमच्यावर भरभरून  कृपावृष्टी केली. पूर्ण होती देताना स्वामींच्या खुर्चीवरील कमळ खाली पडले. वेदिकेवर ठेवलेल्या सात पादुकांच्या जोड्यांवर विभूती व तेल साक्षात झाले.  तेलाचे सृजनीकरण कर्मसंहाराचे घटक आहे. जे लोक ह्या ठिकाणी या ध्यान सभागृहात येतील त्यांच्या कर्मांचा नाश होईल व त्यांना मुक्ती प्रदान केली जाईल. हे दर्शविण्यासाठी दोन दिवस तेल सुजित झाले. भगवान म्हणाले जसे पक्षांचे प्राण्यांचे आश्रयस्थान असते तसे साई गीतालयम सभागृह लोकांसाठी एक आश्रयस्थान आहे.
             भगवान यांनी या उद्घाटन समारंभासाठी तई पूसम पौर्णिमेचा दिवस निवडला. हा एक शुभ योगच म्हणायचा! ह्या पवित्र दिनी संत वल्लालर सर दिव्य तेजा मध्ये विलीन झाले. अंडाळ आणि वल्लालर  प्रमाणे मलाही लहानपणापासूनच परमेश्वरामध्ये सदेह विलीन व्हायचे आहे. मी नेहमी ह्यासाठी प्रार्थना करते. या आमच्या संयोगासाठी स्वामींनी हाच दिवस निवडल्याचे आताच मला ज्ञात झाले. ते म्हणाले की ह्या तई पूसम दिवशी माझा त्यांच्याशी सदेह संयोग होईल. मी म्हणाले," तई पूसम हा दिवस साई गीतालयमचा उद्घाटन दिन आणि आमचा विवाह दिन म्हणून साजरा केला जाईल."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 
 
जय साईराम

रविवार, ७ जून, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

            मी स्वामींच्या एका दृष्टीक्षेपासाठी, एका स्पर्शासाठी, एका शब्दासाठी तळमळते आहे. स्वामींनी लाखो लोकांना दर्शन, स्पर्श, संभाषण दिले आहे; ते मला हे देऊ शकत नव्हते का ? हे अवतार कार्य आहे. हे असंच व्हायला हवे. यामुळे त्यांचे प्रेम व जवळीकीसाठी मी कासावीस आहे. हे मला न मिळाल्यामुळे मी जग बदलण्याची शपथ घेतली. या अवतारकाळात स्वामींनी जे काही केलं ते त्यांना प्रेमावतार काळात आल्यानंतर अनुभवावेच लागेल. आता ते मला हुरहुर लावतात, तेव्हा त्यांना माझ्या प्रेमाचा ध्यास लागून राहील. हा कर्म कायदा आहे भगवान स्वतः या कायद्याची प्रात्यक्षिक करतो.

           द्वैत सर्वांचे मूळ आहे. सर्वाभूती परमेश्वर आहे. जेव्हा मानवाला हे उमजते तेव्हा त्याचे दुःख निवते, दुःख त्याला स्पर्श करू शकत नाही, तू जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम


रविवार, ३१ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

            एक कोळी स्वतःभोवती जाळी विणतो व स्वतःच्या मध्यभागी बसतो. अगदी असेच प्रत्येक मनुष्याने स्वतःभोवती संस्कारांचे जाळे बनविले आहे. पूर्वीच्या जन्मांमध्ये त्यांनी जे काही केले असते, त्याचे या जन्मात संस्कार होतात. हे त्याने स्वतः निर्माण केलेलं जाळं आहे. मानव स्वतः विधीलिखित लिहून स्वतःला शापित करतो. कोणाचीही या जाळ्यातून सुटका नाही. हा कर्म कायदा आहे. भगवंत सुद्धा या कर्म कायद्याला बांधील असतो. हे कसे काय? आपण पाहू या.

             रामावताराच्या काळात वालीने तप करून वर प्राप्त केला. जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती वालीला मिळेल असा तो वर होता. रामाने सुग्रीवास  वालीशी युद्ध करण्यास सांगितले. त्यावेळी झाडामागे लपून रामाने बाण मारून  वालीचा वध केला. जर रामाने हे केलं नसतं तर वालीचा वध कोणीही करू शकले नसते. हे अवतार कार्य होते. अवतार अवतरतो तेव्हा सर्व योजना आखतो, सर्वकाही त्यानुसारच घडले पाहिजे. पुढील युगात वाली नावाच्या पारध्याने झाडामागून कृष्णाच्या पायाच्या अंगठ्यावर बाण मारला व त्याचा मृत्यू झाला. रामाच्या चुकीच्या कृतीमुळे हे सर्व घडले. कर्म कायद्यापासून कोणाचीही सुटका नाही याचे प्रात्यक्षिक अवतार स्वतः करतात. आपण अजून एक उदाहरण पाहू.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

गुरुवार, २८ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

           स्वामींनी पुस्तकात हे अधोरेखित केले. या आधी त्या पुस्तकात काय झाले ते आपण पाहू. नारद ऋषी सावित्रीकडे येऊन सत्यवान च्या प्रारब्धाबाबत बोलतात." मानवासाठी जीवन अंतर्गत दुःख व अश्रू आहे. आपल्यामधील दुष्ट शक्ती कार्यरत असतात. भगवंताने हा कायदा कशासाठी केला? मानवतेला हा शाप आहे का?" ती हे अजून विस्ताराने सांगण्यास सांगते.
            हा कर्म कायदा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच तिच्या दुःखाचे कारण आहे. पूर्वी त्याच्याकडून झालेल्या दुष्कृत्यांमुळे तो आज या स्थितीत आहे. जन्मोजन्मीचे दुर्गुण त्याच्या यातनांची कारण आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःची विधीलिखित घडवित असते. तो स्वतः त्याच्या शापित जीवनाचे कारण आहे. जन्मल्याक्षणी मतभेद व भेदभाव निर्माण होतात, आणि  ते पावलोपावली वाढत जातात. मूल दुःख व अश्रूंमधून जन्मास येते. ते एक एक पाऊल उचलून टाकत असता हे घडत राहते. म्हणून हे जाळं आहे.



संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम

रविवार, २४ मे, २०२६


    ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

       सुविचार        

         " आपण आपले अंतःकरण निःस्वार्थ प्रेमाने भरून टाकले पाहिजे. चराचरामध्ये केवळ परमेश्वरच भरून राहिला आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे."

 
सावित्री वसंत साई यांच्या जीवनातील साधर्म्य 
 
अध्याय १
मानवतेचा इतिहास

           अरविंदांनी हे सगळं कसं बरं लिहिले ? त्यांनी जे काही लिहिले आहे ते सर्व माझे जीवन दर्शविते. मला याचे अतिशय आश्चर्य वाटते. आमची भविष्यात होऊ घातलेली पहिली भेट सुद्धा त्यांनी सुचित केली आहे. या भूतलावर जन्मास असलेली ही वसंत सरिता अथक धावत राहिली. ती अखेरीस साई सागरास मिळाली. तिचा उगम जेथून झाला तो स्त्रोत तिने प्राप्त केला. ७३ वर्षानंतर स्वामी मला बोलावतील आणि मी कोण आहे हे सर्व जगास दाखवतील.
            आपण पान नं. १२५ पाहूया,
            .....आमच्या आयुष्याचा जन्मच वेदनेतून होतो व रडतच आम्ही जन्मतो. आमच्या ठाईसहारक शक्तींचा वास असतो. आम्ही एखाद्या वेढलेल्या किल्ल्याप्रमाणे असतो. मानव जातीलाच काहीतरी शाप आहे अगदी जन्मापासून त्यांच्यावर द्वंद्वात्मक परिस्थिती लाभलेलीच असते. प्रत्येक पावलावर एक फास असतो. चुका आणि दुःख गुणाकाराने वाढतच असतात.


संदर्भ सावित्री वसंतसाई यांच्या जीवनातील साधर्म्य
 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम